मकर संक्रात शुभ योग, या ५ राशींना सर्वोत्तम लाभ..!

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो यंदा पंधरा जानेवारी २०२४ ला आहे मकर संक्रांत आणि या मकर संक्रांतीला ७७ वर्षांनी अत्यंत शुभ योग जुळून आलाय ज्याचा लाभ पाच राशींना होणार आहे. त्या ५ राशीन पैकी पहिली रास आहे मेष रास दुसरी रास आहे  वृषभ तिसरी रास आहे सिंह चौथी रास आहे वृश्चिक आणि पाचवी रास आहे मीन रास या राशींना प्रदेशातून लाभ नोकरीत पदोन्नती या प्रकारचे वेगवेगळे लाभ पाहायला मिळतील. चला सविस्तर जाणून घेऊया. 

नवीन वर्ष सुरू झाल नवीन वर्षातील पहिला मोठा सण म्हणजे मकर संक्रांत नवग्रहांचा राजा मानला गेला सूर्य मकर राशीच्या दिवशी प्रवेश करतो. सूर्याच्या राशीतील संक्रमणाला संक्रांती म्हटलं जातं आणि सूर्याचा मकर राशीतील प्रवेश हा मकर संक्रांत म्हणून ओळखला जातो. १५ जानेवारी २०२४ ला सूर्य मकर राशि मध्ये प्रवेश करणार आहे. मकर संक्रातीचा पुण्यकाळ सकाळी ०७:१० मिनिटांपासून ते संध्याकाळी ०६:२० मिनिटांपर्यंतच आहे. 

तर १६ जानेवारी रोजी किंक्रांत आहे. सूर्याचा मकर राशीतील प्रवेश अनेक अर्थाने सकारात्मक मानला जातो. ७७ वर्षांनी मकर संक्रांतीला शुभ योग जुळून येतोय. सूर्याचा मकर राशीतील प्रवेश पाच राशींच्या व्यक्तींना शुभदायक लाभदायक आहे. सूर्याचे मकर राशीत होणारे संक्रमण काही राशींच्या लोकांना आर्थिक लाभ कौटुंबिक बाबतीत सकारात्मकता देणार आहे.

१) मेष रास- मेष राशीच्या व्यक्तींना यशकारक असा हा काळ आहे. करिअरमध्ये अनेक चांगल्या संधी आणि यश मिळू शकत. एवढंच नाही तर करिअरमध्ये व्याप्ती वाढवण्यात यशस्वी व्हाल. नोकरदारांनाही चांगल्या संधी मिळू शकतात. परदेशात जाण्याची संधी सुद्धा येण्याची शक्यता आहे. परदेशातून जास्त नफा आणि परतावा मिळू शकतो. त्यात तुम्ही यशस्वी होऊ शकता. जोडीदारासोबत चांगले आणि प्रामाणिकपणा दाखवण्यात यशस्वी व्हाल. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्या लोकांना ही चांगली यश मिळू शकते.

२) वृषभ रास – वृषभ राशीच्या व्यक्तींना अनेक चांगल्या संधी या काळात मिळतील. करिअरच्या दृष्टीने खूप भाग्यवान हा काळ त्यांच्यासाठी ठरणार आहे. जे लोक परदेशात नोकरी करत आहेत त्यांनाही चांगले यश मिळू शकत. नशिबाची उत्तम साथ या काळात मिळू शकते. संपत्तीच्या दृष्टीने खूप चांगले आणि लाभदायक परिणाम मिळतील. गुंतवणूक करून चांगले पैसे सुद्धा परतावा म्हणून मिळतील. या काळात जोडीदाराच्या सोबतचा नातं सकारात्मक असणार आहे. कुटुंबातील परिस्थिती आनंदाने भरलेले असेल.

३) सिंह रास – सिंह राशीच्या व्यक्तींना चांगले यश आणि मान्यता मिळण्याची योग आहेत. व्यवसायात अपेक्षित नफा मिळवण्याच्या दृष्टीने सुद्धा हा काय चांगला आहे. व्यावसायिक भागीदारी काम करणाऱ्यांना पूर्ण सहकार्य मिळेल. उच्च पातळीवर नफा मिळण्याची शक्यता आहे. भोकरदरांना प्रयत्नातून यश मिळेल. नोकरी करणाऱ्यांना बळतीस योग आहेत.

४) वृश्चिक रास – वृश्चिक राशीच्या व्यक्तींना प्रयत्नातून यश मिळणार आहे. प्रवासाचा लाभ होईल. सगळ्यांचा सहकार्य मिळेल . भावंड खास करून पूर्ण सहकार्य तुम्हाला या काळात करताना दिसतील. करिअरशी संबंधित प्रवास तुम्हाला करावा लागू शकतो. त्याचबरोबर तुमच्या जोडीदाराशी सुद्धा तुमचं नातं घट्ट होईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वृश्चिक राशीच्या व्यक्तींची हिम्मत या काळात वाढणार आहे.खरंतर त्यांच्यामध्ये हिम्मत भरपूर असते. पण तरीसुद्धा तुमची हिम्मत वाढलेली तुम्हाला या काळात  दिसेल.

५) मीन रास – मीन राशीच्या व्यक्तींना करिअरमध्ये उत्तम संधी मिळतील. पूर्णपणे तुम्ही समाधानी दिसाल. प्रमोशन मिळण्याचे सुद्धा योग आहेत. अनेक गोष्टींनी आश्चर्यचकित होऊ शकाल. आयुष्यात आनंद येऊ शकतो. आर्थिक दृष्टिकोनातून चांगले आर्थिक लाभ मिळू शकतात. जोडीदाराशी नातं घट्ट होईल नात्यात प्रेमाची भावना निर्माण होईल. आत्मविश्वास उच्च पातळीवर  असेल.

मित्रांनो तर या होत्या त्या पाच राशी ज्यांच्यासाठी हा काळ चांगला असणार आहे. पण काय चांगला असला तरी सुद्धा मकर संक्रांतीच्या दिवशी काही गोष्टी या राशीने आवश्यक करा. मकर संक्रांतीला विशेष महत्त्व आहे आणि ते म्हणजे सूर्यदेव आपला मुलगा शनिदेव यांच्या घरी जातात अशी धार्मिक मान्यता आहे. 

ज्योतिष शास्त्र नुसार मकर ही शनि देवाची रास आहे आणि सूर्य आणि शनि जरी पिता पुत्र असले तरी हे दोन शत्रू ग्रह आहेत. कारण यांच्या ऊर्जा वेगवेगळ्या आहेत म्हणूनच काही उपाय करायला सुद्धा मकर संक्रांतीला सांगितले जातात. ते उपाय चांगला लाभ देऊन जातात असेही म्हटलं जात.

१) मकर संक्रांतीच्या दिवशी जो उपाय करायचे त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सूर्योदयाच्या वेळी सूर्याला जल अर्पण करायच. सकाळी लवकर उठायचं स्नान करायचं आणि बरोबर सूर्योदयाच्या वेळी सूर्याला जल अर्पण करायचा आहे. तांब्याचा कलश घ्यायचा आणि त्यामध्ये पाणी घेऊन ते सूर्याला मंत्र बोलत अर्पण करायचा आहे.

२) दुसरी गोष्ट स्नान करताना तुम्हाला काळे तीळ तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचा आहे.

३) मकर संक्रांतीच्या दिवशी दान धर्म आवश्यक करावा त्यामुळे पुण्याची प्राप्ती होते. मकर संक्रांतीच्या दिवशी दानधर्म केल्याने कुंडलीत असलेले दोष दूर होतात. खास करून अन्नदान वस्त्रदान मिळतात या गोष्टी मकर संक्रांतीच्या दिवशी दान कराव्या. थंडीचे दिवस असतात त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही ब्लॅंकेट सही दान करू शकतात. गोरगरिबांना ब्लॅंकेट वाटलांनी सुद्धा कुंडलीतील शनिदोष दूर होतो. काळा रंगाची असेल तर अति उत्तम.

४) त्यानंतर तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी आणखीन काही उपाय करू शकतात ते उपाय म्हणजे तुमचा जर व्यवसाय असेल दुकान असेल तुमच्या दुकानात येणाऱ्या प्रत्येकाला तिळाची वडी तिळगुळाची वडी नक्की द्या. हा सुद्धा एक ज्योतिषशास्त्र उपाय आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी आपण तिळगुळ वाटतोच पण हा एक ज्योतिषशास्त्र उपाय आहे हे तुम्हाला निश्चितच माहीत नसेल. खास करून त्यांचा व्यवसाय चालत नाही त्यांनी हा उपाय करावा असं सांगितल जात. 

तिळगुळाच्या वड्या बनवून व्यवसायाच्या ठिकाणी घेऊन जाव्या आणि व्यवसायाच्या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला या तिळगुळाच्या वड्यांचा वाटप कराव. मकर संक्रांतीच्या दिवशी हे उपाय अवश्य करावे खास करून मकर रास कुंभ रास आणि मीन रास यांना साडेसाती चालू आहे आणि या व्यक्तींनी मकर संक्रांतीचा लाभ घ्यायचाय मकर संक्रांतीच्या दिवशी अन्नदान वस्त्रदान करायचा आहे.

कारण साडेसाती चालू असताना या प्रकारे दान पुण्य केल्याने तेही मकर संक्रांतीच्या काळात लाभ होतो जर काही त्रास असेल तर तो दूर होतो. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव हे शनि महाराजांच्या मकर राशीमध्ये प्रवेश करत असतात आणि शनी संदर्भातले उपाय या दिवशी केल्याने लाभ देतात.

मित्रांनो यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे मकर संक्राती दिवशी या चुका नक्की करू नयेत. त्या म्हणजे विवाद भांडणं कटकटी या गोष्टी मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही करू नये. त्यामुळे आर्थिक समस्या भविष्यामध्ये निर्माण होतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्या घरातल वातावरण प्रसन्न राहील असा प्रयत्न करावा. 

कुणालाही फसवणे कुणाशी खोटं बोलू नये. या काही साध्या साध्या गोष्टी आहेत त्या मकर संक्रांतीच्या दिवशी अवश्य पाळाव्यात. मकर संक्रांतीच्या दिवशी मुगाच्या डाळीची खिचडी सुद्धा दान करायला सांगितली जाते.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *