नमस्कार मित्रांनो.
प्रत्येक स्त्रीकडे मौल्यवान दागिने असतात. तुमच्याकडे ही भरपूर दागिने असतीलच. मात्र ती स्त्री मृत पावल्यानंतर तिचे सोने दागिने किंवा जे काही दागिने आहेत ते मुलं मुलींना नातवंड अशा जवळच्या व्यक्ती ते दागिने वापरत असतात. परंतु मृत झालेल्या व्यक्तीचे दागिने वापरावे का किंवा ते वापरल्यानंतर त्याचे काय परिणाम होणार आहेत याविषयी चला आज जाणून घेऊया.
कधी व्यक्ती मृत पावते त्यावेळी तिचा आत्मा ते शरीर सोडून जातो. आणि त्या मृत व्यक्ती बरोबरच तिच्या ज्या काही वस्तू आहेत. त्या देखील आपले जीवन सोडून जातात. मग त्या वस्तू आपण वापरल्या तर आपली जी काही सकारात्मक ऊर्जा स्थिती नकारात्मक ऊर्जेमध्ये बदलण्यास सुरुवात होते. आपल्या मधील बरेच जण धार्मिक शास्त्राला मानत असतात आणि जी व्यक्ती मृत पावलेली आहे.
त्या वस्तू नष्ट करण्यात प्रयत्नशील राहतात. परंतु आपल्यापैकी आणखी काही जण असतात.त्यांची आठवण म्हणून आपल्याजवळ त्या वस्तू ठेवतात. मृत व्यक्तीच्या वस्तू कधीही त्या दानच करायला हव्यात. मात्र अशा काही मौल्यवान वस्तू ज्या जास्त किमतीच्या दाग दागिने असतात. त्या आपल्याजवळ असतात. मग त्या दान करायला तयार नसतात. मात्र अशा परिस्थितीत गरुड पुराण काय सांगत.
तर गरुड पुराणानुसार असा सल्ला देण्यात येतो की मृत झालेले व्यक्ती तुमची भाऊ-बहीण आई-वडील असेल तर तुम्ही त्या व्यक्तीचे जे काही दागिने असतील. ते दागिने तुम्ही वाटून घेऊ शकता. मात्र तो दागिना सोनाराकडे देऊन दुसरा एखादा नवीन दागिना बनवून घेऊ शकता. त्याचबरोबर जर मंगळसूत्रासारखा एखादा दागिना असेल म्हणजे ज्याचा वापर जास्त झालेला असेल.
मृत व्यक्तीने तो दागिना आयुष्यभर जपून ठेवला असेल. तो दागिना आपल्यापासून दूरही ठेवलेला नसेल तर असा दागिरा मंगळसूत्र असू शकत. त्याबरोबरच अशा मृत व्यक्ती ज्या वस्तू आयुष्यभर जपून ठेवतात. अशा वस्तू आपण न वापरलेल्या चांगल्या असाही सल्ला देण्यात येतो. तर मृत व्यक्तीचे जे काही दागिने आहेत. जे बाकीचे तुम्ही वापरणार आहात. ते दागिने तुम्ही २४ तास तरी पाण्यात ठेवणे आवश्यक आहे.
या वस्तू चोवीस तास पाण्यात ठेवूनच मगच त्या वापराव्या असा सल्ला देण्यात येतो. हा बरोबर या वस्तू तुम्ही वापरणारच असाल तर तुम्ही त्या वस्तू विकून त्याचे जे काही पैसे मिळतील त्याचा वापर सुद्धा स्वतःसाठी करू नये. परंतु पैसा तुम्हाला कधीही लाभ देत नाही असे म्हटले जाते. त्यामुळे त्या पैशाचा कोणत्याही चांगल्या कामासाठी वापर करावा. वैयक्तिक कामासाठी तो पैसा वापरू नये.
कारण अस म्हटल जात की मृत व्यक्तीने जे दागिने सारखे वापरले आहेत त्या वस्तू आपण कधीही न वापरलेले चांगल आणि ज्या वस्तू दागिने दररोजच्या वापरात नसतील असे दागिने वापरले जाऊ शकतात. म्हणजेच ते दागिने आपल्या कुटुंबामध्ये नातेवाईकांमध्ये वाटून घेऊ शकतो किंवा त्या दागिने पासून नवीन एखादा दागिना बनवून घेऊ शकतो.
आता यामध्ये शास्त्रानुसार असे सांगितले जाते की, माणसाचा मृत्यू होतो त्यावेळी तो या जगातून निष्क्रिय होऊन जातो. सोप्या शब्दात सांगायच झाल तर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तिचे वापरलेले दागिने एखाद्या व्यक्तीने वापरले तर त्या वस्तूमुळे आपण आपली ऊर्जा सुद्धा गमावून बसू शकतो.
त्यामुळे जर तुम्ही मृत व्यक्तीच्या वस्तू वापरल्या नकारात्मक ऊर्जा नकारात्मक ऊर्जेस बदलण्यास वेळ लागणार नाही. मृत व्यक्तीच्या दागिन्यांच काय कराव हा निर्णय सुद्धा तुम्हालाच घ्यायचा आहे.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.