नमस्कार मित्रांनो.
वीज अंगावर पडू नये म्हणून काय करावे?
भारतात दरवर्षी २५०० व्यक्ती अंगावर विज पडून मृत्यू पावतात. यात प्रामुख्याने शेतकरी बांधव अधिक असतात.
विजा चमकत असताना अंगावरील केस उभे राहिल्यास, त्वचेला मुंग्या किंवा झीनझिण्या आल्यास तुमच्यावर वीज कोसळण्याची शक्यता असते. अशावेळी त्वरित हे करा आणि आपला जीव वाचवा-
चित्रात दाखवल्याप्रमाणे दोन्ही पायात डोके घालून खाली बसा आणि कानावर घट्ट हात ठेवा. खाली बसताना केवळ चवड्यांवर बसण्याचा प्रयत्न करा. पायांची बोटे व जवळचा भाग मिळून चवडा तयार होतो. दोन्ही पायांच्या टाचा उंचावून एकमेकांना स्पर्श करून ठेवा. यामुळे तुमचा जमिनीशी कमीत कमी संपर्क येईल आणि वीज जेव्हा जमिनीवर पडून तुमच्या शरीरात प्रवेश करेल तेव्हा ती एका चवड्यावर ताबडतोब दुसऱ्या कवड्या मागे जमिनीत शिरेल.
त्यायोगे विजेपासून तुम्हाला कमीत कमी नुकसान पोहोचेल. आणि कानावर हात ठेवल्याने विजेच्या प्रचंड आवाजापासून तुमच्या कानाचे पडदे वाचतील. आणि बहिरेपणा येणार नाही लक्षात ठेवा जमिनीशी कमीत कमी संपर्क येईल हे पहा.
वीज अंगावर पडू नये म्हणून काय करावे?
तुम्ही घराबाहेर असाल तर विजा चमकत असताना जर बाहेर असाल तर लगेच सुरक्षित ठिकाणी आसरा घ्या. जसे की बंदिस्त इमारत ,गुहा ,खड्डा इत्यादी.
सुरक्षित आश्रय उपलब्ध झाला नाही तर किमान उंच जागा खाली आश्रय घेणे टाळा. जसं की टेकडी, पर्वत ,छत यावर थांबू नये.
विजा चमकत असताना मोठ्या झाडाखाली थांबू नका उंच झाडे विजेला स्वतःकडे आकर्षित करतात. जर तुम्ही शेतात काम करत असाल किंवा मैदानी प्रवेश असेल आणि सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यायला तुमच्याकडे वेळ नसेल तर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे खाली बसा कान बंद करा.
ऑफिस दुकान यांची दारू खिडक्या बंद करा वाहनात असाल तर काचा बंद करा धातूंच्या वस्तू जसे छत्री चाकू भांडे यापासून दूर राहा तळे धरण तलाव अशा पाण्याच्या ठिकाणांपासून लांब रहा टेलिफोन किंवा विजेच्या खांबाखाली थांबू नका. विजा चमकत असताना मोबाईल फोनचा वापर करू नका.
तुम्ही चार ते पाच जण एका ठिकाणी असाल तर एकमेकांपासून सुरक्षित अंतर ठेवा घोळक्याने राहू नका. सायकल मोटर सायकल ट्रॅक्टर यांच्यावरील प्रवास थांबवा.
घरात असल्यास काय करावे?
विजा कडाडत असताना घराबाहेर पडू नका घरातच थांबा प्रवास टाळा घराच्या खिडक्या, दारू यापासून लांब राहा धातूच्या वस्तूंचा वापर करू नका विजा चमकत असताना कोणतीही विद्युत उपकरणे चालू करू नका कारण जर वीस तुमच्या घरावर किंवा घराजवळ कोसळली तर तुम्हाला विजेचा धक्का बसू शकतो टेलिफोन चा वापर टाळा वीज टेलिफोनच्या तारांमधून वाहू शकते मुल आणि पाळीव प्राणी घरात असतील.
याची खात्री करून घ्या व हत्या पाण्याची संबंध येईल अशी कोणतीही गोष्ट करू नका उदाहरणार्थ अंघोळ करणे भांडी धुणं वगैरे कारण विजेचा प्रवाह हा इमारतीच्या प्लंबिंग आणि धातूच्या पाईप मधून वाहू शकतो. इलेक्ट्रॉनिक साधने वापरू नका. तर अशाप्रकारे आपण विजेपासून स्वतःचा बचाव करू शकता.
घरात असणाऱ्या गॅस सिलेंडरचा सुद्धा अनेकदा स्फोट होतो आणि अनेक गृहिणींना आपला जीव गमवावा लागतो या सिलेंडर बाबतीत कोणती काळजी घ्यावी हे जाणून घ्यायचे असेल तर कमेंट मध्ये गॅस असे नक्की लिहा.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.