सुख-समृद्धीसाठी घरात या दिशेला ठेवा हनुमानाची मूर्ती काय आहेत वास्तूचे नियम?

 नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो प्रत्येकालाच आपल्या घरामध्ये सुख शांती घरामध्ये नांदावी असे मनोमन वाटत असते. आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची अडचणी येऊ नये. कोणत्याही संकटांचा सामना आपल्याला करावा लागू नये. यासाठी आपण अनेक प्रकारचे उपाय देखील करतो. परंतु त्याचा काहीच उपयोग न झाल्याने आपण उपाय करणे सोडून देतो. परंतु मित्रांनो वास्तुशास्त्रामध्ये अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत. 

म्हणजेच आपल्या घरामध्ये कोणत्या वस्तू कोणत्या दिशेला असाव्यात याविषयी सविस्तर माहिती सांगितली आहे.त्यानुसार तर तुम्ही त्या वस्तू ठेवल्या तर यामुळे तुमच्या घरामध्ये सुख-समृद्धी नांदू शकेल.कोणताही दोष आपल्या घरामध्ये होत नाही. 

तर मित्रांनो जर तुमच्या घरामध्ये हनुमानाची मूर्ती असेल तर ती नेमकी कोणत्या दिशेला ठेवावी याविषयी आज मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर मित्रांनो तुम्ही योग्य दिशेला हनुमानाची जर मूर्ती ठेवली तर यामुळे तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदू शकते.

मित्रांनो हिंदू धर्मात देव देवता आणि पूजा विधीला विशेष महत्त्व दिले गेले आहे. घरात सुख-समृद्धीसाठी आपण रोज देवघरातल्या देवांच पूजन करतो. वास्तुशास्त्रात घरातील देवघर देवतांचे फोटो किंवा मूर्ती ठेवण्यासाठी काही नियम सांगितले गेले आहेत. हिंदू धर्मात श्री हनुमान ही शक्तीचे देवता मानली जाते. तसेच कलियुगात लवकर प्रसन्न होणारी देवता म्हणून श्री हनुमानाचे पूजन केल जात. 

वास्तुशास्त्रानुसार घरात श्री हनुमानाची मूर्ती किंवा फोटो योग्य दिशेला असणं खूपच गरजेच आहे. हिंदू धर्मात भगवान हनुमानाला कलियुगातील देवता मानले जात. कारण हनुमान ही लवकर प्रसन्न होणारी देवता आहे. त्यामुळे श्री हनुमानाची मूर्ती घरात ईशान्य दिशेने ठेवण शुभ आणि लाभदायक मानल जात. तसेच बसलेल्या मुद्रेतल्या श्री हनुमानाची मूर्ती किंवा फोटो दक्षिण दिशेला लावण खूपच  शुभ मानले जाते. याशिवाय उत्तर दिशेलाही श्री हनुमानाची मूर्ती ठेवता येते.

मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशेला पंचमुखी हनुमानाची मूर्ती किंवा फोटो लावला तर जीवनात सुख समृद्धी आणि धनलाभ होतो. तसेच श्री हनुमानाचा पर्वत उचलताना फोटो घरात लावणे देखील शुभ मानले जाते. यामुळे संबंधित व्यक्ती कोणत्याही कठीण परिस्थितीतून सहज बाहेर पडते. तुम्ही घरातल्या कोणत्याही दिशेला श्री हनुमानाची मूर्ती किंवा फोटो ठेवला आहे. तेथील जागा रोज स्वच्छ करावी आणि पूजा विधी करण आवश्यक आहे.

 ज्या घरात श्री हनुमानाची मूर्ती असते. या घरातल्या नागरिकांनी दर मंगळवारी विधिवत पूजा करणे आवश्यक आहे. घरातल्या दक्षिण दिशेच्या भिंतीवर लाल रंगाच्या बसलेल्या मुद्रेतला श्री हनुमानाचा फोटो लावला तर दक्षिणेकडून येणारे नकारात्मक ऊर्जा रोखली जाते. 

श्री हनुमानाचा फोटो किंवा मूर्ती कधीही जिन्याखाली किंवा किचन किंवा अपवित्र ठिकाणी ठेवू नये असे वास्तुशास्त्रात सांगितले आहे. वास्तुशास्त्राच्या नियमानुसार श्री हनुमानाचा फोटो बेडरूम मध्ये ठेवू नये.  झोपण्याच्या खोलीत जर हनुमानाचा फोटो लावला तर वास्तुदोष निर्माण होतात.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *