नमस्कार मित्रांनो.
आयुष्यात चढ-उतार तर चालूच असतात कधी चांगला काळ तर कधी वाईट काळ आता १६ जुलैपासूनच ग्रहस्थिती तयार होणार आहे. त्याचा काही राशींवर प्रतिकूल परिणाम होणार आहे. म्हणजे त्यांच्यासाठी काही खडतर काळ काही अडचणी पुढील काही दिवसांसाठी असेल कोणत्या आहेत त्या राशी आणि काळात काय करावे चला जाणून घेऊयात.
मित्रांनो नवग्रहांचा राजा असलेला सूर्य १६ जुलै २०२३ ला कर्क राशि मध्ये प्रवेश करणार आहे. १७ऑगस्ट पर्यंत सूर्य महाराज कर्क राशि मध्ये विराजमान असतील. आणि त्यामुळेच शनी आणि सूर्याचा षडाष्टक योग जुळून येत आहे. या योगाचा काही राशींवर प्रतिकूल प्रभाव दिसून येईल असे म्हटले जात आहे.
कारण पुराणानुसार जरी शनी आणि सूर्य पिता पुत्र मानले गेले असले तरी ज्योतिष शास्त्रानुसार शनी आणि सूर्य शत्रु ग्रह आहेत त्यामुळे षडाष्टक योग काही राशींना खडतर काळ घेऊन येईल. यामध्ये सगळ्यात पहिली रास आहे.
१) वृषभ रास- वृषभ राशीच्या लोकांना सूर्याचा कर्क संक्रातीचा काळ काहीसा संमिश्र ठरू शकेल प्रत्येक काम काळजीपूर्वक त्यांना करावे लागेल. अनपेक्षित पणे खर्च समोर येऊ शकतात दुसरीकडे बऱ्याच दिवसांपासून नोकरी बदलण्याचा विचार करत असाल, तर यावेळी उत्कृष्ट संधी येऊ शकते असे असले तरी निर्णय घेण्यापूर्वी प्रत्येक पैलू वर विचार मात्र करावा. अन्यथा नुकसान होऊ शकते.
वैयक्तिक आयुष्यात सुद्धा कठोर निर्णय तुम्हाला घ्यावे लागतील बोलण्यात कठोरता वाढेल कुटुंबातील सदस्यांची तुमचे संबंध वाईट होऊ शकतात. मग यावर उपाय काय आहे ?अर्थात जिभेवर ठेवा साखरेचा खडा आणि डोक्यावर ठेवा बर्फ आपोआप सगळं शांत होईल.
२) वृश्चिक रास- वृश्चिक राशीच्या लोकांना सूर्याचा कर्क संक्रांतीचा काळ काहीसा संमिश्र असेल, काही समस्यांचा सामना त्यांना करावा लागेल . वडिलांसोबत नातं बिघडू शकत प्रकृतीची काळजी घेणे गरजेचे आहे व्यावसायिक जीवनाच्या दृष्टीने संक्रमण असतील नोकरी बदलण्याची ही योग्य वेळ नाही. कौटुंबिक जीवनात त्यांना वाढेल जोडीदाराशी काही जुन्या गोष्टी वरून वाद सुद्धा होऊ शकतात.
३) धनु रास- धनु राशीला आर्थिक आघाडीवर येणारा काळ तसा थोडा कठीण असेल खर्चात वाढ होईल कुटुंबातील सदस्यांच्या आजारपणामुळे धावपळही करावी लागू शकते मानहानीचे प्रसंग येऊ शकतात .कार्यालयात कोणत्याही प्रकारच्या राजकारणापासून दूर राहा. शक्य असेल तर रोज आदित्य हृदय स्तोत्र म्हणावे. किंवा कमीत कमी श्रवण करावे.
४) मकर रास- भागीदारी व्यवसाय करणाऱ्या लोकांमधील संबंध बिघडू शकतात नुकसान होऊ शकतो सावध राहावे. व्यवसायात एक प्रकारे अनिश्चित व्यवहार करावा लागू शकतो सगळ्यात महत्त्वाचा आहे मकर राशींच्या व्यक्तींसाठी वाद विवादापासून दूर रहा. करिअरच्या दृष्टीने कोणतेही नवीन प्रयोग करणे टाळा. शक्य असल्यास सूर्याला लाल रंगाची फुले अर्पण करावीत.
५) कुंभ रास- कुंभ राशीच्या व्यक्तींना सूर्याचा कर्क संक्रातीचा काळ कसा असणार आहे काही कारणास्तव तणावाचा असेल,विरोधक षडयंत्र रचू शकतात. अनावश्यक खर्च वाढू शकेल वैवाहिक जीवनाच्या बाबतीत तणावाचा सामना करावा लागू शकतो. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे बॉस सोबतचे तुमचे संबंध प्रभावित होऊ शकतात. नोकरदारांनी कामावर लक्ष केंद्रित करावे. आणि कोणत्याही प्रकारचा वाद टाळावा.
मित्रांनो मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आयुष्यात चढ-उतार तर चालूच असतात. पण तुम्ही जी कुठली साधना करत असाल, ती तुम्ही बंद करू नका त्या साधनेमध्ये खंड पडू देऊ नका. कारण जेव्हा ग्रह स्थिती स्थिर नसते तेव्हा आपली साधनाच आपल्याला तारते वाचवते जर कुठलीही साधना तुम्ही करत नसाल तर एखादी चांगली साधना तुम्ही सुरू करा.
साधना करायची म्हणजे काय तर एखादं नियमित रोज स्तोत्र म्हणावे. किंवा एखाद्या मंत्राचा जप नियमित करावा. नियमित्येला महत्त्व आहे. साधने मध्ये जेव्हा आपण एखादी गोष्ट न चुकता करतो तेव्हा आपला पुण्याचा साठा वाढत जातो आणि हाच पुण्याचा वाढलेला साठा हा आपल्याला संकट काळात मदत करतो.
अगदीच काही नाही जमले तर रोज श्री स्वामी समर्थ या मंत्राची एक माळ जरी केली तरी स्वामी सगळी काळजी घेतील. कारण ग्रहताऱ्यांच्या वरती सुद्धा स्वामींची शक्ती आहे हे विसरू नका. श्री स्वामी समर्थ.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.