एक मोठा संयोग मौनी अमावस्या या ठिकाणी लावा एक दिवा पितृदोष आशीर्वादात बदलून जातील.

नमस्कार मित्रांनो.

मौनी अमावस्येचे हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे. शास्त्रानुसार मौनी अमावस्येला सर्वात मोठी अमावस्या मानले जाते. मौनी मावशीला केले जाणारे जप दानधर्म आणि उपाय खूप लवकर फळ प्राप्त करून देणारे असतात. आज मी तुम्हाला मौनी अमावस्येच्या दिवशी करायला एक साधा सोपा उपाय मी सांगणार आहे. पौष महिन्यात येणारी ही अमावस्या आहे.

पौष महिन्यात धार्मिक कार्य जास्तीत जास्त केली जात नाहीत. ती शक्यतो टाळले जातात किंवा पुढे ढकलली जातात आणि मौनी   अमावस्येच्या दुसऱ्या दिवसापासून आपण भगवंतांचे पूजन करायला सुरुवात करतो. म्हणून या दिवसाला दिवसाला विशेष महत्त्व आहे हा उपाय करताना अमावस्येच्या रात्री आपल्या देव घरासमोर आसन टाकून त्यावरती बसावे आणि तुपाचा दिवा लावावा. 

अखंड लवंग घ्यावी ती कुठेही तुटलेली नसावी. ती अखंड लवंग दिव्याच्या उजव्या बाजूला ठेवून द्यावी. त्यानंतर श्रीहरी विष्णू भगवंतांचा प्रिय मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा तेथेच बसून १०८ वेळा जप करावा. मंत्राच्या पूर्ण झाल्यानंतर श्रीहरी विष्णू भगवंत आणि देवी लक्ष्मी यांना नमस्कार करावा. 

त्यानंतर आपण मंत्राचा जप करण्यापूर्वीची लवंग दिव्याजवळ ठेवले होते ते आपल्या उजव्या हाताने उचलावी व आपल्या तळहातावर ठेवावी. मग त्या लवंगे कडे बघून आपल्या काही अडचणी दुःख त्रास असेल ते सर्व सांगून टाकावे. परंतु हे कार्य करताना या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यावे की आपल्याला मध्येच कोणी टोकू नये किंवा आपल्याशी बोलू नये आणि विचारू नये की हे काय करीत आहात.

आपल्या सर्व अडचणी सांगितल्यानंतर ती मूठ बंद करावी व लवंग मुठीतच ठेवून आपल्या घराच्या टेरेसवर जावे. जर आपल्या घराला टेरेस नसेल तर एखाद्या मोकळ्या जागेतही आपण जाऊ शकता. मग टेरेसवर किंवा मैदानात जाऊन उत्तर दिशेकडे तोंड करून उभे रहावे व आपल्या उजव्या हातात आपण जे लवंग ठेवले आहे ते स्वतः वरून सात वेळा उतरवावी. 

ही उतरवण्याची क्रिया आपल्याला घड्याळाच्या दिशेने करायचे आहे. म्हणजेच उजवे करून डावीकडे उतरत उतरत जाणे उलन दिशेने चुकूनही उतरवू नये. लवंग उतरवल्यानंतर ते लवंग आपल्या डोक्यावरून मागच्या बाजूला म्हणजेच दक्षिण दिशेकडे जास्तीत जास्त लांब जाईल अशा प्रकारे टाकावी. लवंग फेकल्यानंतर मागे वळून न पाहता सरळ घरी परतावे.

जर आपण हा उपाय स्वतःच्या टेरेसवरच करणार असाल तरीही मागे वळून न पाहता आणि रस्त्याने कोणाशीही काहीही न बोलता घरी परत यावे. जर आपण टेरेसवर दक्षिणेकडे लवंग फेकल्यानंतर एखाद्या भिंतीला लागून ते परत आपल्या टेरेसवरच पडली असेल तर ती तशीच रात्रभर पडू द्यावी. मग दुसऱ्या दिवशी टेरेसवर जाऊन एखाद्या कागदाने किंवा कपड्याने ती लवंग उचलावी. 

लक्षात ठेवावे की आपल्या हाताचा स्पर्श लवंगेला लागता कामा नये. मग त्या लवंगच्या कागदात कागदात पुढे पुढे बांधून व त्या पाण्यात ती पुढील प्रवाहित करावी. जर आपल्या घराच्या आसपास नदी किंवा तलाव नसेल तर एखाद्या मोकळ्या मैदानात जाऊन दक्षिण दिशेला ती लवंग खड्डा करून त्या खड्ड्यात पुरून द्यावी.

या उपायाला करताना जितके शक्य होईल तितका ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत राहावा. हा उपाय केल्यास लगेच आपल्याला पॉझिटिव्ह ऊर्जेचा अनुभव येईल. मग आपल्यातील सर्व निगेटिव्ह ऊर्जा निघून जाईल. आपण संपूर्ण विश्वासाने आणि श्रद्धेने केले तरच याचा आपल्याला फायदा होईल. कारण विश्वास नसेल तर काहीच नाही.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *