“या” राशीच्या लोकांना लागतात गप्पाच गप्पा.! बघा तुमची रास आहे की नाही यात.

नमस्कार मित्रांनो.

रास ही एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल बरच काही सांगते. राशींच्या मदतीने तुम्हाला एखाद्या व्यक्तीच्या सवयी आणि स्वभावा बाबत सुद्धा खूप काही जाणून घेता येतं. त्यामुळे व्यक्तीतील गुण आणि दोष पाहायला मिळतात. काही राशी अशा आहेत ज्यांना गप्पा मारायला खूप आवडतात. अशा व्यक्तींकडे बोलण्याची कला सुद्धा असते आणि त्यामुळे त्या अनेकांचे मन जिंकून घेतात.

अशा व्यक्तीसमोर कोणताही विषय मांडला तरी त्या व्यवस्थित त्या विषयावर बोलू शकतात कोणत्या आहेत त्या राशीचा चला जाणून घेऊयात. मित्रांनो ज्या व्यक्तींना खूप गप्पा मारायला आवडतं अशांमध्ये पहिला नंबर लागतो

१) मिथुन रास- मिथुन राशीचा स्वामी ग्रह आहे बुध आणि या राशींना अगदी अनोळखी असणाऱ्या व्यक्तींबरोबर सुद्धा गप्पा मारायचे कौशल्य असते असं म्हणतात की बुद्धाच्या प्रभावामुळे मिथुन राशीत संवाद साधण्याच्या कलेत निपुण असतात. गप्पा द्वारे आपल्याकडे लोकांना आकर्षित करतात. आणि म्हणूनच मिथुन राशीचे लोक कम्युनिकेशन स्किल मध्ये निपुण असतात. 

अर्थात जिथे संभाषणातून कमाई करायची आहे अशा क्षेत्रात चांगली कामगिरी करतात . या राशीच्या लोकांना मैत्री कशी टिकवायची हे चांगलं माहिती असतं त्याच बरोबर आपल्या संभाषणातून इतरांचा मन कसं वळवायचं तुमच्या घरात ओळखीत कोणी मिथुन राशीचा आहे का आणि त्यांच्याशी वर्णन किती टक्के जुळतंय कमेंट करू नक्की सांगा 

२) सिंह रास- सिंह राशीचा स्वामी ग्रह सूर्य आहे. सिंह राशीचे लोक त्यांचा बहुतेक वेळ अनेक लोकांच्या सानिध्यात घालवतात. त्यांना लोकांमध्ये राहायला आवडतं संवादाच्या माध्यमातून पटकन नाते तयार करतात असे म्हणतात की सिंह राशीचे लोक कोणत्याही मुद्द्यावर बोलू शकतात. आणि आपल्या वैयक्तिक हिताची काळजी मात्र देखील घेतात. 

अशी लोक संवादाच्या माध्यमातून पटकन इतर लोकांच्या मध्ये मिसळून जातात. फक्त त्यांचं बोलणं समोरच्याला तेवढेच स्पष्ट वाटते. आणि त्याचबरोबर समोरच्यावर अधिकार गाजवण्याचा स्वभाव मात्र या राशींचा असतो ते त्यांच्या बोलण्यातून सुद्धा जाणवते.

३) कन्या रास- कन्या राशीचा सुद्धा स्वामी मिथुन राशि सारखा बुद्ध आहे. या लोकांकडे सुद्धा संवाद कौशल्य चांगलेच असते या लोकांना बोलायला आवडते. असे म्हणतात की या राशीची लोक संवादातून कोणाशीही पटकन मैत्री करतात आणि जेव्हा संभाषणातून समस्या सोडवण्याचा प्रश्न येतो तेव्हा त्यातही ही लोक पुढे असतात. 

कन्या राशीच्या समोर एखादा अधिकारी नेता किंवा पुढारी तरीही ते त्यांच्याशी न डगमगता बोलू शकतात आणि त्यांचे मुद्दे नीट समजावून सांगू शकतात मुद्देसूद बोलणे हा त्यांचा गुण असतो. अनेक समस्या सोडवण्याचे कौशल्य यांच्यात असते.

४) वृषभ रास- शुक्र या राशीचा स्वामी आहे त्यामुळे या राशीचे लोक उत्तम संभाषण करणारे असतात असे मानले जाते असे म्हणतात की त्यांना जेवढे बोलायला आवडतं तेवढेच त्यांना इतरांचे ऐकायलाही आवडते वृषभ राशीचे लोक विचारांची देवाण-घेवाण करण्यात चांगले असतात. 

विषय कोणताही असो माहितीची देवाण-घेवाण ही चांगल्या प्रकारे करतात कोणत्याही विषयावर बोलायचं असले तरी मागे हटत नाहीत इतकच कशाला संभाषणाला योग्य विषय देण्याचे कौशल्य सुद्धा यांच्याकडे असते मग मित्रांनो तुमच्या घरात कोणी वृषभ राशीची व्यक्ती आहे का? हे आम्हाला कमेंट द्वारे कळवा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *