नमस्कार मित्रांनो.
२७ ऑगस्टला एक दुर्मिळ घटना घडणारे आणि ती म्हणजे शनी पृथ्वीच्या जवळ येणार आहे तो पृथ्वीवरन तुम्ही दुर्बिणीने पाहू शकाल इतका जवळ येणार आहे. मग या घटनेचा आपल्यावर काही परिणाम आणि कसा काय असा अचानक जवळ येणार आहे. चला जाणून घेऊयात. अवकाश निरीक्षक अभ्यासक यांच्या दृष्टीने आणि ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने सुद्धा महत्त्वाचा असलेला सूर्यमालेतला ग्रह म्हणजे शनी ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीने शनी महाराजांना सगळेच घाबरतात.
पण खगोलशास्त्राच्या दृष्टीने शनि हा अत्यंत सुंदर ग्रह मानला जातो कारण त्याच्या भोवती असलेल्या कड्यांमुळे शनीचा वेगळेपण खुलून दिसत. शनी ग्रह २७ ऑगस्टला पृथ्वीच्या जवळ येणारे या दिवशी शनी ग्रह हा अगदी सूर्यासमोर राहील याला खगोलशास्त्रात प्रतियुती म्हणतात.
प्रतियुतीच्या आसपास शनी आणि पृथ्वी यांचे सरासरी अंतर कमी असते. त्यामुळे या काळात शनीची सुंदर कडी चांगल्या प्रकारे दिसू शकते त्याचबरोबर ही कढी साध्या डोळ्यांनी नाही तर दुर्बिणीने पहावी लागेल.
शनीला एकूण ८२ चंद आहेत त्यामध्ये सर्वात मोठा चंद्र टायटन आहे. या ग्रहाला सूर्याभोवती एक चक्कर मारायला २९.५ वर्ष लागतात या ग्रहाचा व्यास एक पूर्णांक २० लाख किमी इतका आहे तर तापमान शून्याच्याही खाली १८० अंश सेल्सियस आहे.
या ग्रहाची घनता सर्वात कमी आहे शनीची कडी दोन पूर्णांक ७० लाख किमी पर्यंत पसरलेली आहे आणि बर्फाची आहे. शनी वस्तुमान पृथ्वीच्या ९५ पट आहे पृथ्वीच्या विषणीच्या विषवृत्त पातळीत असते अशा विषयाचे कडे पृथ्वीवरून चांगल्या प्रकारे दिसू शकते.
२७ ऑगस्ट रोजी सूर्य मावळल्यानंतर लगेच शनी ग्रह हा पूर्व क्षितिजावर उगवेल आणि पहाटे पश्चिम क्षितिजावर मावळेल. रात्रभर आकाशामध्ये दिसेल हा ग्रह रात्रभर काळसर पिंगट रंगाचा दिसेल चमकदार दिसेल त्यामुळे हा ग्रह ओळखता येईल. हा ग्रह पृथ्वीच्या जवळ आल्याने मानवी जीवनावर तसा कोणताही परिणाम होणार नसल्याच खगोलशास्त्रज्ञांनी सांगितलाय.
अस असल तरी ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीने बघितल तर शनि महाराजांबद्दल अनेक समज गैरसमज असतात शनि महाराज हे कडक आहेत. शनि महाराजांच्या राशीला येतात त्यांच काही खर नसत असही म्हटल जात. पण खर सांगू ज्योतिषशास्त्राचे गाढे अभ्यासक सुद्धा सांगतात की, शनि महाराज दयाळू आहेत ते तुमच्या कर्मानुसार तुम्हाला फळ देतात. चांगल कर्म करणाऱ्याला चांगल फळ मिळत आणि वाईट कर्म करणाऱ्या ते का सोडतील नाही का त्यामुळे नेहमी चांगल कर्म करत राहाव म्हणजे शनी महाराजांची कृपा राहते.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.