७ राशींसाठी दसरा आनंदाचा, २२ ऑक्टोबर पासून ते २८ ऑक्टोबर पर्यंत प्रत्येक दिवस खास असणार आहे. 

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो चोवीस ऑक्टोबरला आहे दसरा आणि हा दसरा काही राशींसाठी आनंदाचा ठरणार आहे. अस काय घडणार आहे त्या राशींच्या आयुष्यात आणि का बर त्यांच्यासाठी हा दसरा आनंदाचा असणारे चला जाणून घेऊया. मंडळी खर तर आपण पूर्ण आठवड्या बद्दलच बोलणार आहोत. हा पूर्णच आठवडा कसा जाणार आहे कोणता आठवडा २२ ऑक्टोबर पासून ते २८ ऑक्टोबर पर्यंत  म्हणजे रविवार पासून शनिवार पर्यंत  प्रत्येक दिवस खास असणार आहे. 

कारण रविवारी होती दुर्गाष्टमी सोमवारी महानवमी मंगळवारी दसरा बुधवारी पाषाणकोषा एकादशी गुरुवारी प्रदोष शनिवारी कोजागिरी पौर्णिमा आणि त्याच दिवशी आहे खंडग्रास चंद्रग्रहण म्हणजे थोडक्यात काय या संपूर्ण आठवड्यात प्रत्येक दिवशी काही ना काही तरी विशेष स्थिती आहे. म्हणूनच हा आठवडा सात वर्षांसाठी महत्त्वाचा ठरतोय. दसरा नवरात्रीची सांगता कोजागिरी पौर्णिमा चंद्रग्रहण या सगळ्याचा तुमच्यावर कसा प्रभाव असणारे चला बघूया.

१) मेष रास – मेष राशीसाठी हा आठवडा आपल्या कामावर लक्ष केंद्रित करण्यासाठी प्रेरित करणारा असेल. आपण आपल्या कामात व्यस्त आहात.कुटुंबात थोडासा दुरावा या काळात येऊ शकतो.परंतु काम मात्र तुमची सगळी मजबुतीने पूर्ण होतील. कार्य कौशल्याच्या जोरावर उत्तम कामगिरी तुम्ही करून दाखवाल. अस असल तरी काही ठिकाणी आपला सल्ला इतरांहून भिन्न असू शकतो. 

व्यापारात खूप मोठी उलाढाल होईल. व्यावसायिक भागीदारी तणाव वाढू शकतो.तेव्हा विचारपूर्वक बोलणी करा. जोडीदाराची रागीट वृत्ती तुम्हाला या काळात थोडीशी त्रास देईल. प्रेमजणासाठी हा आठवडा अनुकूल आहे. जवळीक तुमची वाढणार आहे. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा उन्नतीदायक आहे

२) वृषभ रास – आठवडा वृषभ राशीसाठी अनुकूल म्हणावा लागेल. करण अडकलेली कामे पूर्ण झाल्याने तुम्हला आनंद होईल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. नोकरी तुमची स्थिती मजबूत असेल. वरिष्ठांशी उत्तम संबंध असल्याचा फायदा तुम्हाला नोकरीत होईल. खर्चात वाढ होईल. अचानक झालेल्या वाढीमुळे तुम्ही काहीसे घाबरून सुद्धा जाल. 

परंतु धीर धरा प्राप्तीत कपात सभावते. कुटुंबात मात्र आनंदाचे वातावरण आहे. कुटुंबीय पाठीशी उभे राहतील. वैवाहिक जीवनात थोडासा तणाव येईल खरा विनाकारण भांडण होण्याची शक्यता आहे. थोडासा संयम धरावा लागेल. विद्यार्थ्यांना मात्र परिश्रम केल्यानंतरच यश प्राप्त होईल. स्पर्धेत यश संभवता. परिश्रम यशस्वी होती आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल.

३) मिथुन रास – हा आठवडा मिथुन राशींसाठी तसा चढउतारांचा आहे. आरोग्य चांगले राहील. पण मिथुन राशीच्या ज्या व्यक्ती व्यापार करतात ना त्यांच्यासाठी मात्र हा आठवडा फायदेशीर असेल. थोडासा मानसिक तणाव राहील पण फायदा होईल. काही गुंतवणूक करण्याचा प्रयत्न तुम्ही कराल नोकरी करणाऱ्यांसाठी सुद्धा आठवडा चांगला आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासात अनेक अडथळ्यांना मात्र सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

४) कर्क रास – कर्क राशीच्या व्यक्तींच्या व्यापारामध्ये तेजी येईल. काही नवीन ऑर्डर सुद्धा तुम्हाला मिळतील. सरकारी क्षेत्राकडून एखादा मोठा फायदा होऊ शकतो. एखादी नवीन प्रॉपर्टी तुम्ही या काळात खरेदी करू शकता. संबंधित कामात तुम्हाला नक्कीच यश मिळेल. मोकळे करणाऱ्या व्यक्तींनी मात्र त्यांच्या कामामध्ये कोणतीही चूक होणार नाही याची काळजी घ्यावी. अन्यथा त्याचे दुष्परिणाम भोगावे लागू शकतात. 

वरिष्ठ खूश होतील यात काही शंका नाही आणि त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल फक्त तुमच्या हातून कोणती चूक होऊ देऊ नका. बँकेतील शिल्लक नक्कीच वाढत जाईल. वैवाहिक तणाव कमी होईल. जोडीदाराची साथ तुम्हाला तुमच्या प्रगतीमध्ये प्रेरित करेल. विद्यार्थ्यांना एकाग्रतेचा अभाव जाणवेल म्हणूनच ती वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावा.

५) सिंह रास – सिंह राशीसाठी मानसिक दृष्ट्या हा आठवडा थोडासा बेचनी देणारा असेल मनाप्रमाणे काम पूर्ण झाल्याने मात्र तुम्ही खुश व्हाल. बेचैनी असली तरी सुद्धा नशिबाची पूर्ण साथ या काळात तुम्हाला मिळणार आहे. इतकच नाहीतर तुमची प्रलंबित काम सुद्धा पूर्ण होतील. नोकरीतील स्थिती ही चांगली असेल परिस्थिती अनुकूल असल्याचा फायदा असल्याचा तुम्हला मिळेल. व्यापार करणाऱ्यांना सुद्धा आठवडा अनुकूलच म्हणावा लागेल. 

स्वतःला सिद्ध करण्याची संधी तुम्हला मिळेल. विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे लागेल कारण त्यांना एकाग्रतेचा अभाव जाणवेल. थोडासा सावध राहावं लागेल आणि मेहनत करावी लागेल. आता सिंह राशीच्या लोकांना मी सुरुवातीला म्हटल तस थोडीशी बेचैन जाणवेल तर ती बेचैनिक कमी होण्यासाठी तुम्हाला ध्यान थोडंस करायच आहे मेडिटेशन करायच आहे प्राणायाम करायच आहे. त्यामुळे तुमच्या भावनांवर तुमचा कंट्रोल राहील.

६) कन्या रास – हा आठवडा खूपच चांगला आहे. मनातील विचार बोलून दाखवू शकाल. विवाहितांचे जीवन मात्र चढ-उतारांसह वाटचाल करेल. व्यापारास अत्यंत फायदेशीर असा हा काळ आहे आपले कौशल्य आणि आपण पूर्वी घेतलेले श्रम आपणास चांगला आशीर्वाद प्रदान करतील. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा अनुकूल आहे. मात्र हाताखाली काम करणाऱ्यांपासून थोड सावध राहाव लागेल. ते त्रास देऊ शकतात.कौटुंबिक समस्यांमुळे विद्यार्थ्यांना अभ्यासात त्रास होण्याची शक्यता आहे.

७) तुळ रास – हा आठवडा तूळ राशीसाठी उत्तम म्हणावा लागेल. कारण तुमच्या उत्पन्नात वाढ आणि खर्चात कपात झाल्याने तुम्हाला आनंद होईल. व्यापारांसाठी हा काळ चढउतारांचा आहे. ज्या कामाचा अनुभव किंवा ज्ञान नसेल अस कोणत्याही काम हाती घेऊ नका हा व्यापाऱ्यांना सल्ला आहे. 

शासनाविरुद्ध असलेल्या कोणताही काम करू नका हा ही एक सल्ला आहे. अन्यथा त्रास होऊ शकतो नोकरी करणाऱ्यांसाठी मात्र आठवडा चांगला आहे. खूप मेहनत कराल चांगले सहकार्य सुद्धा तुम्हाला मिळेल तुमच्या उत्पन्नात वाढ होईल विवाहित व्यक्ती वैवाहिक जीवनाचा संपूर्ण आनंद घेतील.जोडीदारामुळे चांगला लाभ तुम्हाला होईल.

८) वृश्चिक रास – हा आठवडा अनुकूल आहे. मित्रांची भेट होऊन खूप मनोरंजन होईल.एखाद्या ठिकाणी तुम्ही सहलीलाही जाऊ शकता.खर्चातील वाढ मात्र तुम्हाला काळजी देऊन जाईल. खर्चाच्या प्रमाणात प्राप्ती थोडी कमीच होईल. त्यामुळे अंदाज पत्रावर थोडे लक्ष असू द्या तुमचा बॅलन्स शीट सांभाळा. अन्यथा काळजी वाढू शकते नोकरीच्या ठिकाणी परिस्थिती अनुकूल असेल थोडी धावपळ होईल इतकाच.

 काही जणांना परदेशात जाण्याची संधी सुद्धा मिळू शकते. तिथे जाऊन काही दिवस नोकरी करावी लागेल व्यापाऱ्यांसाठी आठवडा चांगला आहे.व्यापार वृद्धीसाठी काही गुंतवणूक करायची असेल तर ती करू शकता. विवाहितांच्या वैवाहिक जीवनासाठी आठवडा काहीसा प्रतिकूल म्हणावा लागेल. प्रेमी जणांसाठी मात्र आठवडा सामान्य आहे. विद्यार्थ्यांसाठी आठवडा काहीसा प्रतिकूल आहे.

९) धनु रास – हा आठवडा धनु राशीसाठी खूपच चांगला आहे ज्याचा विचार केला होता आणि ज्याची अपेक्षाही ठेवली नव्हती अशी सगळीच काम होतील. प्रलंबित योजना सुरू झाल्याने नोकरी असो किंवा व्यापार अशा दोन्ही क्षेत्रात आपण चांगली कामगिरी करू शकाल. प्राप्तीत वाढ होईल सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे प्राप्तीमध्ये जलद गतीने वाढ होणार आहे.

 वाढीव रकमेची गुंतवणूक अशा ठिकाणी कराल की ज्यामुळे भविष्यात लाभ मिळू शकेल. एखादी प्रॉपर्टी खरेदी करण्याची संभावना आहे. आरोग्याकडे मात्र लक्ष द्यावे लागेल पोटाशी संबंधित विकार उद्भवण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासात अनेक विघ्नांना सामोरे जावे लागेल. त्यामुळे अभ्यासात लक्ष केंद्रित ठेवण्यासाठी थोडी मेहनत घ्यावी लागेल.

१०) मकर रास- मकर राशीच्या लोकांसाठी आठवड्या नक्कीच चांगलाच मानसिक तणावातून तुम्ही मुक्त व्हाल स्वतःचा आत्मविश्वास वाढलेला असेल. खर्चातही कपात होईल.आर्थिक स्थिती तुमची मजबूत होईल. नोकरी चढउतार येऊ शकतात. एखाद्याचे वायफळ बोलणे आपल्या डोक्याला ताप देऊन जाऊ शकते. 

त्यामुळे थोडंस शांत रहा क्रोधीत होऊ नका आणि कुणालाही वेड वाकड बोलू नका. नाहीतर भांडण होऊ शकतात शक्यतो अशी परिस्थिती टाळण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमची प्रगती होईल. व्यापारासाठी हाbआठवडा चांगला आहे. क्षमता चांगली राहील.विवाहित व्यक्ती वैवाहिक जीवनात समाधानी दिसून येतील.विद्यार्थी अभ्यासाचा आनंद घेत खूप मेहनत करतील.

११) कुंभ रास- हा आठवडा मध्यम फलदायी कुंभ राशीसाठी आहे काही खर्च अचानकपणे होतील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींनी कामाच्या बाबतीत थोड सतर्क रहाव. कामात कोणत्याही प्रकारची चूक होऊ देऊ नये बदली सांभावते. 

इच्छा असेल तर नोकरी बदलण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकत. व्यापारी योजना यशस्वी होतील. कामानिमित्त प्रवास करावा लागेल त्यामुळे आपण यशाच्या मार्गापर्यंत जाऊ शकत. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अनुकूल आहे. उच्च शिक्षणासाठी यश प्राप्त होण्याच्या संधी आहेत.

१२)  मीन रास- हा आठवडा सुरुवात खूप चांगली होईल. काही नवीन लोकांना भेटण्याची संधी मिळेल. नवीन संपर्क होतील एखाद्या सुंदर प्रवासाला जाऊन सुट्टी मजेत घालवण्याची ही संधी मिळेल. प्रेम वृद्धिंगत होईल. वैवाहिक जीवन सुधारण्याचा प्रयत्न कराल अडेल तट्टूपणा  केल्याने नात्यामध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे तेवढं करू नका पण एकदरीत आठवडा चांगला असेल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *