‘गणपती बाप्पा मोरया’ का म्हणतात? जाणून घ्या यामागील शास्त्रीय कारण.

नमस्कार मित्रांनो.

गणपती आगमनाच्या वेळी आणि गणपती स्थापना झाल्यानंतर आपण गणपती बाप्पा मोरया असा जयघोष करतो. आपण गणपती बाप्पाचे स्वागत खूप वेगवेगळ्या पद्धतीने करत असतो बाप्पाला सुंदर सजवलेल्या मकरात बसवतो. बाप्पाला त्यांच्या आवडता पदार्थ अर्पण करतो. 

बाप्पाची आरती करतो आणि सर्वात महत्त्वाच म्हणजे आपण गणपती बाप्पा मोरया असा जयघोष करतोच. मात्र गणपती बाप्पा मोरया हा जयघोष करण्यामाग नेमका इतिहास माहिती आहे का चला या संबंधित माहिती जाणून घेऊयात.

मित्रांनो खरंतर गणपती बाप्पांसोबत मोरया का म्हटले जातात. या मागचा इतिहास हा फार कमी लोकांनाच माहिती आहे.गणपती बाप्पांसोबत मोरया शब्द कुठून जोडून आलाय यामध्ये ६०० वर्षे जुनी कहाणी सांगण्यात येते महाराष्ट्रातील पुणे शहरापासून १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या चिंचवड गावातील ही कथा आहे १३७५ मध्ये जन्मलेले मोरया गोसावी हे श्री गणेशाचे एक परमभक्त होते अस म्हणतात.

 प्रत्येक गणेश चतुर्थीला चिंचवड पासून ९५ किलोमीटर अंतरावर असलेल्या मोर गावच्या मयुरेश्वर गणपती मंदिरात दर्शनासाठी जात होते. महाराष्ट्रातील अष्टविनायक गणपतींपैकी एक आहे. अस सांगितल जात की वयाच्या ११७ वर्षापर्यंत मोरया गोसावी नियमितपणे मयुरेश्वर मंदिरात जात राहिले. परंतु वृद्धापणामुळे त्यांना मंदिरात जाण शक्य होई ना यामुळे मोरया गोसावी नेहमी दुःखी राहत होते.

एका दिवशी श्री गणेशांनी त्यांना स्वप्नात दर्शन देऊन सांगितल की उद्या तुला स्नान करताना मी दर्शन देईल. दुसऱ्या दिवशी चिंचवडच्या कुंडामध्ये मोरया गोसावी स्नानासाठी गेले कुंडामध्ये डुबकी लावून बाहेर येताना त्यांच्या हातामध्ये श्री गणेशाची एक छोटी मूर्ती होती. 

देवांनी त्यांना दर्शन दिले आणि ती मूर्ती मोरया गोसावी यांनी मंदिरात स्थापित केली. त्यानंतर यांची समाधी ही येथे बांधण्यात आली हे ठिकाण मोरया गोसावी या नावाने ओळखले जाते. 

गणपती सोबतच येथे मोरया गोसावी यांचे नाव अशा प्रकारे जोडला गेला आहे की लोक येथे फक्त गणपती उच्चार न करता गणपती बाप्पा मोरया नक्की म्हणतात. पुण्यातील या बाप्पाच्या मंदिरातून गणपती बाप्पा मोरया या नावाचा उच्चार करणे सुरुवात झाली. आणि आज देशभरात गणपती बाप्पा मोरया म्हटल जात.

याचबरोबर गणपती बाप्पाची संबंधित मोरया या शब्दामागे गणपतीचे मयुरेश्वर रूप असल्याचेही मानले जात. गणेश पुराणानुसार सिंधू नावाच्या राक्षसाच्या अत्याचाराला सर्व लोक कंटाळले होते. तो खूप शक्तिशाली होता आणि देवी देवता सर्व मानवतेच्या अत्याचाराला स्वप्नाचा मार्ग शोधत होते. यासाठी देवांनी गणपती बाप्पाला आवाहन केल सिंधू या राक्षसाला मारण्यासाठी गणपती बाप्पांनी आपल वाहन म्हणून मोराची निवड केली आणि सहा हातांचा अवतार धारण केला. 

तेव्हापासून सुद्धा गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात भावी या अवताराची पूजा करतात अस सांगितल जात आणि म्हणून गणपती आगमनाच्या वेळी स्थापनेच्या वेळी अनेक गणपती बाप्पाच्या विसर्जनाच्या वेळी आवर्जून गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या ही जय घोषणा केली जाते. गणपती बाप्पाच्या या जयघोष मागे ही कथा सुद्धा सांगितले जाते.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *