मिथुन रास जूनमध्ये या घटना तुमच्या आयुष्यात १००% घडणार म्हणजे घडणारच.

नमस्कार मित्रांनो.

जून २०२४ हा महिना मिथून राशीसाठी कसा असणार आहे. कोणत्या महत्त्वाच्या घटना मिथुन राशीच्या जीवनामध्ये या जून महिन्यामध्ये घडणार आहेत. चला जाणून घेऊया. चला आता वळूया मिथुन राशीकडे मिथुन राशीच्या व्यक्ती या बुद्धिमान असतात बरका तशा म्हणजे त्यांची ग्रहणशीलता स्मरणशक्ती तर्क शक्ती आकलन शक्ती आणि हजरजबाबी पणा ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे असतात. 

आणि त्यामुळे अशी एखादी मैत्री जमली असेल किंवा चार चौघे जर जमले तर तिथे हसण्याचे फवारे उडवायच काम मिथुन राशीची लोकं करताना दिसतात. मिथुन राशीच्या लोकांकडे असणार बोलण्याचा कौशल्य त्यामुळे वकील प्राध्यापक वक्ता इन्कम टॅक्स सेल्स टॅक्स कन्सल्टंट व्यापारी ज्या व्यवसायात सतत लोकांची बोलाव लागत अशा ठिकाणी ही लोकं नक्कीच आपल कौशल्य दाखवून उच्च पदावर जातात तसंच यश संपादन करतात. 

मिथुन राशीच्या व्यक्ती या उत्तम रेडिओ कलाकार वृत्तपत्र संपादक किंवा बातमीदार अशा ठिकाणी सुद्धा उत्तमरीत्या काम करताना दिसतात. त्यांचं कौशल्य इथे त्यांना फार उपयोगी पडत. आता बघू या जून महिना या मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी कसा असणार आहे. तस तर हा जून महिना मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी जरा चढ-उतारांनी भरलेला असणार आहे. त्यामुळे तुम्हाला आधीच तयारी करावी लागेल. आता चढ उतारांनी भरलेला म्हणजे नक्की कसा हो म्हणजे कुछ खट्टा कुछ मीठा चांगल्या गोष्टी आधी बघूया. 

दीर्घ काळापर्यंत रखडलेली काम पूर्ण होतील. असा या महिन्यांमध्ये योग आहे त्याचबरोबर तुमची कर्जातून सुटका होण्याची सुद्धा शक्यता आहे.धनलाभाचे योग या महिन्यामध्ये मिथुन राशीसाठी आहेत. एवढेच नाही तर भविष्यासाठी बचत करण्याची संधी सुद्धा तुम्हाला मिळेल. तुमच काम पाहून ऑफिसमध्ये तुमची पदोन्नती होण्याची सुद्धा शक्यता आहे. पण त्याचबरोबर वरिष्ठ कर्मचारी तुमच काम पाहूनच तुमच्यावर मोठी जबाबदारी सुद्धा सोपवू शकतात.

आता जे परदेशात जाण्याचा विचार आहेत किंवा तसे प्रयत्न करत आहेत किंवा तसं त्यांचं स्वप्न आहे तर तसे योग या महिन्यामध्ये आहेत.  आई-वडिलांचा तुम्हाला पूर्ण सहकार्य लावताना दिसणारे त्याचबरोबर कुटुंबाबरोबर सुद्धा तुम्ही चांगला वेळ घालवताना दिसणार आहे. वैवाहिक जीवनात ज्या काही समस्या होत्या त्या आता समाप्त होऊ शकतात.

आता बघूया की तुम्हाला कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे किंवा कुठल्या गोष्टी या तुमच्या मनाविरुद्ध घडण्याची शक्यता आहे. तुमच्या खर्चावर तुम्हाला नियंत्रण ठेवावा लागेल जरी धनलाभाचे योग असले तरी तुम्ही खर्च जर मोकळ्या हाताने केला तर तुमच्या हाती काहीच राहणार नाही. त्यामुळे खर्चावर जरा नियंत्रण ठेवावे लागेल. त्याबरोबर प्रकृतीकडे लक्ष देण्याची गरज आहे कारण की छोट्या मोठ्या गोष्टींकडे तुम्ही केलेला दुर्लक्ष तुम्हाला महागात पडू शकत. 

आरोग्याच्या बाबतीत सतर्कता ठेवावी लागेल. त्या महिन्यात काही आव्हान तुमच्यासमोर येतील आणि त्या आव्हानांना तुम्हाला सामोरे जावे लागेल. काही अशा अडचणी समोर येऊ शकतात. त्या सोडवण्यासाठी तुम्हाला तुमच बुद्धी कौशल्य वापरावे लागेल. या महिन्यात तुम्हाला परदेश प्रवासाची संधी आहे मी मगाशीच सांगितलय. पण त्यासाठी योग्य ती तयारी करावी लागेल आणि कसर प्रयत्नांमध्ये सोडून देऊन चालणार नाही. थोडक्यात काय तर तुम्हाला जे हवंय ते मिळवण्यासाठी तुम्हाला कसून प्रयत्न करावे लागणार आहेत.

आता ज्या मिथुन राशीच्या व्यक्ती प्रेम संबंधांमध्ये आहे. त्यांच्यासाठी जरा काळात चढ-उताराने भरलेला असेल. एकमेकांना समजून घेण हे तुमच्यापुढ्यावर असेल. त्याचबरोबर कामात व्यस्त असल्यामुळे सुद्धा तुम्ही तुमच्या कुटुंबाला जास्त वेळ देऊ शकणार नाही आणि कुटुंबात त्यामुळे थोडी नाराजी दिसून येईल. त्याकडे तुम्हाला लक्ष द्यावे लागेल.

आता या ज्या काही थोड्याफार अडचणी आहेत तर त्या अडचणी दूर होतील एका उपायाने. तुम्हाला नियमित विष्णुसहस्रनाम म्हणण्याचा सल्ला दिला जातो. जर तुम्हाला विष्णुसहस्रनाम म्हणता येत नसेल तर रोज कमीत कमी ते ऐकाव .ऐकल नाही सुद्धा बऱ्यापैकी लाभ होतो.एकतना मन एकाग्र करून ऐकाव. कानांचे प्राण करून ऐकावे आणि भगवान श्रीहरी विष्णूंचा स्मरण करत ऐकाव.

 एकंदरीतच मिथुन राशीसाठी जून महिना जरा संमिश्र असणार आहे म्हणजे काही चांगल्या गोष्टी घडणारे तशी काही आव्हान सुद्धा तुमच्यासमोर येणार आहेत. चांगली गोष्ट घडणार आहे तुमच्या करिअरच्या बाबतीमध्ये नोकरी मध्ये पदोन्नतीचे योग आहे पण त्याचबरोबर जी आव्हान तुमच्यासमोर येणार आहेत त्यामध्ये खर्चाचा आव्हान असेल त्याच बरोबर तुमच्या आरोग्याचा आव्हान असेल ज्यामुळे तुम्हाला त्याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. 

समाजामध्ये तुमची प्रतिष्ठा आणि सन्मान वाढण्याचे योग सुद्धा जून महिन्यामध्ये येते त्याचबरोबर तुम्ही जे काही कार्य हाती घेतला असेल ते कार्य प्रामाणिकपणे करत राहा त्यामध्ये नक्कीच तुम्हाला यश मिळेल. असा सुद्धा योग जून महिन्यामध्ये आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *