‘सोमवती अमावस्या ‘ व सूर्यग्रहण या ५ ठिकाणी लावा ‘दिवे ‘ आणि चमत्कार बघा.

नमस्कार मित्रांनो.

ज्योतिष शास्त्रानुसार यंदा सोमवती अमावस्येला सूर्यग्रहण होणार आहे. या संयोगामध्ये पाच ठिकाणी दिवे नक्की लावावे. ज्यामुळे बिघडलेली काम तर मार्गी लागू शकतातच याचबरोबर पितरही सुखी होऊ शकतात. सोमवती अमावस्या ही ८ एप्रिल २०२४ रोजी आहे. मग सोमवती अमावस्या आणि सूर्यग्रहण या संयोगात करायचा हा विशेष उपाय चला सविस्तर समजून घेऊया. 

वैदिक कॅलेंडरनुसार प्रत्येक हिंदू महिन्याचा शेवटचा दिवस अमावस्या म्हणून ओळखला जातो आणि या दिवशी उपवास पूजा स्नान आणि दान इत्यादींचा विशेष महत्त्व मानले जात. यंदाही वर्षातील पहिलं सूर्यग्रहण सोमवती अमावस्येला होणार आहे. सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. त्यामुळे हे ग्रहण वैद्य ठरणार नाही. मात्र या ग्रहमानाचा प्रभाव सर्वच राशींच्या व्यक्तींवर पडू शकतो. 

पंचांगानुसार यावेळी अमावस्या सोमवार दिनांक ८ एप्रिल रोजी येत आहे. सोमवारी येणाऱ्या अमावस्यासाठी ही अमावस्या सोमवती अमावस्या असेल. सर्व अमावस्यांमध्ये सोमवती अमावस्या अधिक महत्त्वाची मानली जाते. या दिवशी पितरांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी स्नान आणि दानासह पितृ पूजनही केलं जातं.

धार्मिक मान्यतेनुसार सोमवती अमावस्येच्या दिवशी सोबतच काही विशेष उपाय केल्याने विशेष लाभ ही होऊ शकतो आणि जीवनात सुख समृद्धी येण्यासही मदत मिळू शकते. यासोबतच ग्रहदोष पितृदोष इत्यादींपासूनही मुक्ती मिळण्यास नक्कीच मदत मिळू शकते तर सोमवती अमावस्येच्या योग्य वेळे बद्दल आधीच समजून घेऊया. 

वैदिक कॅलेंडरनुसार चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील अमावस्या तिथे आठ एप्रिल रोजी पहाटे ०३:३१ मिनिटांनी सुरू होईल आणि आठ एप्रिल रोजी रात्री ११:५० मिनिटांनी समाप्त होणार आहे. सोमवारी ८ एप्रिल रोजी अमावस्या व्रत पाळण्यात येणार आहे. या विशेष दिवशी इंद्र योग तयार होतात जो संध्याकाळी ०६:१४ मिनिटांपर्यंत असणार आहे. 

सकाळी ०४:५५ मिनिटांपासून ते ०६:३० मिनिटांपर्यंत स्नान आणि दान करण्याचा शुभ मुहूर्त असेल. आता सोमवती अमावस्या आणि सूर्यग्रहणाच्या काळात कोणता विशेष उपाय करावा. तर पाच ठिकाणी  विशेष दिवे लावावे.ज्याचे योग्य परिणाम आपल्याला नक्कीच प्राप्त होऊ शकतात.

१) पहिला दिवा सोमवती अमावस्येच्या दिवशी कच्च्या दुधात दही आणि मध मिसळून भगवान शिवाला अभिषेक करावा आणि चार मुखी तुपाचा दिवा लावावा. यामुळे कामातील अडथळे दूर होतात आणि प्रत्येक कामात यश प्राप्त होऊन सर्वच काम मार्गी लागू शकतात.

२)  सोमवती अमावस्या ला पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून संध्याकाळी तिथे तेलाचा दिवा लावावा आणि पिंपळाच्या झाडाखाली बसून पितृसूक्ताचे पठण कराव यावर पितर प्रसन्न होतात. शिवाय दारिद्र्य किंवा गरिबी नष्ट होण्यास नक्कीच मदत मिळू शकेल.

३) सूर्यास्तानंतर पिठाचा दिवा तलावात किंवा नदीत अर्पण करावा. म्हणजे हा दिवा तरंगत ठेवावा अमावस्येला पूर्वज पृथ्वीवर येतात आणि सूर्यास्ताच्या वेळी आपल्या जगात परततात. वडिलोपार्जित जगात परतताना त्यांच्या मार्गावर अंधार होऊ नये यासाठी पितरांसाठी दिवे लावले जातात असा समज आहे.

४) चौथा दिवा लावावा भगवान हनुमंतासमोर आणि यावेळी सुंदर कांड किंवा हनुमान चालीसाचे पठण कराव. यामुळे शत्रूंचा नाश होतो शनीदोषापासूनही आराम मिळू शकतो.

५) अमावस्येच्या दिवशी रात्रंदिवस उत्तर आणि पूर्व दिशेच्या मध्ये म्हणजे घराच्या ईशान्य कोपऱ्यात हा दिवा लावावा. जमेल त्या पद्धतीने मोहरीच्या तेलाचा किंवा तुपाचा दिवा या दिशेला नक्की लावावा. यामुळे पितर आणि माता लक्ष्मी दोघांचेही आशीर्वाद प्राप्त होऊ शकतात.

आणि पैशाच्या समस्या ही सुटण्यास नक्कीच मदत मिळू शकते किंवा फक्त अमावस्येला संध्याकाळी लाल धागा वापरून केसर घालून तुपाचा दिवा नक्की लावावा. त्यानंतर श्री सुखाचा पठण करावं यामुळे देवी लक्ष्मी घरात टिकून राहण्यास नक्कीच मदत मिळते अस सांगितल जात.

आता सोमवती अमावस्येला सूर्यग्रहणाची छाया असल्याने धनप्राप्तीसाठी ही काही महत्त्वाचे उपाय केले जाऊ शकतात. त्यामुळे देवी लक्ष्मीची आशीर्वाद मिळण्यास नक्कीच मदत मिळू शकेल. आधी सांगितल्याप्रमाणे आठ एप्रिल रोजी सोमवती अमावस्या आहे या दिवशी सूर्यग्रहणही होत आहे. धनसंपत्ती आणि समृद्धीचे आशीर्वाद देते असं सांगितलं जात.

१) पहिला उपाय करावा तो म्हणजे मिठाचा सोमवती अमावस्येच्या दिवशी पाण्यात मीठ टाकून संपूर्ण घर पुसून टाका. असं केल्याने वाईट नजरेपासून आराम मिळतो शिवाय घरातील नकारात्मक ऊर्जाही दूर होण्यास नक्कीच मदत मिळते.

२) त्यानंतर सोमवती अमावस्येच्या दिवशी पिंपळाच झाड लावून त्याची किमान एक वर्षा तरी सेवा करणं खूप शुभ मानले जात. असं केल्याने पितृदूपासून नक्कीच मुक्ती मिळू शकते. त्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा नक्की करावी.

३) त्यानंतरचा उपाय म्हणजे सोमवती अमावस्येला तुळशीची पूजा सुद्धा नक्की करावी. त्याच्याभोवती प्रदक्षिणा घालावी तुपाचा दिवाही रात्री तेव्हा ठेवावा असं केल्याने देवी लक्ष्मीची आशीर्वाद आपल्यावर राहतात आणि धनधान्य सुख समृद्धीचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होऊ शकतात असं सांगितलं जात.

तर सोमवती अमावस्या आणि सूर्यग्रहण या संयोगामध्ये पाच दिवे नक्की लावावे. त्यामुळे आपल्याला नक्कीच पित्रांच्या आशीर्वाद मिळून देवी लक्ष्मीची ही आशीर्वाद प्राप्त होऊ शकतात. हे विशेष उपाय तुमच्यासाठी सुद्धा सुखद अनुभवाचे ठरू शकतात.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *