१५ जून ते १६ जून या राशींच उजळणार ‘नशीब’ बघा आपली रास आहे की नाही यात.

नमस्कार मित्रांनो.

१५ जुन ते १६ जुलै हा एक महिना काही राशींचा आयुष्य बदलणार आहे.काही राशींचे नशीब उधळणार आहे तर काही राशींना काळजी घेण्याची सुद्धा गरज आहे. अस काय घडणार आहे एका महिन्यामध्ये आणि कोणत्या आहेत त्या राशी त्यांच्या बाबतीत चांगल घडेल आणि ज्यांना काळजी सुद्धा घ्यावी लागेल. चला जाणून घेऊयात.

मित्रांनो १५ जून गुरुवारी संध्याकाळी सहा वाजून सात मिनिटांनी सूर्याचे मिथुन राशि मध्ये संक्रमण होणार आहे. सूर्य मिथुन राशि मध्ये सुमारे एक महिना असेल. म्हणजेच १५ जून ते १६ जुलै असा हा कालावधी असेल. त्यानंतर सूर्य कर्क राशित प्रवेश करेल. यालाच कर्क संक्रांति असेही म्हणतात. जशी मकर संक्रात असते तशीच कर्क संक्रातही असते. तूर्तास तरी येत्या महिन्यात होणाऱ्या बदलांचा विचार करून आणि त्याची सविस्तर माहिती घेऊया. 

सूर्याचा राशि बदलावर  मानवी जीवनावर सगळ्यात मोठा प्रभाव पडतो. सूर्य हा पृथ्वीवरील ऊर्जेचा सर्वात मोठा नैसर्गिक स्त्रोत आहे.तर नवग्रहांपैकी सूर्य सर्वात मोठा मानला जातो. सूर्याला राजा मानला जातो. ज्योतिष शास्त्रात सूर्य हा ज्योतिष शास्त्राचा आत्मा पिता नायक इत्यादींचा कारागृह मानला जातो. कुंडलीत सूर्याच्या बदलामुळे व्यक्तीला मान स्थान सन्मानही प्राप्त होतो. 

ज्योतिष शास्त्रांच्या मते सूर्य मेष राशीमध्ये उच्च आणि तूळ राशीमध्ये दुर्बल मानला जातो. यंदाचे हे सूर्याचे संक्रमण बारा राशींवर पूर्णपणे परिणाम करेल. परंतु काही राशींच्या लोकांसाठी ते शुभ असेल तर काही राशींच्या लोकांना त्या काळात सावध राहावे लागेल. आधी आपण बघूयात कोणत्या राशीसाठी हे शुभ असेल.

१) मेष रास- मेष राशीच्या तिसऱ्या घरात सूर्याचे संक्रमण होणार आहे. या संक्रमणामुळे प्रवासाची शक्यता निर्माण होते. धैर्य आणि पराक्रम तुमचा वाढेल. लोकांचा सहकार्य तुम्हाला मिळणार आहे. नवीन लोकांशी तुमची भेट होईल. त्यामुळे आर्थिक आघाडावर भरभराट ही होईल. कामात लाभ मिळेल. सर्व गोष्टी नीट समजून घेऊन विचारपूर्वक काम केल्यास व्यवसायात प्रगती दिसून येईल. माझ्या ठिकाणी सहकाऱ्यांशी चांगल वागण तुम्हाला लाभदायक ठरेल.

२) सिह रास- सूर्याचे हे संक्रमण सिंह राशींच्या लोकांच्या अकराव्या घरात होईल. हे संक्रमण अनेक बाबतीत फायदेशीर ठरेल. सर्व कामांमध्ये अनुकूल परिणाम मिळतील. यश मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही कोणतेही काम कराल त्यात तुम्हाला यश मिळेल. यावेळी तुमच्याकडून शत्रूंचा पराभव होईल. समाजातील लोकांचे सहकार्य मिळेल. समाजात मानसन्मान मिळेल. पैसे मिळण्याची सुद्धा शक्यता आहे.

३) कन्या रास- सूर्याचे संक्रमन कन्या राशीच्या दहाव्या स्थानात होणार आहे. कामाच्या ठिकाणी त्यामुळे यश दिसून येईल.करिअरमध्ये उंची गटू शकला. नोकरीत पद आणि प्रतिष्ठा मिळेल. व्यवसायात चांगली प्रगती होण्याची देखील शक्यता आहे. कार्यक्षमतेत वाढ होईल. नवीन मित्रांचा सहकार्य या काळात मिळताना दिसेल. मात्र कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका. कारण कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवल्यास तर मोठा पश्चाताप सहन करावा लागेल.

४) कुंभ रास- कुंभ राशीसाठी सुद्धा हा काळ चांगला असणार आहे कारण नवीन कार्य सुरू होण्यासाठी हा काळ उत्तम आहे. प्रेम संबंधांमध्ये नात्यात मधुरता वाढेल. आरोग्य चांगले राहील. जोडीदारासोबत समन्वय चांगला राहील. व्यवसायात प्रगतीच्या संधी मिळतील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी तर हा काळ भाग्यशाली आहे.

मित्रांनो या होत्या त्या राशी  तुमच्यासाठी काय चांगला आहे. पण कोणाला काळजी घ्यायची आहे. हा कोणत्या राशी आहेत ते बघुया. या संक्रमणादरम्यान मिथुन, कर्क, तूळ आणि मीन या राशींच्या लोकांकडे लक्ष देण्याची गरज आहे. या राशींच्या लोकांचा आरोग्य बिघडू शकत. कामात अडथळे येऊ शकतात. खर्च वाढू शकतो. 

यश प्राप्तीसाठी खूप प्रयत्नही करावे लागतील. मुळे या काळात तुम्हाला अधिक मेहनत करावी लागेल आणि स्वतःला फिट ठेवण्यासाठी पूर्ण तयारी करावी लागेल. आरोग्याकडे लक्ष द्या आणि सूर्य देवाची कृपा होण्यासाठी रोज सकाळी सूर्योदयाच्या वेळी सूर्याला एका तांब्याच्या कलशामध्येजल अर्पण करा .

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *