नमस्कार मित्रांनो.
३० ऑगस्टला आहे रक्षाबंधन म्हणजे राखी पौर्णिमा आणि या दिवशी राखी नक्की कधी बांधायची शुभ मुहूर्त नक्की काय कारण काहींचा गोंधळ झालेला आहे भद्राकाळ आल्यामुळे रक्षाबंधन ३० तारखेला करायचं की ३१ तारखेला करायचं असाही प्रश्न विचारला जात आहे. या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात.
रक्षाबंधन अर्थात राखी पौर्णिमा हिंदू धर्मातील एक पवित्र सण भावा बहिणीच्या अतूट प्रेमाचे प्रतीक आणि म्हणूनच लाडक्या भाऊरायाला बहीण या दिवशी राखी बांधत असते आणि त्याच्या दीर्घायुष्याची कामना ही करत असते. भाऊ सुद्धा बहिणीच्या रक्षणासाठी आयुष्यभर तिची पाठराखीण करण्यासाठी सिद्ध असतो.
कॅलेंडरनुसार ३० ऑगस्टला रक्षाबंधन आहे या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून बाजारात रंगीबेरंगी राख्या ही बघायला मिळत आहेत. दूर गावी गेलेल्या भाऊरायांना राखी पाठवण्यासाठी बहिणींची लगबग सुरू आहे. असं सगळं वातावरण असतानाच रक्षाबंधन नक्की कधी आहे असाही संभ्रम लोकांच्या मनात आहे . हा संभ्रम निर्माण होण्याचे कारण म्हणजे ३० ऑगस्ट रोजी दिवसभर असलेला भद्राकाळ.
भद्रा काळामध्ये कोणत्याही शुभकार्य केलं जात नाही या काळात शुभकार्य केल्यास त्याचा लाभ होत नाही असा मानला जातो त्यामुळे त्या दिवशी राखी कशी बांधायची असा प्रश्न पडलेला आहे या पार्श्वभूमीवर ज्योतिषशास्त्राने सांगितलेला मुहूर्त जाणून घेऊया ३० ऑगस्ट रोजी म्हणजेच श्रावण पौर्णिमेच्या दिवशी राखी बांधायची असेल तर ३० ऑगस्ट ची रात्रीची वेळ अधिक योग्य आहे. त्या रात्री ८ वाजून ५७ मिनिटानंतर कधीही राखी बांधता येऊ शकते.
मात्र जर तुम्हाला ३१ तारखेला राखी बांधायचे असेल, तर ती सकाळी ७ वाजून ४५ मिनिटांपर्यंत बांधावी. श्रावण महिन्याची पौर्णिमा सुरू होणार आहे ३० ऑगस्ट २०२३ ला सकाळी १० वाजून ५८ मिनिटांनी आणि पौर्णिमेची समाप्ती होणार आहे. ३१ऑगस्ट २०२३ ला सकाळी ७ वाजून ५ मिनिटांनी भद्राकाळ असणार आहे. ती ३० ऑगस्ट ला सकाळी १० वाजून ५८ मिनिटांनी ते रात्री ९ वाजून १ मिनिटापर्यंत आणि म्हणूनच राखी रात्री बांधायला सांगितली जात आहे.
राखी बांधत भावाला औक्षण करताना त्या औक्षणाचा अर्थ समजून घ्यावा अक्षणाचा अर्थ असा असतो की ज्याला आपण औक्षण करतो त्याला दीर्घायुष्य मिळावा उत्तम आरोग्य मिळावा. आणि म्हणूनच औक्षणाच्या ताटामध्ये सगळ्या शुभ गोष्टी ठेवल्या जातात.
औक्षणाच्या ताटामध्ये सुपारी असते अक्षदा असतात कुंकू असतं आणि त्याचबरोबर औक्षणाच्या ताटामध्ये दीपक असतो. तेलाचा दिवा असतो आणि तेलाच्या दिव्यानेच औक्षण केले जाते औक्षण करताना बहिणीच्या मनातून निघालेली सद्भावना भावाचे ही रक्षण करते.
म्हणजे राखी बांधल्याने फक्त भाऊच रक्षण करण्याचे वचन देतो असे बहिण जे औक्षण करते त्याने भावावरची देखील सगळी संकटे दूर होतात. आणि एक प्रकारे बहीणही भावाचे रक्षण करते. भावा बहिणीने एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे हाच संदेश या सणातून दिला जातो.
एक गोष्ट लक्षात ठेवा की राखी पौर्णिमेच्या दिवशी सगळ्यात आधी पहिली राखी देवाला अर्पण करा पहिली राखी देवाला बांधा आणि मग आपल्या भावाला राखी बांधा. तुम्हाला सगळ्यांना राखी पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.