ऑक्टोंबर मध्ये ६ ग्रहांचे राशी परिवर्तन; ४ राशींची लागणार लॉटरी.. तर या राशी होणार..

ऑक्टोंबर महिन्यात सहा ग्रहांचे राशी परिवर्तन होत आहे. शुक्र सूर्य राहू आणि केतू हे चार ग्रह एकवेळ तर बुध ग्रहांचे दोन वेळा राशी परिवर्तन होणार आहे. ग्रहांच्या या राशी परिवर्तनाचा प्रत्येक राशीवर शुभ – अशुभ प्रभाव कसा पडेल? चला तर जाणून घेऊया.

१) मेष रास – मेष राशीच्या जातकांना ऑक्टोबर महिन्यात आर्थिक लाभ होण्याचे योग आहेत. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. आरोग्यात सुधारणा होईल. सर्व कामे मार्गी लागतील. एकंदरीत ग्रहांचे राशी परिवर्तन मेष राशीसाठी अत्यंत शुभ असणार आहे.

२) वृषभ रास – वृषभ राशींच्या जातकांचा खर्च आक्टोंबर महिन्यात खूप वाढेल. त्यामुळे बजेटची चिंता जाणवेल.  या महिन्यात केलेल्या कष्टांचे फळ काही महिन्यानंतरच मिळू शकेल. ऑक्टोबर महिन्यात जवळच्या नातलग किंवा मित्रांकडून एखादी भेटवस्तू किंवा आर्थिक लाभ प्राप्त होण्याची शक्यता आहे.

३) मिथुन रास – मिथुन राशीसाठी ग्रहांचे परिवर्तन अत्यंत शुभ असणार आहे. ऑक्टोबर महिन्यात मिथुन राशीला अचानक आर्थिक लाभ होईल. भावंडांकडून योग्य ते सहकार्य मिळेल. सर्व कामे मार्गी लागतील. महिन्याच्या शेवटी रागावर नियंत्रण ठेवावे लागेल.

४) कर्क रास – कर्क राशीच्या जातकांना ऑक्टोबर महिन्यात सावध राहण्याची गरज आहे. विश्वासातील लोक धोका देऊ शकतातअनपेक्षित खर्च वाढतील. घरगुती कामे विलंबाने होतील कामात अनेक अडथळे येतील परंतु सरतेशेवटी कामे यशस्वी होतील.

५) सिंह रास – सिंह राशीच्या जातकांना ऑक्टोबर महिन्यात अनेक शुभ वार्ता मिळतील. कामाच्या ठिकाणी खूप संघर्ष करावा लागेल.आर्थिक प्राप्ती सामान्य राहील. प्रत्येक कामात अडथळे येतील, मात्र कामे यशस्वी होतील.

६) कन्या रास – कन्या राशीच्या जातकांना ऑक्टोबर महिन्यात मोठे आर्थिक लाभ होतील. प्रगतीच्या नव्या संधी चालून येतील. परंतु ग्रह चालीमुळे या संधीचा अचूक फायदा मात्र घेता येणार नाही. कन्या राशीच्या महिलांनी कुटुंबात सौख्य राखण्यासाठी प्रयत्न करावे.

७) तुळ रास – तूळ राशीच्या जातकांना ऑक्टोबर महिना आनंदाचा व शुभ जाईल. नोकर पेशा लोकांना उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या संपर्कातून मोठे लाभ होतील. धार्मिक कार्यात उत्साहाने सहभागी व्हाल.

८) वृश्चिक रास – वृश्चिक राशीच्या जातकांना ऑक्टोंबर महिन्यात आरोग्याच्या समस्या जाणवू शकतात. विशेषतः पोटाचे त्रास आणि डोळ्याचे आजार उदभवतील. कौटुंबिक खर्च वाढतील व्यर्थ कामांमध्ये बराचसावे वाया जाईल.

९) धनु रास – धनु राशीच्या जातकांना ऑक्टोंबर महिन्यात अचानक मोठा धनलाभ होऊ शकतो. हा महिना अत्यंत व्यस्त असणार आहे. अडकलेला पैसे मिळण्याचे योग आहेत ; प्रयत्न जोरकस करावेत. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.; परंतु महिन्याच्या शेवटी नातेवाईकांशी वाद विवाद होऊ शकतात.

१०) मकर रास- मकर राशीच्या जातकांना ऑक्टोबर महिन्यात समाजात मान सन्मान मिळेल. व्यवसाय व नोकरीच्या ठिकाणी प्रगतीचे योग आहेत. धार्मिक कार्यात रस घ्याल. अनेक अडकलेली कामे पूर्ण  होतील.

११) कुंभ रास- कुंभ राशीच्या जातकांना ऑक्टोंबर महिन्यात मानसन्मान मिळेल.व्यवसाय आणि नोकरीत सहकाऱ्यांकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. कामात यश मिळेल परंतु चैनीच्या वस्तूंवर नाहक पैसे खर्च होऊ शकतात.

१२) मीन रास- मीन राशीच्या जातकांना ऑक्टोंबर महिन्यात व्यर्थ खर्चाचा सामना करावा लागू शकतो. नको त्या गोष्टींवर पैसा खर्च होईल. आरोग्याच्या समस्या जाणवतील. मानसिक ताण तणाव आणि गोंधळाची स्थिती निर्माण होऊ शकते. विशेषतः नोकरीच्या ठिकाणी अनावश्यक टेन्शन निर्माण होईल. अधिकाऱ्यांकडून त्रास होऊ शकतो. हा महिना नवीन योजना आखण्यासाठी उत्तम आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *