नवरात्रीचा कलश उचलताना या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर

नमस्कार मित्रांनो.

यंदा नवरात्र चा कालावधी संपूर्ण नऊ दिवसाचा आहे. नवरात्रातील देवीपूजनात काही गोष्टी किंवा घटक महत्त्वाच्या मानल्या जातात. त्याची पूजा व्रत करण्याची पद्धत सर्व गोष्टी महत्त्वाच्या असतात. हे सर्व विधी संपूर्ण श्रद्धेने पार पाडले जातात. अशातच नऊ दिवस जाणाऱ्या नवरात्री उत्सवात नवमीत किंवा दशमितीतील कलश विसर्जित करण्याची सुद्धा परंपरा आहे.

आणि नवरात्रीचा कलश उचलताना सुद्धा काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात असे म्हणतात. तरच नवरात्री पूजेच पूर्ण फळ प्राप्त होत अस सांगितल जात. मग कलशाच विसर्जन करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात हेच आज आपण या लेखामधून जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया.

नऊ दिवस चालणाऱ्या नवरात्री उत्सवात देवी दुर्गेच्या नऊ रूपाची पूजा केली जाते. यासोबतच अश्विन महिन्याच्या प्रतिपदेपासून नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कलशाची स्थापना केली जाते. नवमी किंवा दशमी तिथीला त्याचे विसर्जन शुभ मानले जात. शास्त्रानुसार कलशाचे प्रतिष्ठापना करताना नियम आणि नियमांचे पालन केले जात.

 याचबरोबर कलशाचा विसर्जन करतानाही काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. जास्त फळ तर मिळतात शिवाय माता दुर्गेची अवकृपा ही होण्यापासून बचाव होत. यासाठी नवमी किंवा दशमीच्या तिथीला परत संपल्यानंतर हवन करावं आणि त्यानंतर नवकन्यांना भोजन द्याव असे म्हणतात. यासोबतच त्यांना यथाशक्ती भेटवस्तू द्यावी.

नऊ मुलींची कन्या स्वरूपात पूजा केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि भरभरून आशीर्वाद देत असते असे म्हणतात. कन्या पूजेची पद्धत मंत्र इत्यादी माहिती नसतील तर दुर्गा मातेची क्षमा मागून सांगाव की, हे देवी माझ्या क्षमतेनुसार अल्पज्ञानाने मी तुझा व्रत पाळले,कलशाची स्थापना केली आणि कन्या पुजा केली तुम्ही माझ्यावर आशीर्वादाचा वर्षाव करा आणि माझ्या कुळात माझ्या कुटुंबाला आशीर्वाद द्या आमच्या घरी सदैव उपस्थित रहा. 

आई दुर्गेची क्षमा मागून सुक्ताचे पठण करावे. ते शक्य नसेल तर पुढील मंत्राचा जप करावा, ” या देवी सर्वभूतेषु शक्तीरुपेण संस्थिता,नमस्तस्यै नमस्तस्यै  नमस्तस्यैनमो नमः || या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता,नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।। या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता, नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।। या देवी सर्वभूतेषु दयारूपेणा संस्थिता,नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमःll या देवी स सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता,नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमःll या देवी सर्वभूतेषु शांतिरुपेण संस्थितता, नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥”

तर मित्रांनो या मंत्राचा जप सुद्धा करू शकता. याचबरोबर आई दुर्गा आणि कळलशाची विधिवत पूजा केल्यानंतर मूर्तिचे विसर्जन करणे सुद्धा अंत्यत महत्वाचे आहे. कलश उचलताना सुद्धा एका विशिष्मंत्राचा जप करण्यास सांगितल जात. मंत्र पुढील प्रमाणे, ‘ ॐ ऐं हीं क्ली चामुण्डायै विच्चै’ हा मंत्र म्हणत सर्व प्रथम कलशाच्या वरील नारळ हळू हळू उचलवा आणि कपाळावर लावावा. 

यानंतर घरामध्ये उपस्थित पत्नी आई किंवा बहिणीच्या मांडीवर नारळ चुनरी इत्यादी ठेवाव.यानंतर कलशात असलेल पाणी आब्याच्या पानांनी संपूर्ण शिपडावे. मात्र पाणी शिपडायची सुरुवात स्वयंपाक घरातून व्होवी हे लक्षात ठेवावी. करण स्वयंपाक घरात माता अन्नपूर्ण देवी बरोबरच माता लक्ष्मीचा देखील वास आहे.

यानंतर घरातील प्रत्येक कोपऱ्यात पाणी शिपडाव शिवाय बांथरूम टॉयलेट मध्ये हे पाणी अजिबात शिपडू नये.कलशात असलेल नान उचलून कपाळावर लावाव आणि ते आपल्या तिजोरीत, पर्समध्ये ठेवावे आणि नेहमी आपल्या जवळ ठेवल तरी चालते. कळश किंवा अखंड ज्योतीमध्ये बांधलेका कळव हळू हळू उघडावा.

आणि हाताला सुद्धा बांधावा याशिवाय दसऱ्याच्या दिवशी अखंड ज्योती संध्याकाळपर्यंत ठेवली तरी चालेल नंतर ती विसर्जित करावी. तर अशाप्रकारे नवरात्रीच्या कळश विसर्जनची ही पद्धत तुम्ही अवलंबू शकतात. शिवाय कलश उचलताना या गोष्टी सुद्धा लक्षात ठेवण गरजेचे आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *