नोव्हेंबर २०२३ तुमच्यासाठी कसा असेल? या घटना नोव्हेंबर मध्ये तुमच्या आयुष्यात १००% घडणार म्हणजे घडणारच.

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो नोव्हेंबर महिन्यात आलेली आहे दिवाळी आणि म्हणूनच हा नोव्हेंबर महिना खास ठरतोय कारण ही दिवाळी सुद्धा काही राशींसाठी खास असणार आहे.कोणता आहे तर अशी कशी खास असणार आहे कसा लाभ होणार आहे सगळे जाणून घेऊया. 

मंडळी नोव्हेंबर महिन्यामध्ये जे काही ग्रहमान तयार होत आहेत त्या ग्रहणाचा काही राशींना लाभ होणारे काही राशींना तोटा होणारे तर काही राशींसाठी काळ सामान्यच राहणार आहे. आपण आता एकेक राशीचा जाणून घेऊया की कोणत्या राशीला लाभ होणारे कोणत्या राशीचा नुकसान होण्याची शक्यता आहे कोणत्या राशीने सावध राहायच आहे.

१) मेष रास –  मेष राशीच्या व्यक्तींना नोव्हेंबर महिन्यामध्ये एखादी चांगली बातमी मिळणार आहे. महिन्याच्या उत्तरदात ती बातमी तुम्हाला मिळू शकते. त्याच बरोबर नोव्हेंबर महिन्यात मेष राशीचे लोक सहलीला जाण्याचा आयोजन ही करू शकतात. या महिन्यात तुम्हाला काही मोठ्या कामाच्या ऑफर्सही मिळू शकतात ज्यामुळे तुम्हाला तुमच्या आर्थिक स्थितीत फायदा होईल. सर्व प्रलंबित काम अगदी एका मागून एक पूर्ण होतील.

 करियर आणि व्यवसायासाठी तर काय शुद्ध दिसतोय. आरोग्य अर्थात चांगल राहील आर्थिक बाबतीत तुम्हाला नक्कीच फायदा होईल. सुखाच्या साधनांमध्ये वाढ होईल. वाहन सुख मिळण्याची सुद्धा शक्यता आहे. कार्यालयात पद आणि प्रतिष्ठा वाढेल फक्त या महिन्यात तुम्हाला काही कौटुंबिक समस्या जाणवू शकतात. ज्यामुळे तुम्ही जर मानसिक दृष्ट्या अस्वस्थ राहाल सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात तुमचे विरोधक वाढतील. त्यामुळे तुम्हाला सावध आणि सतर्क सुद्धा राहायचा आहे.

२) वृषभ रास – वृषभ राशीच्या लोकांचे कस होईल माहिती आहे का नोव्हेंबर महिन्यामध्ये जास्त धावपळ त्यामुळे थोडा शारीरिक थकबा जाणव शकतो कामाच्या ठिकाणी धावपळ केल्याने तुम्हाला यश मिळणार आहे यात काही शंकाच नाही. तुम्ही तुमच्या पत्नी आणि मुलांसोबतही कुठेतरी बाहेर जाण्याचा प्लान या महिन्यात करणार आहात. 

ज्यामुळे मुल आनंदी होते या आठवड्या तुम्ही कोणत्याही मोठ्या वादातून मुक्त होऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला मानसिक दृष्ट्या शांतता मिळेल. तसं तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत काही नवीन कामाची सुरुवातही करू शकतात.तुमच्या सुख सोयींसाठी तुम्ही नवीन वाहन खरेदी करण्याचा विचारात असाल तर हा काळ योग्य आहे. मोठी गुंतवणूक सुद्धा तुम्ही या काळामध्ये करू शकता.

३) मिथुन रास – मिथुन राशीच्या लोकांना हा महिना आनंदाने भरलेला जाणार आहे. या महिन्यात तुम्हाला चांगली बातमी मिळणारे ज्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल. या महिन्यात तुमच्या कुटुंबातील एखाद्याला नोकरी मिळाली तर तुमच्या आर्थिक परिस्थितीत सुद्धा मोठा फरक झालेला दिसून येईल. या महिन्यात तुम्ही मुल आणि पत्नी सोबत निवांत वेळ घालवाल तुम्ही मालमत्ता किंवा इतर काही गोष्टी खरेदी करण्यामध्ये मोठी गुंतवणूक सुद्धा करू शकता.

 ज्यामुळे तुम्हाला भविष्यात त्याचे चांगले परिणाम दिसून येतील. महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला काही किरकोळ समस्या जाणवतील नाही अस नाही परंतु महिन्याचा मध्य तुमच्यासाठी सगळ काही ठीक करेल. या महिन्यात तुम्हाला तुमच्या सासरच्या लोकांकडून खूप आर्थिक मदत मिळू शकते.जी प्रलंबित कामात फायदेशीर ठरेल.

४) कर्क रास – कर्क राशीवर नोव्हेंबर महिन्यात ग्रहांचा शुभ प्रभाव दिसेल. कर्क राशीच्या लोकांना धनसंपत्तीच्या बाबतीत हा महिना उत्तम ठरणार आहे. या महिन्यात आर्थिक स्थिती खूप चांगली राहील या महिन्यात तुम्हाला तुमची आर्थिक स्थिती मजबूत करण्याच्या अनेक चांगल्या संधी चालून येतील. नोव्हेंबर महिना कर्क राशीच्या लोकांसाठी आर्थिक बाबतीत अतिशय अनुकूल असणार आहे. 

या महिन्यात तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी जे काही मेहनत घ्याल त्याबद्दल तुम्ही समाधानी असाल. या महिन्यात तुमच्या व्यवसायिक प्रगतीला ग्रहांच्या शुभ स्थितीचे पूर्ण सहकार्य मिळेल. याशिवाय हा महिना विद्यार्थ्यांसाठी ही अनुकूल आहे नृत्य नाटक संगीत चित्रकला शिल्पकला आणि इतर कलांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा महिना यशस्वी आहे.

५) सिंह रास – या महिन्यात तुम्हाला काही महत्त्वाच्या कामांची जबाबदारी मिळू शकते ती पूर्ण करण्यासाठी तुम्ही तुमची संपूर्ण शक्ती वापराल. तुमचे वरिष्ठ आणि तुमचे भागीदार तुमच्या कामाबद्दलचे समर्पण पाहून तुमचा आदर करतील. तुम्हाला विशेष पदोन्नती मिळू शकते. ज्यामुळे तुम्हाला सामाजिक क्षेत्रात लाभ मिळतील. कौटुंबिक दृष्टिकोनातून हा महिना समस्यांनी भरलेला असेल हेही तितकच खर पत्नी आणि पालकांमध्ये काही गोष्टींवरून वाद मतभेद होऊ शकतात. 

त्यामुळे कौटुंबिक वातावरण बिघडू शकत. या महिन्यात तुम्ही प्रॉपर्टी मध्ये मोठी गुंतवणूक करण्याचा विचार करू शकता पण कोणताही काम विचारपूर्वक करा. अन्यथा मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागू शकते या महिन्यात तुम्ही पत्नी आणि मुलांसोबत कुठेतरी बाहेर जाऊ शकता.

६) कन्या रास – कन्या राशीच्या लोकांना या महिन्यात काही चांगली बातमी मिळू शकते ज्या कामासाठी तुम्ही खूप दिवसांपासून प्रयत्न करत आहात ते काम तुमच्या या महिन्यात पूर्ण होऊ शकत. ज्यामुळे तुमच मन प्रसन्न राहील. या प्रवासात एखाद्या खास व्यक्तीला भेटल्यास भविष्यात यशाचा मार्ग खुला होईल. 

कौटुंबिक दृष्टिकोनातून या महिन्यात काळ तुमच्यासाठी चांगला आहे. जुने वाद मिटतील आणि कुटुंबात परस्पर चांगले संबंध जुळून येतील. या महिन्यात तुम्ही घरामध्ये काही धार्मिक कार्यक्रम आयोजित करू शकता. कुटुंबात नवीन सदस्य येऊ शकतो ज्यामुळे कौटुंबिक वातावरण आनंददायी होईल. कुटुंबात तुमचा मानसन्मान वाढेल.

७) तुळ रास –  तूळ राशीच्या लोकांसाठी हा महिना खूप महत्त्वाचा असणार आहे. या महिन्याच्या उत्तरधात मोठे यश मिळेल. तुमच्या आयुष्यात मोठे बदल घडवून आणले. या महिन्यात तुम्हाला कार्यक्षेत्रात आव्हानांना सामोरे जावे लागेल. तुमचे विरोधक तुमच्यासाठी आव्हान निर्माण करू शकतात. परंतु तुमच्या कार्यक्षमतेमुळे तुम्ही त्यावर सहज मात कराल. या महिन्यात कौतुकी दृष्टिकोनातून कुटुंबातील जुने मतभेद मिटतील. 

तुम्हाला तुमच्या वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये तुमचा हक्क मिळू शकेल. त्यामुळे तुम्ही आनंदी असाल . या महिन्यात तुम्ही तुमच्या पत्नी आणि मुलांसाठी भेटवस्तू दागिने किंवा कपड्यांची खरेदी करू शकाल. तसंच महिन्याच्या उत्तरधात बाहेर जाण्याचा प्लॅन होऊ शकतो. काही बाबींमध्ये तुमच्या पत्नीशी तुमचे मतभेद होऊ शकतात. वाहन चालवताना काळजी घ्या.

८) वृश्चिक रास – या महिन्यात वृश्चिक राशीच्या लोकांना काहीतरी मोठ करण्याची संधी मिळेल. ज्या कामासाठी तुम्ही खूप दिवसांपासून प्रयत्न करत आहात त्या कामात या महिन्यात तुम्हाला मोठा यश मिळत. तुम्हाला कुटुंब आणि मित्रांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. या महिन्याच्या पूर्वर्धात तुम्हाला काही विशेष प्रमोशनही मिळू शकत. तुमचा स्वभाव आणि कार्यशैली लक्षात घेता तुम्हाला काही मोठ्या कामात भाग घेण्याची संधी मिळू शकते. 

या महिन्यात तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात तुमच्या विरोधकांकडून आव्हानांचा सामना मात्र करावा लागेल. पण तुमच्या स्वभावामुळे तुम्ही हे आव्हान सहज स्वीकारू शकाल. या महिन्यात तुम्ही कुटुंबासाठी मोठा निर्णय घ्याल. त्याचा फायदा तुम्हाला होईल. कुटुंबात सुरू असलेले परस्पर मतभेदाचे वातावरण संपवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. तुम्ही तुमच्या पत्नी आणि मुलांसाठी बँकेमध्ये एफडी वगैरे करण्याचा विचारही करू शकतात. ज्यामुळे त्यांचे भविष्य सुरक्षित होईल. हा महिना तुमच्यासाठी गुंतवणुकीच्या दृष्टीने चांगला आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या भविष्यासाठी गुंतवणूक करू शकता.

९) धनु रास – धनु राशीचे लोक जे एखाद्या व्यवसायाचा भाग आहे त्यांची एखादी मोठी भागीदारी होऊ शकते. ज्याचा त्यांना भविष्याच्या दृष्टीने फायदा होऊ शकतो. कुटुंबात मात्र थोडे वादविवाद पाहायला मिळतील. बोलण्यावर धनु राशीच्या लोकांनी या महिन्यात नियंत्रण ठेवायचा आहे.

१०) मकर रास- मकर राशीच्या लोकांना या महिन्यात आनंदी आनंद पाहायला मिळेल.तुमचा कोणताही मोठा जुनावाद संपुष्टात येईल . कुटुंबात आनंदाचा वातावरण दिसून येईल तुम्हाला मोठी मालमत्ता किंवा मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो. या महिन्यात तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी बदल करण्याचा विचार करू शकता. 

सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात तुम्हाला मोठे पद किंवा जबाबदारी मिळू शकते. पण तुमचे विरोधक सुद्धा वाढतील हेही तितकच खर. अर्थात माणूस जसा वर वर जातो तसतसे विरोधकांची संख्या देखील वाढते. तुमचा अपमान करण्याचा षडयंत्र ते करू शकतात. थोड सावध रहा. बाकी तुमची दिवाळी खूप छान जाणार आहे आणि कुटुंबासोबत वेळ घालवणार आहात.

११) कुंभ रास-  कुंभ राशीच्या लोकांसाठी हा महत्त्वाचा महिना आहे खूप चांगला जाणार आहे. तुम्ही काही विशेष कामात सहभागी होऊ शकतात तसेच तुमच्या वागणुकीमुळे सामाजिक क्षेत्रात तुमचा दर्जा वाढेल आणि राजकीय व्यक्तींच्या संपर्कात तुम्ही येऊ शकाल. त्यामुळे तुम्हाला सरकारी संस्थेत मोठे पद किंवा जबाबदारी मिळू शकते. 

या महिन्यात तुमच्या कुटुंबासह तुम्ही आनंदी असाल सर्व जुने वाद संपतील कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. तुम्हाला प्रिय व्यक्तीकडन या महिन्यात एखादी खास भेट वस्तूही मिळू शकते. ज्याचा तुम्हाला येणाऱ्या काळात लाभ होईल. त्याचबरोबर जर तुम्ही प्रॉपर्टी किंवा एखादी मोठी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर हा महिना त्यासाठी अनुकूल आहे. नवीन वाहन खरेदी किंवा घर खरेदी या महिन्यात तुम्ही कराल तर उत्तम योग आहे.

१२) मीन रास – मीन राशीची लोक या महिन्यात त्यांच्या कामासाठी समर्पित असतील कठोर परिश्रम करूनही अपेक्षित यश मिळायला मात्र जर उशीर होईल. त्याचबरोबर यश न मिळाल्याने तुम्ही थोडे अस्वस्थ व्हाल पण तुम्हाला धीर धरण्याचा सल्ला दिला जातो. 

कुटुंबातला वातावरण चांगल राहील. जुने वाद भेटतील या महिन्यात तुमच्या मुलांच्या शिक्षणाबाबत तुम्ही थोडे चिंतेत असाल. बाकी तुमची दिवाळी छान असणार आहे दिवाळीमध्ये नवीन खरेदी घर खरेदी किंवा वाहन खरेदी होण्याचे योग आहेत त्यामुळे तसा काही तुम्ही विचार करत असाल तर नक्की करा. योग चांगले आहेत.

तर मंडळी हे होता बारा राशींचं नोव्हेंबर महिन्याच राशिभविष्य तुम्हाला सगळ्यांनाच दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *