कुंभ रास कसे असेल वर्ष २०२४? या गोष्टी तुमच्या आयुष्यात १००% घडणार म्हणजे घडणारच.

नमस्कार मित्रांनो.

कुंभ राशीसाठी वर्ष २०२४ हे कस असणार आहे. २०२३ मध्ये ज्या समस्या तुम्हाला आल्या त्या समस्यांवर उपाय २०२४ मध्ये तुम्हाला मिळणार आहे का? आर्थिक दृष्टिकोनातून विचार करता हे वर्ष तुमच्यासाठी चांगला असेल का? नशीब तुमची साथ देईल का? याच प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणून घेणार आहोत. कुंभ राशीच्या व्यक्ती या मुळातच प्रसन्न असण्यापेक्षा गंभीर असतात. नीटनेटकेपणापेक्षा अत्यंत साधेपणाचे त्यांना आवड असते. 

बौद्धिक परिपक्वता आणि प्रापंचिक अनासक्ती असल्याने शृंगार साधने वर्ज असतात. व्यक्तींना वाचनाची संशोधनाची अत्यंत आवड असते. कुंभ राशीच्या व्यक्ती स्वभावाने तर नम्र परिपक्व तसेच सहनशील असतात. परंतु अंतर्यामी सतत चिंतनशील वाचनात आणि संशोधनात अत्यंत आवड असते. कोणताही विषय त्या सहजा आत्मसात करणाऱ्या तल्लक बुद्धीच्या आणि उत्कृष्ट स्मरणशक्तीच्या असतात. 

कुंभ राशीचे वैशिष्ट्य म्हणजे समोरच्याला न दुखवता ही आपल्या म्हणण खर करणे. असा समजूतदारपणा त्यांच्याकडे असतो. साधेपणा हा त्यांचा स्थायीभाव असतो. अशा या कुंभ राशीला २०२४ वर्ष आर्थिक दृष्ट्या कसा जाणार आहे. तर नक्कीच चांगल जाणार आहे. कारण या राशीच्या लोकांना एप्रिल नंतर म्हणजे एप्रिल २०२४ नंतर चांगली बातमी मिळू शकते. त्यांचा आत्मविश्वास यावर्षी वाढणार आहे.उत्पन्न सुद्धा वाढू शकत.

तुम्ही कोणत्याही प्रकारचा कारखाना किंवा गिरणी चालवत असाल तर तुम्हाला चांगल ऑर्डर्स नवीन ऑर्डर्स मिळू शकतात. परदेशातही संपर्क प्रस्थापित केला जाऊ शकतो. जे उत्पन्न वाढवण्यासाठी उपयुक्त ठरेल. धार्मिक कार्यामध्ये यंदा तुमची रुची असेल. वैयक्तिक जीवनाचा विचार करता वर्ष २०२४ मध्ये जबाबदाऱ्यांमध्ये मोठी वाढ होताना दिसेल. एवढेच नाही तर व्यवसाय करणारी लोकसत्ता यावर्षी खूप प्रवास करू शकतात. 

त्यामुळे कौटुंबिक सदस्यांची थोडासा दुरावा वाढू शकतो. संवादातील अंतरामुळे काही नातेसंबंधांवरील त्याचा परिणाम होऊ शकतो. जोडीदाराशी मतभेद होऊ देऊ नका. सासरच्या मंडळींकडूनही काही समस्या निर्माण होऊ शकतात.पण  पण तुम्ही संयम ठेवणे गरजेचे आहे. कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीला तुमच्या नात्यात येऊ देऊ नका. लक्षात ठेवा की काही वेळा आपण आपल्या डोळ्यांनी जे पाहतो किंवा कानांनी जे ऐकतो ते सुद्धा खोट असू शकत. त्यामुळे सत्याचा योग्य तो तपास घेण गरजेच आहे.

कुंभ राशीला साडेसाती चालू आहे आणि त्यामुळेच काही गोष्टींमध्ये विशेष काळजी घेण्याची गरज आहे. जे लोक सरकारी नोकरीत आहेत त्यांच्या कामात वाढ होऊ शकते. अतिरिक्त कामाच्या दबावामुळे मानसिक तणाव वाढू शकतो. यासाठी तुम्हाला संयमाने आणि कौशल्याने पुढे जावे लागेल. सगळ्यावर उपाय सुद्धा आहे आणि तो आपण शेवटी बघणार आहोत. खाजगी नोकरी करणाऱ्यांना सुद्धा अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागेल. मोठे निर्णय घेताना घाई करू नका. अन्यथा समस्या उद्भवू शकतात. 

वैवाहिक जीवनातही काही अडचणी जाणू शकतात ज्या लोकांच्या लग्नाला अगदी चार किंवा आठ वर्षे झाली आहेत. त्यांनी विशेष लक्ष देण्याची गरज आहे. अहंकारापासून नात्याला दूर ठेवावे लागेल आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. २०२४ मध्ये विद्यार्थ्यांनाही खूप मेहनत करावी लागेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा करावी लागू शकते. तसेच नोकरी बदलू इच्छिणाऱ्यांना सुद्धा सहजासहजी ते शक्य होणार नाही. प्रयत्न मात्र पूर्ण करायचे आहे.

मे २०२४ नंतर कुंभ राशीच्या लोकांच्या जीवनात काही महत्त्वाचे बदल दिसून येतील. करिअरमध्ये काही अडथळे येऊ शकतात राजकारणाच्या क्षेत्रात असणाऱ्यांना जनतेमध्ये अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे. साडेसातीच्या प्रभावामुळे तुम्हाला पुन्हा पुन्हा आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. पण तुम्ही निराश होणार नाही आणि ध्येयावर लक्ष केंद्रित करत पुढे चालत राहाल. जी गोष्ट तुमच्यासाठी सकारात्मक ठरेल. शनि महाराज मेहनतीला फळ देतात त्यामुळे मेहनतीला कमी पडू नका. 

आरोग्याचा विचार करता कुंभ राशीच्या लोकांना यावर्षी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. पोटाशी संबंधित समस्या वाढू शकतात. जर तुम्ही शुगर किंवा यकृताचे रुग्ण असाल तर निष्काळजीपणा महागात पडू शकतो. आहाराकडे विशेष लक्ष द्या त्याचबरोबर स्वच्छतेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करा. कुंभ राशीच्या व्यक्तींना साडेसाती चालू आहे आणि त्यामुळे काही समस्या जाणवतात पण त्यावर उपाय आहे.

उपाय : १) ब्रह्म मुहूर्त उठुनन उगवत्या सूर्याचा आशीर्वाद घ्या. त्यासाठी सूर्याला जल अर्पण करा. तांब्याचा कलश यामध्ये पाणी घ्यायच त्यामध्ये लाल चंदन टाकायच किंवा लाल फुल टाकायच आणि हे पाणी सूर्यनारायणाला अर्पण करायच. या उपायाने करिअरमध्ये प्रगती होते. करिअरमधील अडथळे दूर होतात.

२) त्याचबरोबर आर्थिक अडचणी जाणवत असेल तर शुक्रवारी लक्ष्मीची पूजा करून श्री सूक्तच पठण कराव.

३) त्याचबरोबर साडेसातीवर उपाय म्हणजे दर शनिवारी शनि चालीसाचं पठण कराव. मन ४) शांतीसाठी चांदीच्या ग्लासांमधून पाणी पिण्यास सुरुवात करा आणि दर सोमवारी ‘ओम सोम सोमाय नमः’ या मंत्राचा जप करा.

यापैकी कुठलाही एक उपाय केलात तरी सुद्धा चालू शकेल. तुमच्या समस्येनुसार उपाय निवडा फक्त तो नियमितपणे करा. नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल. आता कुंभ राशीसाठी एक खास सल्ला साडेसाती हा शब्द ऐकून बहुतेकांची पाचावर धारण बसते. आता आपल्या आयुष्यात काहीतरी विपरीत घडणार असा गैरसमज होतो. पण लक्षात घ्या साडेसाती ही कोणाला त्रास ठरते अहंकारी व्यक्तींना म्हणून साडेसातीमध्ये अहंकार चुकूनही करु नये. नम्र रहाव त्याचबरोबर आपल्या कामांमध्ये प्रामाणिक राहाव. 

साडेसातीच्या काळामध्ये ज्येष्ठांचा आदर करावा. खरंतर तो नेहमीच करावा. परंतु ज्येष्ठांचा अपमान करणाऱ्यांना साडेसातीमध्ये त्रास होतो हे मात्र नक्की. कारण शनि महाराज वृद्ध व्यक्ती गरीब असाह्य अपंग या लोकांना छळणार्‍यांना माफ करत नाही. म्हणूनच साडेसातीच्या काळामध्ये तुम्ही वृद्ध व्यक्तींची सेवा करा तुम्हाला कधीही त्रास होणार नाही. त्याचबरोबर तुम्हाला जसे शक्य असेल तसे दान करावे. अनाथ वृद्ध व्यक्तींना  किंवा अपंग व्यक्ती यांच्यासाठी दानधर्म करा. तुमच्याकडं जी सेवा करता येईल ती करा त्यामुळे साडेसातीचा त्रास होत नाही.

साडेसाती आपल्याला जीवनाकडे बघण्याचा नवीन दृष्टिकोन देत असते. साडेसातीमुळे आपली आत्मशुद्धी होते. आपल्या केलेल्या सगळ्या पापांचा हिशोब साडेसातीत होतो. म्हणूनच पुण्य कर्म करण्याची साडेसाती ही उत्तम असते. त्यामुळे साडेसाती बद्दल मनात कुठल्याही प्रकारचे गैरसमज काल्पनिक भीती ठेवू नये.आपल काम प्रामाणिकपणे कराव. आपल्या वागण्या बोलण्यात नम्रता असावी. समोरच्याबद्दल सहानभूतीची भावना असावी. कुंभ राशीचा साडेसातीचा दुसरा टप्पा चालू आहे. 

प्रत्येक व्यक्तीला तीस वर्षांनी एकदा साडेसाती येते. त्या साडेसातीत आपले खरे मित्र कोण खोटे मित्र कोण हे समजत. वाईट कळाला की कोण आपल्याजवळ राहतं आणि कोण सोडून जातं ते  कळत. अशा वाईट काळातच माणसाची पारख होते. स्वतःचे गुणदोष प्रकट होतात. दुःख संकट होत त्यामुळे व्यक्तिमत्व तळपून उठत आणि पुढील आयुष्यात आपण दाखवील राहत नाही. 

साडेसाती ही एक तत्त्वपरीक्षा आहे. खऱ्या खोट्याचा निकाल इथेच होतो. म्हणून साडेसातीचा सकारात्मक दृष्टीने विचार करायचा आहे आणि आपल्याला आपल्या आयुष्यात साडेसातीतून काय मिळते याचाही विचार करायचा आहे. सगळ्यात महत्त्वाच ईश्वरावर श्रद्धा ठेवायची आणि आपलं काम प्रामाणिकपणे करत राहायच. सकारात्मकतेने पुढे जाणाऱ्यांना कुठल्याही गोष्टीचा त्रास कधीच होत नाही.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *