९९% टक्के आपले प्रश्न आपल्या अडचणी स्वामींची ही सेवा केल्याने सुटतील.

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो तुम्ही ही स्वामींची सेवा केल्याने तुमचे प्रश्न तुमची अडचण ९९% सुटतील मित्रांनो ही सेवा महिला पुरुष कोणीही करू शकतात. कोणत्याही दिवसापासून तुम्ही ही सेवा करू शकता सहा महिने एक वर्ष किंवा कायमस्वरूपी तुम्ही सेवा करू शकतात सकाळी किंवा संध्याकाळी करायची आहे देवघरासमोर बसून ही सेवा करायची आहे कोणत्याही एका वेळेस करायचे आहे.

या सेवेमध्ये तुम्हाला सगळ्यात आधी श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे क्रमशः तीन अध्याय रोज वाचायचे स्वामी चरित्र सारामृत यामध्ये एकूण २१अध्याय असतात. तीन तीन अध्याय रोज वाचल्याने हे सारामृत सात दिवसात पूर्ण होते. परंतु आठव्या दिवसापासून परत तीन अध्याय वाचायचे असे कायमस्वरूपी रोज तीन तीन अध्याय वाचायचे त्यानंतर अकरा माळी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा. त्यानंतर गायत्री मंत्राचा जप तीन माळी करावा गायत्री मंत्र काहीसा असा आहे. 

(ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरे भर्गो देवस्य धीमहि दियो योन हा प्रचोदयात) या मंत्राचा जप तुम्हाला तीन माळ करायचा आहे गायत्री मंत्राचा जप तुम्हाला तीन माळ करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला रोज पंचमहायज्ञ करायचा आहे. आता पंच महायज्ञ म्हणजे काय तर या यज्ञांमध्ये पाच प्रकारचे यज्ञ असतात

१) देवयज्ञ- याला दररोज सकाळी एक चमचा शुद्ध तूप घेऊन अग्नीला घालावे. २) ऋषीयज्ञ- या यज्ञात दररोज गाईला एक घास अन्न घालावे. ३) मनुष्य यज्ञ- दररोज एक मनुष्यजीव म्हणजेच अतिथी चहापाणी गोळ्या बिस्किटे देऊन त्याचे स्वागत करावे याचे मन संतुष्ट करावे.

४) पितृ यज्ञ- या यज्ञात तुम्ही कावळ्याला दुपारी बारानंतर एक घास अन्न छतावर घालावे. ५) भूत यज्ञ- या यज्ञात दररोज मुंग्यांना थोडीशी साखर भिंतीच्या कडेला ठेवावी.

तर अशी ही स्वामींची सेवा आहे तुम्ही जर केली तर ९९% तुमचे प्रश्न तुमच्या अडचणी नक्की सुटतील.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *