नमस्कार मित्रांनो.
वास्तुशास्त्र आपल्या जीवनात महत्त्वाची भूमिका बजावते पंचमहाभूत जसं पाणी अग्नी आकाश आणि वायू आणि पृथ्वी यात समतोल साधण्याचा शास्त्र म्हणजे वास्तुशास्त्र वास्तु उपाय तुम्हाला आर्थिक प्रगती आणि धन वाढवण्यासाठी मदत करू शकतात.
तुमच्या घरातली सकारात्मकता वाढवण्यासाठी आणि घरात पैसा टिकवा म्हणून काही उपाय तुम्ही केले तर त्याचा निश्चितच तुम्हाला लाभ होईल पण करायचं काय चला जाणून घेऊया. अनेक वेळा कष्ट करूनही कष्टाचे फळ मिळत नाही. आणि आजच्या युगात उत्पन्न कमी आणि खर्च जास्त झालाय त्यामुळेच खर्च भागवण्यासाठी झाले त्यामुळे आपली मेहनत कितीही असली तरीसुद्धा घरात पैसा राहत नाही.
काही दोषांमुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते. कामात अडथळे येतात. कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद होतात आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू लागतात या सगळ्या अडथळ्यांचा सामना आपल्याला करावा लागतो. आणि या सगळ्या समस्यांपासून मुक्तीसाठी वास्तुशास्त्र आपल्याला उपाय सांगते. हे उपाय केल्याने जीवनात धनसंपत्ती येते आर्थिक प्रगती होते.
सुखा समृद्धी आणि वैभवाची प्राप्ती होते आणि त्याचबरोबर आरोग्याची सुद्धा प्राप्ती होते. असेच काही उपाय आता आपण बघूयात आर्थिक सुदृढता आणि संपत्तीसाठी तुमची संपत्ती नेहमी नैऋत्य कोपऱ्यात ठेवावी. अर्थात तुमची तिजोरी पैसे ठेवतात ते कपाट किंवा मौल्यवान वस्तू तुम्ही घरातल्या नैऋत्य कोपऱ्याला ठेवावेत.
कारण नैऋत्य दिशा ही पृथ्वीचे प्रतिनिधित्व करते जी स्थिरता देते. या दिशेला ठेवलेल्या गोष्टी अनेक पटीने वाढतात. आर्थिक संबंधित वस्तू कधीही पश्चिम किंवा दक्षिण दिशेला ठेवू नका. त्याकडे दुर्लक्ष केल्यास आर्थिक नुकसान होऊ शकते. घराच्या ईशान्य कोपऱ्यात मत्सालय किंवा छोटासा कारंजा ठेवणे सुद्धा शुभ मानले जाते. ईशान्य दिशेला देवी देवतांचा वास असतो. आणि ही दिशा घरामध्ये खूप महत्त्वाचे असते.
या दिशेला कधीही घाण किंवा जड वस्तू ठेवू नका कचरा ठेवू नका पाण्याची संबंधित वस्तू या दिशेला ठेवल्याने भाग्याचे दरवाजे उघडतात असे म्हटले जाते आणि धान्याचा योगही वाढतो. मात्र या ठिकाणी डबक्याचे पाणी साठू नये किंवा घाण साचू नये याची काळजी घ्यावी. त्याचबरोबर घरातील सर्व नळ गळत तर नाहीत ना याची खात्री करून घ्यावी.
गळत असलेले नळ वेळीच दुरुस्त करून घ्यावेत. घराच्या मध्यभागीस्थानाला ब्रह्मस्थान म्हणतात ही जागा ईशान्य दिशेप्रमाणे स्वच्छ असावी, रिकामी असावी अज्ञानावर बहुतेक घरामध्ये सोपे टेबल अशा जड वस्तू मध्ये ठेवलेले असतात. घराच्या अगदी मधोमध मांडल्या असतात जे योग्य नाही ही जागा स्वच्छ असावी रिकामी असावी.
त्यामुळे घरात धन समृद्धी वाढते. कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्परांमध्ये प्रेमही वाढते. स्वयंपाक घरीही घरात महत्त्वाची भूमिका बजावते आणि त्यामुळे घरातील अग्नी आकाश वायू पृथ्वी जल या घटकांमध्ये समतोल राहण्यासाठी स्वयंपाक घर नेहमी घराच्या आग्नेय दिशेला असावे आग्नेय दिशा म्हणजेच दक्षिण पूर्व दिशेला असावे. तसेच स्वयंपाक करताना तोंड पूर्वेकडे होईल या प्रमाणे ओठा असावा.
तसेच या ठिकाणी केशरी लाल गुलाबी रंग वापरावा. असे केल्याने घरात धन धान्याची वाढ होते. आणि दुःखापासूनही मुक्ती मिळते. घरात काही पेंटिंग लावायची असल्यास ती सकारात्मक लावावीत त्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशेला लावलेले चित्र धन आणि प्रसिद्धी आकर्षित करते. यासाठी तुमच्या दिवाणखान्यामध्ये अर्थात तुमच्या हॉलमध्ये पूर्वेकडच्या भिंतीवर धावणाऱ्या सात घोड्याचे पेंटिंग लावा.
याशिवाय तुम्ही बेडरूम मध्ये हिरवळ अर्थात ग्रीनरीशी संबंधित पेंटिंग लावू शकता. घरामध्ये समृद्धी आकर्षित करतात. घरातील स्नानगृह नेहमी उत्तर पूर्व किंवा उत्तर पश्चिम या दिशेला असावे. तसेच बाथरूम किंवा टॉयलेटचा दरवाजा लाकडाचा असावा आणि तो नेहमी बंद असावा सगळ्यात महत्त्वाचे बाथरूमच्या दारावर कोणतेही शोपीस किंवा धार्मिक फोटो वस्तू लावू नका.
दुसरीकडे बाथरूम मध्ये पाण्याचा प्रवाह उत्तर पूर्व दिशेला असावा. तसेच लक्षात ठेवा बाथरूम किंवा टॉयलेट कधीही ओले ठेवू नका. आणि बाथरूम मध्ये तपकिरी किंवा मलई किंवा पांढरा हलक्या रंगाचा वापर करावा. तर मित्रांनो तुमच्याही घरात पैसा टिकत नसेल तरी या काही वास्तु टिप्स वापरून पहा आणि घरातला होणारा खर्च थांबवा.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.