आणि बाळूमामानी मुळे महाराजांना गुरु बनवले..! एका कहाणी बाळू मामांची.

नमस्कार मित्रांनो.

श्री बाळूमामनी आपल्या पत्नीचा त्याग केला. त्यांनी आपल्या मेंढ्याची राखण करता  करता लोक कल्याण्याचा धडाही गिरवायला सुरवात केली. काही दिवस गेले एके दिवशी आकाशवाणी झाली की, ‘बाळू तू गुरु करून घे. त्याशिवाय तुला तूझ्या फळ मिळणार नाही’.

मामा विचार करू लागले. मी आता हि मेंढरं सोडून कुठला गुरु हुडकायला जाऊ? त्यांनी मनाशी पुष्कळ विचार केला, त्यांना गुरुकृपेचा ध्यास लागला व त्यांनी मनाशी एक संकल्प केला की, ” आपण लोकांच्या अंगातील भुते मोफत काढतो. तर आपण इथून पुढे प्रत्येक व्यक्तीकडून भूत काढून झाले की गुरुदक्षिणा म्हणून सव्वा रुपया घ्यावयाचा.

आणि जमतील ते रुपये न मोजता, जो कोणी ती रक्कम माझ्याकडे मागेल तोच माझा गुरु, पण त्यांनी मागितलेल्या रक्कमेचा आकडा व भुते काढून जमलेल्या रक्कमेचा आकडा एकच पाहिजे. ” याप्रमाणे मामांनी निश्चय केला.. चार – सहा महिन्यांनी काही रक्कम गोळा झाली. त्या रक्कमेचे गाठोडे बकरी राखणाऱ्या आपल्या मरग्या नावाच्या गड्याच्या पगोट्यात बांधलेले असायचे.

मामा शेवगावाच्या रानात बकरी हिंडवत असता दत्त मंदिरात गेले. त्यांना पाहताच मुळे महाराज म्हणाले. ‘ बाळू माझे पैसे कुठे आहेत दे!’ मामांनी प्रश्न केला किती पैसे सांगा?’ मुळे महाराजांनी सांगितले ‘१२० रुपये !’ मामांनी आपल्या मरग्या नावाच्या गड्याला हाक मारली पैशाचे गाठोडे सोडून मोजले तर ते बरोबर १२० रुपये होते. 

मामांनी झटकान मुळे महाराजांच्या पायाचे दर्शन घेतले! तो दिवस शनिवार दि.१२ -१० १९३० अश्विन वद्य पंचमी शके १८५२ चा होता. नंतर ते पैश्याचे गाठोडे बाळूमामानी आपल्या मरग्या गड्याकडून गारगोटीला महाराजांच्या बरोबर पाठवून दिले. त्यावेळी महाराज महादेव मंदिरात राहत होते. 

महाराजांनी सर्व रक्कम ठेऊन घेतली आणि फक्त ६ आणे मारग्याकडे परत दिले व सांगितले हे ६ आणे माझ्या बाळूला नेऊन दे. बाकीची रक्कम महाराजांनी आपल्या नित्याच्या गरजासाठी खर्च करण्यास सुरवात केली.४-८ दिवसात ११९ रुपये १० आणे खर्च करून महाराज मोकळे झाले.

महाराजांनी जवळील पैसे संपले आणि महाराजांना शौचाला सुरु झाले काही केल्या महाराजांना फार अशक्तपणा आला. पुष्कळ इलाज केले. पण सर्व व्यर्थच! महाराजांनी अंतमूर्ख  होऊन पहिले. त्यावेळी त्यांच्या लक्षात आले की, आपण बाळूचे पैसे खर्चासाठी वापरले. बाळुच्या पैशावर माझा अधिकार नाही.

 तर त्या पैशाचे अधिकारी पंढरपूरातील आंधळे – पांगळे, महारोगी हे आहेत. त्यांनी मामाचे जेवढे पैसे घेतले होते तेवढे जमा करुन वेगळे बाजूला गोठोडे बांधून ठेवले व मनाशी संकल्प केला की, “बाळूचे पैसे मी जेव्हा पंढरपूरला जातो त्यावेळी सर्व गोरगरीब, अनाथ, भिकारी, आंधळे -पांगळे व महारोग्याना वाटतो म्हणून.

” त्यावेळी महाराजांनी हगवन बंद झाली आणि मुळे महाराजांना बाळूमामा कोणी महान संत आहेत याची कल्पना आली. बाळूमामानी गुरुदक्षिणा म्हणून जे पैसे दिले, ते त्यांच्या गुरूंना देखील लाभले नाहीत. 

तर बाळूमामाचे पैसे तुमच्या आमच्या सारख्या मानवाच्या स्वतःच्या स्वार्थासाठी काय लाभतील? बाळूमामा चा एक नया पैसा सुद्धा पचणार नाही, जर कोणी घेण्याचा प्रयत्न केलाच  तर त्यांच्या संसाराची राख रांगोळी होईल यात शंकाच नाही. बाळूमामाच्या नावान चांगभल ओम नमो नारायणा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *