“मंगळ दोष” समज-गैरसमज..! मंगळाची पत्रिका बघून स्थळ नाकारताय थांबा. अगोदर हे वाचा..

नमस्कार मित्रांनो.

मुलीला कडक मंगळ आहे लग्न जुळणे नाही मुलाच्या पत्रिकेत मंगळदोष दाखवत आहे पत्रिका जुळत नाही मंगळ असलेल्या लोकांचा लग्न लवकर होत नाही मंगळ म्हणजे सगळ्याच गोष्टी उशिरा उशिरा उशिरा  या आणि अशा कितीतरी गैरसमजुतीमुळे तरी विवाह इच्छुक मंडळी लग्नाची बाकी आहेत एकीकडे मनुष्य मंगळावर वस्ती करण्याच्या दिशेने विचार करत असताना दुसरीकडे मात्र मंगळ दोषामुळे लग्न आडली जातात हे विचार परस्पर विरोधी आहेत हो का? 

या विचारात नेमकी मेक कुठे आहे चला जाणून घेऊया. मुळात पत्रिकेतील मंगळ हा दोष नसून तो योग आहे. दोष या शब्दापासून एकूणच नकारात्मक भावना निर्माण झाली आहे ज्याप्रमाणे आपल्या कुंडलीत अन्य ग्रहांची स्थिती असते. त्याचप्रमाणे मंगळ या ग्रहाची स्थिती असते. तो देखील प्रत्येकाच्या कुंडलीत असतो तो अमुक एका स्थानावर आल्यावर त्याला मंगळ योग असे म्हणतात.

परंतु त्यामुळे तो दोष अजिबात ठरत नाही हे सगळ्यात आधी लक्षात घ्या. पूर्वीच्या काळी लग्न जुळवताना हा मुला मुलींचे फोटो पाहण्याची किंवा प्रत्यक्ष पाहण्याची प्रथा नव्हती तर केवळ पत्रिका पाहून गुण मिलन केल जात असे. त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या घराण्याबद्दल माहिती मिळाली की मुला मुलींचा स्वभाव व्यक्तिमत्व वागण बोलण उंची रूप रंग कर्तुत्व याचे अनुमान कुंडलीतील ग्रहांवरूनच ठरवले जात असत. 

ज्यांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास अचूक असेल असेच ज्योतिषी कुंडली वरून अचूक भाष्य करत असत. अशा कुंडलीतील मंगळ योग उच्च स्वभाव दर्शवतो उच्चीचा मंगळ असणारी व्यक्ती अथक मेहनत घेणारी जिद्दी स्वाभिमानी आणि शीघ्रकोपी म्हणजेच पटकन रागावणारी संतप्त डोक्याची मानली जाते आणि आता अशा व्यक्तीचा विवाह जर सौम्य मंगळ योग असणाऱ्या व्यक्तीशी जुळवून दिला तर संसार तक धरून राहील. 

अन्यथा दोघेही मंगळ योगाचे असतील तर कोणीच माघार घेणार नाही आणि घराची युद्धभूमी होईल.संसारात काडीमोड घ्यावा लागेल. मंगळ योगा वरून गुणांचे आणि स्वभावाचे मिलन केले जात असे आणि साजेशी पत्रिका मिळेपर्यंत विलंब होत असल्याने मंगळ म्हणजे विलंब हे समीकरणच लोकांनी ठरवून टाकल. अशी कुंडली जुळवताना समोरच्या पक्षाची ग्रहस्थिती लवकर जुळून न आल्याने मंगळ योगाला मंगळदोष संबोधले जाऊ लागले. 

परंतु आजच्या काळात प्रेमविवाहाला मुलांची सर्वाधिक पसंती असल्यामुळे ज्योतिषी सांगतात की प्रेमविवाह करणार असाल तर पत्रिका बघुच नका. कारण तुम्ही परस्परांना गुणदोषांसकट स्वीकारलेला आहे. हे मनोमिलन गुण मिलना इतकाच महत्त्वाचा आहे. अशा विवाहात प्रेम सामंजस्य आत्मीयता अस सगळ असेल तर कोणतीही ग्रहस्थिती आपोआप संसाराला अनुकूल होते. 

पत्रिका पाहून लग्न करायचे झाल्यास मंगळ योगाला अनुकूल पत्रिका पाहून लग्न केले आणि त्याही पलीकडे एकमेकांना गुणदोषासकट स्वीकारण्याची तयारी दाखवली तरच मंगळ ग्रह देखील मंगल ठरवायला वेळ लागणार नाही हे नक्की.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *