अधिक मासात अजिबात करू नयेत ‘ही ‘ कामे, नाहीतर आयुष्यभर पश्चाताप करत बसावा लागेल.

नमस्कार मित्रांनो.

१८ जुलै पासून सुरु होतोय अधिक महिना अर्थत ज्याला आपण धोंड्याचा महिना किंवा मालमास म्हणतो या महिन्याचे वैशिष्ट्य म्हणजे या महिन्यात काही वेगळ्या गोष्टी केल्या जातात आणि इतर वेळी केल्या जाणाऱ्या काही गोष्टी करायला वर्ज असते. पण नक्की काय करावआणि काय नाही कराव. शुभ कार्य करावे का नाही कोणती शुभ कार्य केलेली चालतात. कोणती शुभ कार्य अजिबात करू नयेत. चला हे सर्व सविस्तर जाणून घेऊयात.

मंडळी १८जुलै पासून अधिक मास सुरु होतो आणि हा १६ ऑगस्टपर्यंत असणार आहे. सर्वसाधारणपणे सरासरी ३२ महिने आणि १६ दिवस अधिक मास येतो. म्हणजे तीन वर्षांनी २०२३ मध्ये श्रावण महिना अधिक आलेला आहे. त्यामुळे मुख्य श्रावण सुरू व्हायच्या आधी अधिक श्रावण आलेला आहे. मलाच आपण अधिकाचा महिना असे म्हणणार आहोत. त्यामुळे यंदाचा चातुर्मास पाच महिन्यांचा असेल. 

अधिक महिना शुभ मानला जात नाही असच या महिन्यात शुभकार्य किंवा नवीन कार्य करू नयेत असही म्हटल जात. अधिक मासाला खरमास असही म्हणतात. अधिक महिन्याला खरमास का म्हटल जात बर याचा अर्थ खराब महिना दुसऱ्या अर्थाने सांगायच झाल तर या महिन्यात शुभकार्य वर्जित आहे.

असा महिना सूर्य दर ३० दिवसांनी तीस अंशाची एक रास पुढे सरकतो. सुर्याच्या या राशी बदलाला  सूर्य संक्रांत सूर्य संक्रमण असे म्हटल जात. अधिक महिन्यात सूर्य रास बदलत नाही. त्यामुळे सृष्टी मलीन झाल्यासारखी भासते. म्हणून याला मलमास असेही म्हटले जाते.

अधिक महिन्यात सूर्य प्रतिकूल असल्याच मानल जात. यासाठी या कालावधीत हाती घेतलेली काम पूर्णत्वास जाऊन यशस्वी होतीलच असे नाही. असंच अनेक ठिकाणी अधिक महिना शुभ मानला जात नाही. पण काही गोष्टींसाठी अधिक महिना शुभ मानला जातो. सर्वात आधी पाहूयात कोणती कार्य अधिक महिन्यात करू नयेत.

१) विवाह अधिक महिन्यांमध्ये वर्जित आहे. अधिक महिन्यामध्ये विवाह सारखी मंगल कार्य अजिबात करू नयेत. अधिक महिन्यामध्ये केलेली विवाह यशस्वी होत नाहीत. वैवाहिक जीवनात अडचणी येतात. वैवाहिक जीवनात सुखाची प्राप्ती होत नाही.

२) नवीन कार्याचा शुभारंभ अधिक महिन्यात करू नये. व्यापार व्यवसाय किंवा उद्योग विस्ताराच्या काही तुमच्या नवीन योजना असतील काही तुमचे नवीन प्रकल्प असतील तर ते थोडे लांबणीवर टाका . कारण नवीन कार्यारंभ अधिक महिन्यामध्ये करू नये.

३) एक महिन्यांमध्ये केलेले नवीन करार प्रकल्प योजना ठरत नाहीत. आर्थिक समस्यांमध्ये भर पडू शकते. व्यापार व्यवसायात उद्योगाची गती मंदावू शकते. म्हणून अधिक महिन्याच्या कालावधीत नवीन काम किंवा नवीन नोकरी तसेच नवीन गुंतवणूक करू नये असे सांगितले जाते.

४) अधिक महिन्यात गृहप्रवेश वास्तुशांती संन्यास ग्रहण विवाह देव प्रतिष्ठा इत्यादी  कार्य करू नयेत. तसेच जागा मालमत्ता संपत्ती खरेदी विक्री करू नयेत . असे केल्याने भविष्यात नुकसान संभवते.

५) नित्य आणि नैतिक कार्य मात्र करावीत. ज्वलशांती देवाची पुनर्प्रतिष्ठा  करता येते. ग्रहण श्राद्ध जातकर्म नामकरण अन्नप्राशन इत्यादी संस्कार करता येत.

६) मात्र मुंडन किंवा कर्णवेध आधी संस्कार करू नये.

आता बघूया अधिक महिना कोणत्या कामासाठी शुभ आहे.

१) अधिक महिना व्रतवैकल्य दान उपवास पूजा यज्ञ हवन ते सर्व काही करण्यासाठी सर्वोत्तम मानल जातो. या कालावधीत केलेल्या आराधना उपासना नामस्मरण जप यामुळे पाप धर्माचा नाश होऊन पुण्य कर्म प्राप्ती होते असेही सांगितले जाते. या कालावधीत केलेल्या दानाच पुण्य फळ हे अधिक पटीने मिळत.

२) तसेच या महिन्यांमध्ये भगवान श्रीकृष्ण त्यांच्या कथा श्री भागवत कथा भगवान श्रीरामांच्या कथा विष्णुसहस्त्र राम श्री सूक्त हरीमानसु पुराण तसेच सद्गुरूंनी दिलेले मंत्र या सगळ्याचा नियमित जप करावा.

३) तीर्थस्थळी जाऊन स्नान करावे. त्याबरोबरच दीपदान वस्त्रदान भागवत भागवत कथा यांचे दान हे सुद्धा अधिक महिन्यात केल्याने पुण्य फलदायी मानले जाते. असे केल्याने धन वैभव एकंदरीतच जीवनात सुखाची प्राप्ती होते.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *