कुंभ रास मे महिन्यात या घटना तुमच्या आयुष्यात घडणार म्हणजे घडणारच.

नमस्कार मित्रांनो.

कुंभ राशीच्या लोकांसाठी मे महिना कसा असणारे बर कोणत्या महत्वाच्या घटना मे महिन्यात कुंभ राशीच्या आयुष्यात घडणार आहेत. चला एक नजर या सगळ्या गोष्टींवर टाकूया. ज्योतिष शास्त्रातील कुंभ हे बुद्धिमत्ता आणि उत्स्फूर्तता तसेच स्वातंत्र्याचा प्रतीक मानला जात. या राशी जन्मलेले लोक जर असे बंडखोर आणि विलक्षण असतात. हे लोक समाजापेक्षा वेगळा विचार करतात आणि म्हणूनच त्यांच्यामध्ये सर्जनशीलता जन्मजात आढळते. हे लोक भावनिक सुद्धा असतात. 

दयाळू आणि प्रेमळपणा यांच्याकडे असतो बर का म्हणजे ही लोक इतरांच्या मदतीसाठी तयार असतात. यांच्याकडे बघून असं जाणवत नाही की हे इतके संवेदनशील असतील पण माणुसकी यांच्यामध्ये भरपूर असतो. गरजू व्यक्तीला मदत करण्यासाठी ते पुढे असतात. कुंभ राशीच्या बाबतीतला आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे यांना कुठलाही गोष्टीतल वरवरच शिक्षण घ्यायला आवडत नाही म्हणजे यांच्या वाटेला जे काय आलं असेल त्याचा सखोल अभ्यास करण्याकडे यांचा भर असतो. 

कुठलीही गोष्ट शिकताना अगदी समरस होऊन त्याच्या खोलाशी जाऊन ती गोष्ट आत्मसात करण यांच्या स्वभावात असत. त्यामुळे मग हे कुठल्याही करिअरमध्ये गेले तरीसुद्धा तिथे यश संपादित करण्यासाठी भरपूर मेहनत घेतात. यांचा अभ्यासू स्वभाव यांना त्या गोष्टीमध्ये एक्सपर्ट बनवतो. आरोग्याचा विचार केला असता कुंभ राशीच्या व्यक्तींना वायू विकार होण्याची शक्यता असते म्हणजे वाताचा त्रास त्यांना होऊ शकतो. म्हणून त्यांनी त्या प्रमाणात काळजी घ्यायाला हावी. 

त्यामुळे व्यवस्थित उपचार घेणं योग्य ती काळजी घेणं या बाबतीमध्ये कुंभ राशीच्या व्यक्तींनी सजग राहायला हव.खास करून तिशी ओलांडल्यानंतर आरोग्याच्या बाबतीमध्ये कुंभ राशीच्या व्यक्तींनी सतर्क राहायला हव. कुंभ राशीच्या लोकांना मोठ्या बदलांना मे महिन्यामध्ये सामोरे जावे लागू शकत. मे २०२४ बद्दल बोलायचं झालं तर १५ मे पासून शुभव्रता मिळण्याचे संकेत आहेत. कुंभ राशीच्या लोकांसाठी मे २०२४ महिना चांगला असणार आहे. या महिन्यामध्ये नवीन नातेसंबंधांची सुरुवात होऊ शकते.

सामाजिक कार्यक्रमांमध्ये उत्साहाने तुम्ही भाग घ्याल. तुम्ही मे महिन्यात नवनवीन गोष्टी एक्सप्लोर कराल. तुम्हाला मे महिन्यात प्रगतीच्या अनेक चांगल्या संधी प्राप्त होतील. रोजच्या धकाधकीच्या जीवनातून थोडी विश्रांती घेऊन स्वतःकडे लक्ष मात्र द्यावे लागेल. तुमच्या करिअर गोल्सवर फोकस करा. मे महिन्यात तुमच्या जीवनात मोठे बदल घडून येतील. कुंभ राशीच्या लोकांसाठी मे महिन्यात नोकरी शिक्षण प्रवास आरोग्य आणि कौटुंबिक बाबतीत कसा असणार आहे ते एकेक करून जाणून घेऊया.

 आता कुंभ राशीचे करियर आणि व्यवसायाचा विचार केला तर जीवनात यशाच्या शिखरावर तुम्ही असाल पण त्याचबरोबर तुम्हाला नवीन आव्हानांना सुद्धा सामोरे जावे लागेल. नवीन काम सुरू करण्यासाठी तुमचा आत्मविश्वास तुम्हाला भरपूर लागेल स्वतःवर विश्वास ठेवून पुढे जा. विचारपूर्वक घेतलेले निर्णय तुमच्या करिअरसाठी फायदेशीर ठरतील. नवीन प्रोजेक्टवर काम केल्याने तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. मे महिना आर्थिक बाबतीत कुंभ राशीसाठी शुभम नाव लागेल. कारण नवीन आर्थिक रणनीती बनवण्यासाठी हा महिना चांगला आहे.

 गुंतवणुकीच्या नवीन संधींवर लक्ष ठेवा दीर्घकालीन गुंतवणूक करण्यावर लक्ष द्या. तुम्हाला या महिन्यात उत्पन्न वाढण्याच्या अनेक चांगल्या संधी मिळतील. वडिलोपार्जित संपत्तीची विभागणी होऊ शकते. ज्यामुळे तुम्हाला चांगला लाभ होईल. पैशांची आवक वाढण्याची शक्यता आहे. भौतिक सुख सोयी वाढतील १५ मे नंतर आर्थिक स्थितीमध्ये सकारात्मक बदल करून येईल. कुंभ राशीचे आरोग्य मे महिन्यामध्ये कसा असणार आहे ते आता बघूया.

 मे महिन्यात तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे तुम्हाला लक्ष द्यावे लागेल. रोज योगासन आणि ध्यान करावे लागेल स्वतःची काळजी घ्यावी लागेल. नवीन फिटनेस रुटीन बनवा आणि ते फॉलो करा. सकस चांगला आहार घ्या म्हणजे तुमचा आरोग्य सुधारेल. मंडळी कुंभ राशीला सध्या साडेसाती चालू आहे. साडेसातीचा कुंभ राशीचा दुसरा टप्पा आहे. पण कुंभ राशीने साडेसातीची चिंता न करता त्यावर उपाय करावेत. 

साडेसातीवर कुंभ राशीने कुठल्या प्रकारचे उपाय करावेत तर उपाय अनेक आहेत त्यातला कुठलाही एक उपाय तुम्ही निवडू शकता. लक्षात घ्या साडेसाती म्हणजे कुठलाही मोठा संकट नाही आपल्याच कर्माची फळ आपल्याला साडेसातीच्या काळात मिळत असतात. म्हणूनच साडेसातीच्या काळामध्ये काही नियम कुंभ राशीच्या लोकांनी अवश्य पाळावे.

१) त्यापैकी पहिला नियम म्हणजे तुमच्या घरातल्या ज्येष्ठ व्यक्तींचा अपमान तुम्ही करू नका. तुमच्या घरामध्ये तुमचे आई-वडील असतील तुमचे आजी-आजोबा असतील किंवा कोणीही जेष्ठ व्यक्ती त्यांचा अपमान त्यांची गैरसोय तुमच्याकडं होणार नाही याची काळजी घ्या. त्यांची सेवा केल्याने तुमची साडेसाती सोपी जाईल. साडेसातीचा त्रास कमी होईल. त्याचबरोबर आई-वडिलांची सेवा ही नित्यच करायला हवीत आई-वडिलांची सेवा केल्याने शनिदेव प्रसन्न होतात. कुंभ राशीचे लोक या साडेसातीच्या काळामध्ये काही स्तोत्र सुद्धा म्हणू शकता. त्याचा लाभ तुम्हाला होऊ शकतो.

२) त्यामध्ये रामदास स्वामींनी लिहिलेलं मारुती स्तोत्र असेल हे मारुती स्तोत्र म्हणायला सोपा आहे आणि छोटा आहे. हे रोज न चुकता तुम्ही म्हटलात तरीसुद्धा साडेसाती मध्ये जो त्रास तुम्हाला होतो आहे त्याची तीव्रता कमी होईल. त्याचबरोबर हनुमान चालीसा सारखा स्तोत्र सुद्धा तुम्ही म्हणू शकता. शनि चालीसा किंवा शनी महात्म्य अशी स्तोत्र सुद्धा तुम्हाला येत असेल तर तुम्ही नक्कीच म्हणू शकता.

 आता तुमच्यापैकी काही जण म्हणतील की आम्हालाही स्तोत्र म्हणतात येत नाही तर त्यावर एक उपाय आहे. स्तोत्र ऐका ते ऐकून ऐकून तुम्हाला शब्द माहित होतील आणि आपोआप म्हणता यायला लागेल. जोपर्यंत म्हणता येत नाही तोपर्यंत तुम्ही रोज न चुकता असतो तर ऐकण्याचा नियम करा ऐकून ऐकून काही दिवसांनी स्तोत्र म्हणतात. स्तोत्र शिकण्याची ही अतिशय उत्तम पद्धत आहे.

३) शनि देवांना प्रसन्न करायचा असेल आणि साडेसातीतला त्रास कमी करायचा असेल तर दानधर्म हा सुद्धा उत्तम उपाय सांगितला जातो. गरीब गरजू समाजातील असाह्य व्यक्ती अपंग व्यक्ती या व्यक्तींना तुम्ही त्यांच्या गरजेनुसार आणि तुमच्या ऐपतीनुसार वस्तू दान करा. शनिवारी हे दान तुम्ही केलं तर अति उत्तम शनि देवांना कर्मफल दाता म्हटले जातात आपलेच कुठल्यातरी जन्माची कर्म असतात किंवा याही जन्माची कर्म असतात की ज्यामुळे आपल्याला साडेसाती मध्ये त्रास होत असतो आणि तो त्रास कमी व्हावा यासाठी प्रायचित्त घेण महत्त्वाच असत. 

म्हणूनच समाजातील गरीब गरजू असाय अपंग अशा व्यक्तींची मदत करणं त्यांची सेवा करण घरातल्या ज्येष्ठांचा उच्चार करण घरातल्या ज्येष्ठांना उचित सन्मान देणं यामुळे शनिदेव प्रसन्न होतात. तुम्ही जर विचार केला तर वागण्यामध्ये माणुसकी धरून वागलं की शनिदेव प्रसन्न होतात हा अगदी साधा सोपा मार्ग शनि देवांना प्रसन्न करण्याचा आहे. माणुसकीला धरून वागा त्याचबरोबर जशी साधना जशी उपासना करणं तुम्हाला शक्य आहे तशी उपासना दिवसातले पंधरा-वीस मिनिटे काढून तरी करा.

नक्कीच तुम्हाला तुमच्या मानसिकतेत झालेला बदल अनुभवायला येईल. ही गोष्ट तुम्ही चालू करा की जेव्हा व्यक्ती साडेसातीतून बाहेर पडते तेव्हा व्यक्तीमध्ये अमुलाग्र बदल झालेला असतो. व्यक्तीला आपल कोण परक कोण याची ओळख झालेली असते. जेव्हा जवळची माणसं सुद्धा साथ देत नाही तेव्हा परकी लोक देवासारखी येऊन उभी राहतात.

तेव्हा माणसाला नातेसंबंध माणुसकी या सगळ्याचाच अर्थ खऱ्या अर्थाने कळत असतो आणि साडेसाती माणसाला आयुष्यातल सत्य दाखवायला आपल्या आयुष्यात येत असते. या सगळ्यातून प्राथमिक बाजू घेऊन पुढे जाण हेच माणसाच्या हातात असत आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी देखील हेच करायचं आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *