२४ तासात अनुभव येईल..
नमस्कार मित्रांनो.
आज पितृ एकादशी रात्री झोपण्यापूर्वी आपल्या पितरांना प्रसन्न करण्यासाठी हा एक मंत्र तुम्ही कमीत कमी तीन वेळा म्हणा अनेकांना पितृ एकादशी हा शब्द कदाचित नवीन वाटत असेल, लक्षात घ्या भाद्रपद महिन्यात कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला इंदिरा एकादशी असे नाव आहे परंतु ही एकादशी पितृपक्षात आल्याने तिला पितृ एकादशी असे अनेक धर्मशास्त्रामध्ये संबोधले आहे.
पितृ पक्षात येते म्हणून कदाचित हिला पितृ एकादशी असेही म्हटले जात असेल तर अशा या पितृ एकादशीच्या रात्री पितरांना प्रसन्न करण्यासाठी एक मंत्र आम्ही तुम्हाला सांगत आहोत या मंत्राचा जप कोणी करावा कसा करावा ज्यांना वाटत आपल्या पितरांना सद्गती मिळावा मोक्ष मिळावा आणि परिणामी आपल्या पितरांचा कृपा आशीर्वाद आपल्याला आपल्या कुटुंबाला लाभावा.
त्या सर्वांनी एकादशीच्या रात्री झोपण्यापूर्वी हा मंत्र केवळ तीन वेळा नक्की बोला तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही तीन पेक्षा अधिक वेळा सुद्धा या मंत्राचा जप करू शकता या मंत्र जपाने आपल्या पितरांना कल्पापर्यंत सुखांची प्राप्ती होते आणि मोक्ष मिळण्यास सुद्धा सहाय्य मिळते. याचा लाभ आपल्याला धन ,संपत्ती, संतती, आरोग्य, भोग या स्वरूपात मिळतो म्हणजेच ज्यांना मूलबाळ होत नाही त्यांना संततीचा लाभ होतो.
ज्यांच्या घरात दैन्य अवस्था आहे त्यांना धनसंपत्ती मिळते ज्यांच्या घरात सुख नाही त्यांना सुखाची प्राप्ती होते ज्या घरामध्ये आजारपण भरलेला आहे त्यांना आरोग्य आणि स्वास्थ्य मिळतं. तर मित्रांनो हा मंत्र म्हणण्यासाठी बोलण्यासाठी तुम्हाला कोणत्याही विधी विधानाची गरज नाही म्हणजे हात पाय धुणे स्नान करणे याची गरज नाही. तुम्ही कोणत्याही ठिकाणी बसून हा मंत्र जप करू शकता.
देवघरासमोरच बसावे किंवा तुमचे जे काही पितर आहे. त्यांच्यासमोर बसावे असा काही नियम नाही रात्री झोपण्यापूर्वीच हा मंत्र बोलावा असाही काही नियम नाही. परंतु प्रत्येक व्यक्ती आज धावपळ करत आहे दगदग आहे. प्रत्येकाच्या पाठीमागे काही ना काही कामाचा व्याप आहे. सकाळी उठण्यापूर्वी आणि रात्री झोपण्यापूर्वी ह्या दोन वेळा अशा काही असतात.
जेव्हा आपण आपल्या अंतकरणाशी जोडले जातो आपल्या सबकॉन्शियन्स माईंड शी जोडले गेलेले असतो तेव्हा आपण जो काही मंत्र जप करतो त्या मंत्राचा थेट प्रभाव आपल्या सबकॉन्शियन्स माईंड वर थोडक्यात आपल्या अंतकरणावर पडत असतो. आणि आपल्या त्या भावना ब्रह्मांडापर्यंत जात असतात तर तो मंत्र आहे पुढील प्रमाणे
(ओम देवताभ्य: पितृभ्यच महायोगीभ्या एवं च|
नमः स्वधाये स्वह्ययी नित्यामेव नमोस्तुते||)
केवळ तीन वेळा किंवा जास्तीत जास्त वेळा या मंत्राचा जप आज रात्री झोपण्यापूर्वी नक्की करा आणि पितरांचा कृपाशीर्वाद मिळावा.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.