नमस्कार मित्रांनो.
तुम्ही सूर्यफुलाच्या बिया कधी खाल्ले आहेत का? आमच्या लहानपणी आम्ही शेतात गेल्यावर सूर्यफुलाच्या बिया आवर्जून खात असू. आधुनिक विज्ञानाने सूर्यफुलांच्या बियांना सुपरफुड असे म्हटले आहे कारण या बिया खाल्ल्याने केवळ आरोग्य चांगले रहात असे नव्हे, तर अनेक रोगांपासून अनेक आजारांपासून आपला बचाव होतो. नुकत्याच झालेल्या संशोधनानुसार कॅन्सर सारख्या गंभीर आजारावर देखील सूर्यफुलाच्या बिया खाल्ल्याने फायदा होतो.
जाणून घेऊयात सूर्यफुलाच्या बिया खाण्याचे तेरा अद्भुत फायदे :
१) हृदयरोगापासून बचाव – सूर्यफुलाच्या बियांमध्ये जीवनसत्व-इ, खनिजे आणि फाईटोस्टरोल्स नावाचा घटक मुबलक प्रमाणात असतो. या पोषक तत्त्वामुळेच सूर्यफुलाच्या बिया खाल्ल्याने हृदय निरोगी व स्वस्त राहते, हृदय रोगाचा धोका कमी होतो, हृदयाशी संबंधित कोणतेही आजार होत नाहीत. आजकाल अगदी तरुण वयात सुद्धा हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण वाढले आहे. अशावेळी सूर्यफुलाच्या बिया आवर्जून खायला हव्या.
२) ब्लड प्रेशर BP: सूर्यफुलाच्या बियांमध्ये मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात असते, जे रक्तदाब कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते. मॅग्नेशियम अरुंद रक्तवाहिन्यांना रुंद बनवत रक्त प्रवाह सुरळीत करते. त्यामुळे रक्तदाब कमी होतो. तज्ञांच्या हाय डीपीचा त्रास कमी करण्यासाठी दररोज सुमारे ८० सूर्यफुलाच्या बियाचे सेवन करायलाच हवे.
३) ब्लड शुगर: सूर्यफुलाच्या बिया खाल्ल्याने रक्तातील साखर देखील कमी होते. या बियात क्लोरोजनिक ऍसिड असते जे रक्तातील साखर कमी करते. एका संशोधनानुसार दररोज फक्त ३० ग्रॅम सूर्यफुलाच्या बिया खाल्ल्याने दीड महिन्यातच रक्तातील साखर दहा टक्के पर्यंत खाली घसरली. म्हणूनच डायबेटीस असणाऱ्या रुग्णांनी सूर्यफुलाच्या बियांचे सेवन आवर्जून करावे.
४) हाडे बळकट : सूर्यफुलाच्या बिया खाल्ल्याने हाडे बनतात, हाडांचे आरोग्य चांगले रहाते. या बियांमध्ये खनिजे,जीवनसत्वे, प्रथिने,आवश्यक फॅट्स मुबलक प्रमाणात असतात, जे हाडांचे आरोग्य चांगल राखतात. तुम्हाला ऑस्टीओपोरोसिस सूर्यफुलाच्या बिया आवर्जून खा. या बियातील जीवनसत्व- इ, जीवनसत्व- बी कॉम्प्लेक्स तसेच मॅग्नेशियम ऑस्टिओपोरोसिस बरा करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडतात.
५) कॅन्सर पासून बचाव : सूर्यफुलाच्या बियांमध्ये सिलेनियम कोलोन हा कॅन्सर पासून बचाव करणारा घटक आढळतो. म्हणूनच कॅन्सर होऊ नये असे वाटत असेल किंवा कॅन्सर झालेला असेल तर आज पासून आपल्या आहारात सूर्यफुलाच्या बियांचा समावेश करा.
६) एकूणच काय तर सूर्यफुलाच्या बियांमध्ये आढळणारी जीवनसत्त्वे आणि खनिज पदार्थ संपूर्ण शरीराला त्वचेला हाडांना हृदयाला निरोगी ठेवतात.
७) दररोज सकाळी उपाशीपोटी किंवा नाश्त्यासोबत या फुलांच्या बिया खायला हव्यात.
८) तुमच्या गावातील किंवा परिसरातील एखाद्या शेतकऱ्याकडून सूर्यफुलाच्या बिहार नक्की खरेदी करा आणि त्याचा वापर आपल्या दैनंदिन आहारात सुरू करा.
टीप:- या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाइट आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.