नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो गुरुवारी पैसे उधार घेऊ नये व उधार देऊ नये गुरुवारला ब्रहस्पती वार असे देखील म्हणतात आणि हा भगवान ब्रहस्पतील समर्पित आहे या दिवशी भगवान बृहस्पतीची विधिवत पूजा केली जाते बृहस्पती हा सर्वात मोठा ग्रह मानला जातो. तसेच त्याला देवांचा गुरु देखील म्हटले जाते गुरुवारी विष्णूची देखील पूजा केली जाते.
असे मानले जाते की, या दिवशी भगवान विष्णूची पूजा आणि उपवास केल्याने भगवान विष्णू लवकर प्रसन्न होतात गुरुवारी गुरु ग्रहाची पूजा केल्याने विवाहाच्या मार्गातील अडथळे दूर होतात यासोबतच गृहस्पती ग्रहाच्या कृपेने उच्च शिक्षण आणि अपार संपत्ती मिळण्याची शक्यता असते तुम्हालाही नोकरी उच्च शिक्षण हवे असेल तर भगवान बृहस्पतीची पूजा गुरुवारी नक्की करा.
यासोबतच काही उपाययोजनाही तुम्ही करायला हव्यात मित्रांनो या दिवशी पिवळ्या रंगाच्या वस्तूंचा अधिकाधिक वापर सकाळी आंघोळ केल्यावर पिवळे कपडे घाला याशिवाय गुरुवारी व्रत केल्यास पिवळी फळ खावेत गुरुवारी ब्रह्म मुहूर्तावर स्नान करणे अत्यंत शुभ मानले जाते या दिवशी स्नान केल्यानंतर ओम गृहस्पते नमः हा जप केल्याने धनात प्रगती होते असे मानले जाते.
मित्रांनो गुरुवारी भगवान विष्णूची आणि लक्ष्मीची पूजा केल्याने प्रसन्न होतात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी हे धनाचे प्रतीक आहेत तसेच या दिवशी गुरुवारच्या व्रताची कथा वाचावी यामुळे वैवाहिक जीवन सुखी राहते आणि विवाह जुळवून आणते.
त्यादिवशी पिठात हरभरा डाळ गुळ आणि हळद घालून गाईला खाऊ घालावी याशिवाय आंघोळीच्या वेळी पाण्यात चिमूटभर हळद टाकावी याशिवाय तुमच्या ऐपतीनुसार हरभरा डाळ हळद वस्त्र अन्न एखाद्या गरीब व्यक्तीला दान करावे मित्रांनो गुरुवारी उधार पैसे देऊ नये आणि घेऊ सुद्धा नाही असे म्हटले जाते असे केल्याने आपल्या राशीच्या कुंडलीत बृहस्पतीची स्थिती बिघडू शकते.
अर्थातच गुरु ग्रहाची स्थिती बिघडते त्यामुळे आर्थिक संकटाचा सामना आपल्याला करावा लागू शकतो बृहस्पती ग्रहाची पूजा गुरुवारी करावी चंदनाचा छोटा टिळा मनगटावर किंवा आपल्या कपाळावर लावावा असे केल्याने कुंडलित गुरु ग्रह बलवान होईल यासोबतच प्रत्येक क्षेत्रात व्यक्तीला लाभ मिळतो.
म्हणून गुरुवारचा दिवस हा बृहस्पतीचा दिवस असतो आणि आपल्या राशीत गुरु ग्रह हा मजबूत नसेल तर पैशांच्या अडचणी निर्माण होऊ शकतात. म्हणून यासाठी गुरुवारी कोणाला पैसे उधार देऊ सुद्धा नका व घेऊ सुद्धा नका तुमचे लोन पास झाले असेल तर ते गुरुवारी घेऊ नका. पैसे काढू नका आणि जर कोणाकडून पैसे घेणार असाल तर ते गुरुवारी घेऊ नका.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.