१९ वर्षांनी श्रावणात दुर्मिळ योग, यंदा ८ श्रावणी सोमवार येणार. जाणून घ्या सविस्तर माहिती येथे.

नमस्कार मित्रांनो.

यंदा म्हणजेच २०२३ मध्ये तुम्ही कॅलेंडर नीट उघडून पाहिलत का तुम्हाला श्रावण महिना दोन महिन्यांचा दिसेल. एकूण आठ श्रावणी सोमवार दिसतील हा काय गोंधळ आहे श्रावण महिना दोन महिन्यांचा कसा काय आणि आठ ही श्रावणी सोमवारी उपवास करायचा का नक्की काय करायच चला जाणून घेऊयात.

मित्रांनो आषाढी एकादशी पासून चातुर्मासाला प्रारंभ होत आहे. यंदा चातुर्मास विशेष मानला जातोय कारण यावर्षीच्या चातुर्मासात एक महिना अधिक आला आहे. साधारणतः हा चार महिन्यांचा चातुर्मास असतो पण यंदा पाच महिन्यांचा चातुर्मास आहे. मराठी पंचांगानुसार दर तीन वर्षांनी एक महिना अधिक धरला जातो आणि तेव्हा ते वर्ष तेरा महिन्यांचे असते. जसे की यंदाचे वर्ष तेरा महिन्याचे असणार आहे. 

अधिक मासाला पुरुषोत्तम मास आपल्या साध्या भाषेत बोलायच झाल तर धोंड्याचा महिना असे सुद्धा म्हणतात. आता ही अधिक मास येण्याची पद्धत पूर्णपणे खगोलशास्त्र आहे बर का. यदा म्हणजे २०२३ मध्ये श्रावण महिना अधिक असणार आहे. १९ वर्षांनी श्रावण महिन्यात असा अद्भुत दुर्मिळ योग जमून आला आहे. चातुर्मास सुरू झाल्यानंतर पहिला श्रावण महिना येतो आणि श्रावण महिना महादेवांना समर्पित आहे. 

भगवान शंकरांच्या पूजेसाठी श्रावण महिना विशेष मानला जातो. यावर्षीचा श्रावण खूप खास आहे. नेहमी श्रावण महिन्यात चार किंवा पाच श्रावणी सोमवार येतात. पण यंदाचा श्रावण संपूर्ण दोन महिन्याचा असून महादेवांचे पूजन नामस्मरण आराधना करण्यासाठी भाविकांना चार नव्हे तर आठ सोमवार मिळणार आहेत. आता बघूया श्रावण महिना कधी सुरू होत आहे.

सन २०२३ मध्ये मंगळवारी १८ जुलै २०२३ रोजी अधिक श्रावण महिन्याला सुरुवात होईल म्हणजेच अधिक महिन्याला सुरुवात होईल. अधिक श्रावण महिन्याची सांगता बुधवारी १६ ऑगस्ट २०२३ रोजी होणार आहे. म्हणजेच अधिकाचा महिना १६ ऑगस्टला संपणार आहे आणि त्यानंतर निज म्हणजेच नियमित श्रावण महिना सुरू होणार आहे. सतरा ऑगस्टपासून हा नियमित श्रावण महिना सुरू होणार आहे आणि तो १५ सप्टेंबर २0२३ मध्ये समाप्त होईल. 

आता यामध्ये अधिक आणि निज महिना धरल्यास श्रावण महिना ५९ दिवसाचा असणार आहे. वास्तविक पाहता अधिक मास असणाऱ्या श्रावण महिन्याच्या पहिल्या महिन्यात श्रावणाशी संबंधित शुभकार्य होणार नाही. श्रावण महिन्याच्या दुसऱ्या महिन्यात म्हणजेच शुद्ध श्रावण महिन्यात ती होतील. मात्र शिवशंकराची आराधना उपासना  नामस्मरण अधिक श्रावण महिन्यात सुद्धा केल जाऊ शकत.

आता जर तुमचा फार गोंधळ होत असेल ना तर लक्ष देऊन वाचा. श्रावण महिना दोन महिन्यांचा आला असला तरी तो पहिला महिना आहे तो अधिक महिना आहे अर्थात धोंड्याचा महिना आहे. त्यामुळे त्या महिन्यात श्रावणी सोमवारचे उपवास करायचे नाहीत. आपल्याला श्रावणी महिन्याचे उपवास करायचे आहेत. निज महिन्यात म्हणजे नेहमीचा जो श्रावण महिना येतो.

त्या महिन्यात निज श्रावण महिन्यात श्रावणी सोमवारी केली जाणारी व्रत  उपासना करता येणार आहे. मी जय श्रावण महिन्यातील पहिला सोमवार असेल २१ ऑगस्टला, दुसरा श्रावणी सोमवार असेल २८ ऑगस्टला, तिसरा श्रावणी सोमवार असेल ४ सप्टेंबरला आणि शेवटचा म्हणजे चौथा  श्रावणी सोमवार असेल ११ सप्टेंबरला याच श्रावणी सोमवारी तुम्हाला श्रावणी सोमवार करायचे आहेत आणि पूजा विधी करायचे आहेत.

आता श्रावणी सोमवारी महादेवांचे पूजन कसे करायच श्रावणी सोमवारी सकाळी लवकर उठून स्नानादी कार्य ओळखावी त्यानंतर श्रावणी सोमवारच्या व्रताचा संकल्प करावा. कोणत्याही शिवमंदिरात जाऊन किंवा घरामध्ये शिवलिंगावर गंगाजल अर्पण करावे, पंचामृत अर्पण करावे आणि त्यानंतर ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत. 

महादेवांवर जल अभिषेक करावा. याशिवाय महादेवांना पांढरी फुल, अक्षदा,चंदन, धोत्रा, धूपदीप नैवेद्य  हे सर्व काही अर्पण करावे. महादेवांची आरती करून मनोभावे प्रार्थना करावी. त्यानंतर श्रावणी सोमवारची कथा अवश्य पठण करावी किंवा कमीत कमी ऐकावीआणि प्रसाद ग्रहण करावा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *