७ महिने ६ राशींना वरदान, अपार लाभ..! मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील.

नमस्कार मित्रांनो.

मंडळी मेष वृषभ कन्या या तीन राशीचा आणखीन तीन राशी अशा ज्यांना येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या आयुष्यात सकारात्मक घटना बघायला मिळतील. येणारे सात महिने त्यांच्यासाठी खास असतील. पण नक्की कोणते सात महिने आणि त्या आणखीन तीन राशीत त्या कोणत्या आहेत बरं या राशींच्या आयुष्यात काय बदल होणार आहेत.

चला जाणून घेऊया. मंडळी ज्योतिष शास्त्रानुसार नोव्हेंबर महिना अतिशय विशेष आहे.नवग्रहांचा न्यायाधीश मानले गेलेले शनि महाराज हे स्वराशीत म्हणजेच कुंभ राशीत मार्गी होत आहेत. सुमारे १४१ दिवसांपूर्वी शनी कुंभ राशीत वक्री झाले होते.आता चार नोव्हेंबरला शनि महाराज मार्गी झाले आहेत आणि याच शनि महाराजाच्या मार्गी होण्याचा लाभ काही राशींना होणार आहे.

२०२५ पर्यंत शनी कुंभ राशीत विराजमान असतील आणि त्यामुळे सध्याच्या घडीला मकर राशीचा साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू आहे. कुंभ राशीचा साडेसातीचा मधला टप्पा अर्थात दुसरा टप्पा सुरू आहे आणि मीन राशीचा साडेसातीचा पहिला टप्पा सुरू आहे. शनी ग्रहाने मीन राशि प्रवेश केल्यावर मकर राशीची साडेसाती संपणार आहे. 

जून २०२४ पर्यंत शनि महाराज कुंभ राशीचा मार्गी चलनाने विराजमान असणार आहेत. या कालावधीत शनीची काही राशींवर अपार कृपा होईल त्या राशींना अपार ला पाहायला मिळेल काही गोष्टी त्यांच्या आयुष्यात मनासारख्या घडून येतील. कोणत्या राशी आणि काही उपाय आहेत का ज्या राशींचे नाव या यादीमध्ये नाहीयेत त्यांच्यासाठी काय उपाय आहेत का ते सुद्धा आपण बघणार आहोत.

१) मेष रास – बुद्धिमत्तेच्या जोरावर मेष राशीची लोक चांगला निर्णय घेण्यात यशस्वी होतील. हे निर्णय त्यांच्या हिताचे ठरतील. करिअरमध्ये शनि महाराज खूप साथ देतील. पदोन्नती आणि यशही मिळेल. एवढ्यात नाहीतर या काळात सहकाऱ्यांच सहकार्य सुद्धा तुम्हाला लाभेल. आर्थिक लाभही मिळतील. व्यवसायिकांसाठी सुद्धा हा काळ उत्तम असणार आहे.शक्य असल्यास ओम बुद्धाय नमः या मंत्राचा रोज ४१ वेळा जप केल्यास ला पाहायला मिळतील.

२) वृषभ रास – वृषभ राशीच्या लोकांना सुद्धा नशीब पूर्ण साथ देणार आहे. करिअरच्या दृष्टिकोनातून या काळात चांगल समाधान त्यांना मिळेल. जे व्यवसाय करतायेत त्यांना या काळात विशेष डीलसही मिळू शकतात. शनीच्या मार्गे झाल्याने धनप्राप्ती आणि धनसंचय करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. या काळात तुमची चांगली बचत झालेली पाहायला मिळेल. आरोग्य ही चांगल राहील कुटुंबीयांची संबंध अनुकूल असतील. शक्य असेल तर तुम्ही भगवान शहरी विष्णूंच्या एखाद्या मंत्राचा जप रोज ४१ वेळा करावा. त्याचा तुम्हाला लाभ होईल.

३) मिथुन रास – शनीचा कुंभ राशीत मार्गी होण काहीच संमिश्र कुंभ राशीसाठी असणार आहे. म्हणजे करिअरमध्ये त्यांना यश मिळण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल तरच यश मिळेल. व्यवसायिकांना या काळात भागीदारांकडून पूर्ण सहकार्यांना मिळाल्याने काहीस नुकसान सहन करावे लागू शकत. जोडीदाराशी संबंध थोडेसे बिघडू शकतात. समन्वय राखण्याचा प्रयत्न तुम्हाला करावा लागेल. आर्थिक स्थिती सामान्य असेल बचतीच्या योजना यशस्वी होतीलच अस नाही. तब्येतीची काळजी घ्यावी लागेल यत्ता शक्ती दान धर्म करावा लागेल.

४) कर्क रास – अपेक्षित यश आणि लाभ कर्क राशीला मात्र मिळणार नाही. जवळच्या लोकांशी तुमचे संबंध बिघडू शकतात. व्यावसायिकांना त्यांच्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा कमी यश बघायला मिळेल. नुकसान ही कदाचित सहन करावा लागू शकतात आर्थिक स्थिती बिघडू शकते. जोडीदाराच्या सोबतच्या नात्यांमध्ये सुद्धा काही कुरबूरी पाहायला मिळतील. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. तुम्हाला शक्य असेल तर शनिवारी पिंपळाच्या झाडाची प्रदक्षिणा घाला आणि पाणी अर्पण करा. त्यामुळे तुम्हाला लाभ होईल.

५) सिंह रास – सिंह राशीच्या करिअरमध्ये जरा चढ-उतार येऊ शकतात. वैयक्तिक जीवनात काही समस्या ही दिसू शकतात. जे काही काम कराल त्यात समाधान न मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी जास्त नफा मिळवण्याच्या प्रयत्नात तुम्ही अयशस्वी होऊ शकतात. व्यवसायिकांचे भागीदारांची थोडेसे मतभेदही पाहायला मिळतील. 

आर्थिक स्थिती सामान्य असेल आणि कौटुंबिक जीवनात संयम समजूतदारपणा दाखवावा लागेल. लोकच ठेवण्याचाही तुम्हाला प्रयत्न करतील परंतु तुम्ही संयम गमावू नका. तुम्हाला या सगळ्यावर एक उपाय आहे तो उपाय म्हणजे तुम्हाला ओम नमः शिवाय या मंत्राचा रोज १०८ वेळा जप करायचा. यामुळे महादेवांच्या कृपेने तुमच्या समस्या दूर होतील.

६) कन्या रास- कन्या राशीसाठी मात्र येणारा काळ प्रगतीकारक आहे. करिअरमध्ये इच्छा पूर्ण करणाऱ्या घटना घडतील. या काळात नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. कामाच्या ठिकाणी उच्चस्तरीय लाभ मिळतील. नशिबाची पूर्ण साथ मिळेल. धनलाभ होण्याची सुद्धा शक्यता आहे. आर्थिक लाभ मिळवण्यासाठी मित्रांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. आयुष्यात आनंदी काळ येईल. परकीय स्रोतांकडून सुद्धा आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. शक्य असेल तर सोमवारी महादेव शिवशंकरांचे यज्ञ किंवा हवन करावे.

७) तुळ रास-  तूळ राशीला सुद्धा जीवनात समाधान मिळेल. मोठी कामे सहज पूर्ण होतील. नफा मिळवण्याचे त्यांचे प्रयत्न यशस्वी होतील.  प्रमोशन मिळण्याचे संकेत आहेत. परदेशात नोकरी ज्यांना करायचे आहे त्यांनाही चांगल्या संधी मिळताना दिसतील.व्यवसायात अनेक महत्त्वाचे बदल होऊ शकतात. पण ते फायदेशीर असतील. नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यासाठी वेळ अनुकूल आहे. शक्य असेल तर जून २०२४ पर्यंत नियमित दर गुरुवारी गुरु ग्रहाचे पूजन करावे.

८) वृश्चिक रास – धावपळ आणि दगदग वृश्चिक राशीचे होण्याची शक्यता आहे. आराम मिळणार नाही खर्चात अनावश्यक वाढ होईल. कामाच्या ठिकाणी मध्यम फायदा मिळेल. व्यवसायिकांना अनेक माध्यमांना सामोरे जावे लागेल. आर्थिक स्थिती ही मध्यम राहील. नवीन योजनांमध्ये मोठी गुंतवणूक न करण हिताचे ठरेल. कुटुंबात कोणाशी तरी वाद किंवा मतभेद होण्याची सुद्धा शक्यता आहे. पण काळजी करू नका या सर्वांवर उपाय आहे आणि तो म्हणजे यथाशक्ती शनी स्तोत्राचा पठण कराव किंवा श्रवण तरी कराव. यामुळे तुमच्या ज्या समस्या आहेत त्या दूर व्हायला मदत होईल.

९) धनु रास – कौटुंबिक पातळीवर आणि आर्थिक आघाडीवर तर तुम्ही यशस्वी व्हाल. वैयक्तिक विकासात अनुकूल परिणाम मिळतील. परदेशात करिअर करण्याच्या काही संधी मिळू शकतात. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ कामगिरीवर खुश असतील. वैवाहिक जीवन खूप चांगल जाणार आहे. एक वेगळी फेमस तुम्हाला या काळात पाहायला मिळेल. शक्य असेल तर योग्य मार्गदर्शन घेऊन शनी यंत्र स्थापन करा आणि दररोजनी मंत्राचा जप करा.

१०) मकर रास – मकर राशीला धनलाभाचे योग आहेत. जीवनात अधिक पैसे कमवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. नशीब चांगली साथ देईल. नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात. जीवनात आनंद आणि पैसा समाधान लाभेल. नोकरीच्या ठिकाणी तुम्ही जे काम कराल त्यातून तुम्हाला आदर मिळेल. व्यावसायिक क्षेत्रात चांगला नफा मिळू शकेल. चांगला परतावा ही मिळेल. करिअरमध्ये कोणताही काम कराल तर चांगले आर्थिक लाभ मिळतील. शक्य असेल तर शनिवारी घरात शमीच रोप लावावे.

११) कुंभ रास – आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते. खर्च वाढणार आहेत. कामाच्या ठिकाणी कामगिरी काही विशेष असणार नाही. मेहनतीचे कौतुक होईल अशी अपेक्षा करू नका. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील तरच बचत होऊ शकेल.

१२) मीन रास – मीन राशीला संमिश्र परिणाम मिळतील म्हणजे नफा झाला तरी खर्चही वाढेल. कामाच्या ठिकाणी अधिक दबाव जाणवेल. अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळणार नाही आणि आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. नोकरी बदल करण्याचा विचार करत असाल तर ते शक्य होऊ शकत. व्यापारी वर्गातील लोकांना चांगला नफा मिळू शकतो, कुटुंबातील जीवन मात्र अनुकूल असेलच अस नाही. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल शक्य असेल तर यथाशक्ती शनी स्तोत्राचा पठाण कराव आणि श्रवण कराव. कुंभ राशीच्या लोकांसाठी सुद्धा हा उपाय आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *