शिवमूठ वाहण्याची योग्य पद्धत कोणती? कोणत्या सोमवारी कशाची शिवामूठ वाहावी.

नमस्कार मित्रांनो…

श्रावणी सोमवारी भगवान शिव शंकरांना शिवा मूठ वाहिली जाते. कोणत्या सोमवारी कोणती शिवामूठ वाहिली जाते शिवामूठ वाहताना काय म्हणाव चला सगळे जाणून घेऊया. श्रावण महादेवाची पूजा उपासना आराधना करण्याचा सर्वोत्तम महिना आणि म्हणूनच या महिन्यांमध्ये महादेवांना जलाभिषेक,दुग्ध अभिषेक,रुद्राभिषेक करून महादेवांची उपासना केली जाते. 

महादेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी श्रावण महिना अत्यंत योग्य मानला गेलेला आहे. श्रावण महिना हा महादेवांना अतिशय प्रिय आहे. याच श्रावण महिन्यामध्ये शिवा मूठीची पूजा ही केली जाते. प्रत्येक महिला आपल्या घराच्या सुख समृद्धीसाठी भगवान शिव शंकरांच्या पिंडीवर शिवा मूठ वाहत असते.

प्रत्येक नवीन लग्न झालेली मुलगी शिवा मुठीचा वसा घेत असते. कारण प्रत्येक मुलीला वाटत की आपण जेव्हा सासरी जातो तेव्हा त्या घरातल आवडत व्यक्तिमत्व आपण बनाव. सासरच्या माणसांची माया आपल्याला मिळावी सासरच्या माणसांमध्ये आपण छान पैकी रुळाव आणि म्हणून आज त्यासाठी श्रावणामध्ये एक वसा घेतला जातो. त्यालाच शिवामोठीचा वसा अस म्हणतात. 

प्रत्येक सोमवारी शिवा मोठ पाहताना शिवा शिवा महादेवा माझी शिवा मोठी ईश्वरा देवा सासू-सासरा धीरा भावा नंदाजावाभरात नावडतीची आवडती कर रे देवा अस म्हणत महादेवांची मनोभावे पूजा केली जाते. या दिवशी शक्यतो उष्ट खाऊ नये. सायंकाळी आंघोळ करून महादेवांना बेलपत्र व्हाव. ही शिवा मूठ श्रावणातील मोठा वसा मानला जातो. ती प्रत्येक महिलेने व्हावी असही सांगितल जात. 

लग्न झाल्यानंतर सलग पहिली पाच वर्ष महाराष्ट्रात स्त्रिया हे शिवास्थ वाहण्याचा व्रत करतात. या व्रता श्रावणातील सर्व सोमवारी उपवास केला जातो आणि शिवपूजन करून त्यावर प्रत्येक सोमवारी क्रमानं तांदूळ तीळ मूग जवस सातू यापैकी एक एक धान्याची मूठ राहिली जाते. म्हणजे पहिला श्रावणी सोमवार असेल तेव्हा तांदळाची शिवा मूठ व्हवी, 

दुसऱ्या श्रावणी सोमवारी तिळाची, तिसऱ्या श्रावणी सोमवारी मुगाची,चौथ्या श्रावणी सोमवारी, जवसाची आणि पाचवा श्रावणी सोमवार आलाच तर सातू वाहावा असा हा क्रम ठरलेला असतो आणि ही शिवा मूठ वाहताना ओम नमः शिवाय या मंत्राचा सतत जप करायचा असतो.

५ वर्षानंतर या वर्गाचे उद्यापनही तुम्ही करू शकतात. यथा विधी शिवलिंगाची पूजा करून ब्राह्मणांना तसेच आप्तेष्टांना यथाशक्ती भोजन भेटवस्तू दक्षिणा देऊन या व्रताची समाप्ती केली जाते. पण अनेक जण या व्रताची समाप्ती न करता पुढे सुद्धा शिवामूठ वाहण्यास चालू ठेवतात. आपल्या पतीसाठी कुटुंबासाठी अशी व्रतवैकल्य महिला आनंदाने करतात. 

नेहमीचा तोच तोच पणा आलेल्या आयुष्यात थोडा का होईना बदल व्हावा हाच या सणवरचा उद्देश असतो. शिवा मोठ तुम्ही घरच्या घरी सुद्धा पाहू शकता किंवा शिवालयात जाऊनही पाहू शकता. जर शिवालयात जाण शक्य नसेल तर घरीच महादेवांच्या पिंडीवर शिवा मूठ व्हावी. शंकराचे नामस्मरण करून ती काढावी आणि नंतर त्यात भर घालून गरजूंनाती दान द्यावी असही सांगितलेल आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *