मार्गशीर्ष गुरुवारचे उद्यापन केव्हा करावे? उद्यापनाची योग्य पद्धत काय वाचा सविस्तर माहिती येथे.

नमस्कार मित्रांनो.

आता मार्गशीर्ष महिना चालू आहे. सर्व महिलांचे गुरुवारचे महालक्ष्मीची व्रत चालू आहे. यावर्षी मार्गशीर्ष महिन्यात पाच गुरुवार आलेले आहेत. ११ जानेवारीला शेवटचा म्हणजेच पाचवा गुरुवार आहे. त्याच दिवशी अमावस्या आहे. अमावस्या स्थितीची सुरुवात बुधवारी दहा जानेवारीला रात्री आठ वाजून अकरा मिनिटांनी होणार असून अमावस्या तिथीची समाप्ती गुरुवारी ११ जानेवारीला संध्याकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटांनी होणार आहे. 

पाचवा गुरुवार म्हणजे उद्यापणाचा दिवस आणि या दिवशी अमावस्या असल्यामुळे सर्व महिलांना असा प्रश्न पडला आहे कि उद्यापन कधी करावे. तर आज आपण हेच जाणून घेणार आहोत. ही गुरुवारी अमावस्या असल्यामुळे आपण उद्यापन नेमके कधी करावे ते चौथ्या गुरुवारी करावे की पाचव्या गुरुवारी करावे. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी जर अमावस्या आली तर सर्व महिला काय करतात तर त्या दिवशी उद्यापन करत नाहीत का तर त्या दिवशी अमावस्या आहे.

 ते सुद्धा त्या महिन्यातील एक तिथे आहे हे का त्या महिला लक्षात घेत नाहीत. दिवाळीतील लक्ष्मीपूजन हे अमावस्येच्या दिवशीच असते आणि लक्ष्मीपूजनाची वेळ ही अमावस्या काळातच दिलेली असते. त्या दिवशी आपण त्या दिलेल्या वेळेतच लक्ष्मीपूजन करतो ना मग आता महालक्ष्मीचे व्रत उद्यापन जर अमावस्येच्या दिवशी आले तर कुठे बिघडले. 

आणि आपण कधीही असे विचार करतो का की जर अमावस्येच्या दिवशी कोणाचा जन्म झाला तर ते मूळ आपण टाकून देतो का किंवा अमावस्येच्या दिवशी आपण मृत्यू आला तर त्या मृत्यूला नाही म्हणतो का? नाही ना काही गोष्ट आपल्या हातात नाहीत. म्हणून ज्या दिवशी जे काही आले आहे ते बिनधास्तपणे करायचे.त्यात शंका कुशंका कशासाठी घ्यायच्या.

यावर्षी मार्गशीर्ष महिन्यात पाच गुरुवार आल्याने लोकांना प्रश्न पडला आहे की, चार गुरुवार करावे की पाच गुरुवार करावे आणि शेवट शेवटचा गुरुवार अमावस्येचा असल्याने ते तर तो खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. मात्र धर्मसिंधू आणि निर्णयसिंधू ग्रंथानुसार अमावसे युक्त गुरुवार असेल तरी तो गुरुवार व्रत करण्यासाठी योग्य मानण्यात येतो. त्यामुळे या दिवशी उपवास करावे यासह नित्यनेमानुसार आपले व्रत पूर्ण करावे. 

पूजन पूर्ण करावे यासाठी कुठलीही शंका मनात ठेवण्याचे कारण नाही. या उलट मार्गशीर्ष महिन्यात देवीचे व्रत करण्यासाठी एक गुरुवार अधिक मिळाला असल्याने फक्त भावाने पूजन करावे आणि उत्साहाने देवीचे उद्यापन करावे. तर मित्रांनो आता आपल्या लक्षात आलेच असेल हे शेवटचा गुरुवार चौथा धरावा की पाचवा म्हणजे पाचव्या गुरुवारी आपण उत्साहात आणि आनंदात देवी व्रताचे उद्यापन करू शकतो.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *