नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो १५ ऑक्टोंबर पासून नवरात्र सुरु होत आहे. नवरात्राचा हा प्रत्येक दिवस हा महत्त्वाचा असतो. प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या देवींची पूजा करण्यात येते. आपण आजच्या या लेखामध्ये आपण जाणून घेऊयात की प्रत्येक दिवशी कोणकोणत्या कोणत्या देवीची विशेष महत्त्व असते कोण कोणत्या देवीची पूजन आपण करावे. तर मित्रांनो दुर्गेची नऊ शक्ती रुपे आहेत आणि दुर्गेची नवरपांचे नवरात्रीमध्ये पूजा केली जाते.
१) माँ शैलपुत्री- हिमालय पुत्री इथे लग्न शंकर अशी झाले नवरात्राच्या पहिल्या दिवशी हिचे पूजन करण्यात येते.
२) माँ ब्रम्हचारिणी- म्हणजे तपचारिणी उजव्या हातात तपमाळ व डाव्या हातात कमांडलू असे तेजोमय स्वरूप पूजनाने सिद्धी व विजय प्राप्त होतात. असा समज आहे. नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी हिचे पूजन करण्यात येते.
३) माँ चंद्रघंटा – कल्याण करणारे व शांतीदायक दशभूजास्वरूप शिरोभागी घंटेच्या आकाराचा अर्धचंद्र आहे सर्व हातात अस्त्रे आहेत. पूजनाने सर्व कष्टातून मुक्ती मिळते असा समाज आहे. नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चे पूजन केले जाते.
४) माँ कुष्मांडा- अष्टभुजा प्रकाराचे स्वरूप पूजनाने रोग नष्ट होतात असा समज आहे. कुशमांड म्हणजे कोहळा दिला कोहळ्याच्या नैवेद्य लागतो. वाहन सिंह आहे. नवरात्रीच्या चौथ्या दिवशी हिचे पूजन केले जाते.
५) माँ स्कंदमाता- म्हणजेच कंदाची माता म्हणून असलेले चारभुजांचे स्वरूप श्रीदेवी कमळा सणावर विराजमान आहे.देवीचा वर्ण पूर्ण शुभ्र आहे. नवरात्र च्या पाचव्या दिवशी तिचे पूजन करण्यात येते.
६) माँ कात्यायनी- गत नावाच्या ऋषीच्या कुलात कातक गोत्रात उत्पन्न झालेली अशी ती कात्यायनी नवरात्र च्या सहाव्या दिवशी हिचे पूजन करण्यात येते.
७) माँ कालरात्रि – काळे शरीर व तीन डोळे असलेली केश संभार विखुरलेल्या वाहन गर्दभ खडग धारन कलेली भयानक असे स्वरूप नवरात्रीच्या सातव्या दिवशी चे पूजन करण्यात येते.
८) माँ महागौरी – गोरा वर्ण आभूषणे व वस्त्र पांढर्या रंगाचे चार हात असलेली व ऋषभ हे वाहन असलेली नवरात्रीच्या आठव्या दिवशी हिचे पूजन करण्यात येते.
९) माँ सिद्धीदात्री – सर्व सिद्धी देणारी हिच्या उपासनेने आठ सिद्धी प्राप्त होतात व पारलौकिक कामना पूर्ण होतात. नवरात्रीच्या नवव्या दिवशी तिचे पूजन करण्यात येते.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.