नमस्कार मित्रांनो.
१७ दिवस ६ राशींसाठी राज्य योगाचे ठरणार आहेत. कोणत्या आहेत त्या सहा राशी आणि कोणत्या आहेत ते १७ दिवस चला जाणून घेऊया. नवग्रहचा राजकुमार मानला गेलेला बुध ग्रह हा सात जूनला मेष राशीतून वृषभ राशीत प्रवेश करत आहे. वृषभ राशी सध्याच्या घडीला नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य ही विराजमान आहे. त्यामुळेच बुध आणि सूर्याचा बुधादित्य योग जुळून आला आहे.
हा एक प्रकारचा राजयोग मानला जातो. बुध काही दिवसांसाठी वृषभ राशीमध्ये विराजमान असेल आणि त्यानंतर बुध ग्रह मिथुन राशि मध्ये प्रवेश करणार आहेत.
हे सात जून रोजी बुध वृषभ राशि मध्ये प्रवेश करणार असून २४ जून रोजी बुध वृषभ राशीतून मिथुन राशि मध्ये प्रवेश करणार आहेत आणि त्याआधी १५ जूनला सूर्य मिथुन राशि प्रवेश करेल. त्यामुळे सूर्य आणि बुधाचा बुधादित्य योग मिथुन राशि मध्ये जुळून येणार आहे. जे काही ग्रहमान तयार होत आहे ज्याचा फायदा ज्या सहा राशींना होणार आहे त्याच्याबद्दल जाणून घ्या.
१) वृषभ रास- वृषभ राशीतच बुध ग्रह प्रवेश करणार आहे. मग या राशीत बुध ग्रह१७ सुमारे विराजमान असेल. या राशीच्या व्यक्तींना बुधाचा प्रवेश लाभदायक ठरू शकतो. पैशांची बचत करण्यात यश मिळेल. नोकरीत चांगल्या संधी मिळू शकतील. तुम्हांला परदेशात नोकरी किंवा शिक्षण घ्यायचे असेल तर ती इच्छा सुद्धा पूर्ण होऊ शकते. कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा तुम्हाला मिळेल. कुटुंबाच्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. कामाच्या ठिकाणी बुद्धिमत्तेच्या जोरावर उत्कृष्ट कार्य तुम्ही करू शकाल. तुमच्या आरोग्यातही सुधारणा होईल.
२) कर्क रास- कर्क राशींच्या व्यक्तींना बुधाचा वृषभ राशीतला प्रवेश सकारात्मक ठरू शकेल. वैवाहिक जीवनात सामंजस्य दिसून येईल.नात मजबूत होईल. व्यवसायाच्या संबंधित काम यशस्वीरित्या पूर्ण होऊ शकते. आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकेल. सन्मान वाढेल. प्रदेशात राहणाऱ्या नातेवाईकांकडून चांगली बातमी मिळू शकेल. अडकलेले पैसे सुद्धा मिळण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये एकंदरीतच तुम्हाला तुमची प्रगती बघायला मिळेल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा काळ उत्तम आहे.
३) कन्या रास- कन्या राशीच्या व्यक्तींना सुद्धा हा काळ लाभदायक आहे. नोकरीत नवीन आणि चांगल्या संधी त्यांना मिळतील. नवीन ओळखी होऊ शकतील. कौटुंबिक वातावरण चांगले राहू शकेल. नशीबाची साथ लागू शकेल. रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात.
सरकारी योजनांचा फायदा होऊ शकतो. आर्थिक दृष्ट्या मजबुती तुम्हाला दिसून येईल. व्यवसायात मात्र नफा मिळवण्याचा रननितीत बदल करावा लागेल. नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्यांसाठी चांगल्या संधी जुळून येतील.
४) तुळ रास- तूळ राशीच्या व्यक्तींना हा काळ निश्चितच अनुकूल असेल. व्यवसायिक आणि नवीन बाबींमध्ये चांगले ला दिसून येतील. व्यवसायात चांगली वाढ होईल. प्रगतीच्या संधी उपलब्ध होतील. नशिबाची साथ लाभेल. जोडीदारासोबत ते नाते मजबूत होईल.
कौटुंबिक वातावरण चांगले राहू शकेल. गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर नफा होण्याची शक्यता आहे. मुलांची प्रगती पाहून मन प्रसन्न होईल. पैशांची बचत करण्यामध्ये तुम्हाला यश प्राप्त होईल.
५) मकर रास- मकर राशीच्या व्यक्तींना सुद्धा बुधाचा वृषभ प्रवेश फलदायी ठरणार आहे. आर्थिक स्थिती मजबूत असेल. नोकरदारांना चांगल्या पगार वाढीची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी सहकार्यांची साथ मिळेल. कार्यक्षेत्रात चांगले फायदे पाहायला मिळतील.
सरकारी परीक्षेची तयारी करत असाल चांगली बातमी मिळू शकते. रोजगारांच्या शोधात असलेल्यांना सकारात्मक बातमी मिळू शकेल. कुटुंबासह चांगला वेळ घालवू शकाल. सहलीला सुद्धा तुम्ही जाऊ शकता. विवाहासाठी तुम्हाला चांगली स्थळे सांगून येतील.
६) मीन रास- मीन राशीसाठी हा काळ लाभदायक असेल.करियरमध्ये चांगली प्रगती होऊ शकेल. प्रदेशातून नोकरीच्या संधी मिळू शकतील. गुंतवणुकीतून चांगला परतावा सुद्धा मिळेल. नफा मिळवण्याच्या चांगल्या संधी समोर येतील.
मुलांच्या करिअरच्या संबंधित चांगली बातमी मिळाल्याने मनावरच ओझ हलक होईल. बचत करण्यातही तुम्ही यशस्वी होऊ शकाल. कामे सहज आणि हुशारीने पूर्ण करू शकाल. मालमत्ता किंवा जमीन खरेदी करायची असेल तर इच्छा पूर्ण होऊ शकेल. वडीलधारांचा आशीर्वाद मिळू शकेल.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.