कोणत्या राशीची आई कशी असते? जाणून घ्या, सविस्तर माहिती येथे.

नमस्कार मित्रांनो.

आई गरीब असो श्रीमंत असो कोणत्याही जाती-धर्माची असो पण लेकरासाठी आई ही आईच असते. तिच्या हृदयामध्ये प्रेमाचा जो पाना असतो. तो आपल्या लेकराचा आयुष्यभर रक्षण करण्यासाठी सज्ज असतो. पण जर अस जरी असल तरी प्रत्येक आईचा एक वेगळ वैशिष्ट्य असत आणि ते तिच्या राशीनुसार ठरत. 

प्रत्येक आई आपल्या लेकराचे वेगवेगळ्या पद्धतीने संगोपन करत असते. कधी खूप धाक दाखवून तर कधी खूप प्रेमाने पण मग कोणत्या राशीची आई आपल्या मुलाशी कशा पद्धतीने वागते कशा पद्धतीने मुलांना वळण लावण्याचा प्रयत्न करते. चला जाणून घेऊयात.

१) मेष रास- अतिशय बुद्धिमान आणि महत्वकांक्षा असणारी मेष राशीची आई.प्रेमळ, मायळू आणि उदार ही असते. पण तिचे हे गुण मुलाशी थोडे कमी येतात. आपल्या मुलांनी हुशार असाव नाव कमवा व त्यांचे कौतुक व्हाव अशी तिची जबरदस्त महत्वकांक्षा असते. यासाठी ती रात्रंदिवस कष्ट घेण्यासाठी तयार असते. मुलांवर मेहनत फार घेते.  त्यांना काय हव नको ते सर्व पाहते. 

तिच्या मनाप्रमाणे न घडल्यास जमदग्नीचा अवतारही करते. वाद झाल्यास माघार घेणे हे तिच्या रक्तातच नसत. पण मोठ्या मोठ्याने ओरडा  करून बोलल्यास ती शांतही होत नाही. मेष राशीची आई असेल तर मुल कोणत्याही काम करणे आधी दहा वेळा विचार करतात. मेष राशीची आई मुलांचे निर्णय स्वतः घेताना दिसते. मुलांना यश मिळाव यासाठी ती भरपूर झटते. 

यामध्ये मात्र मुलांची स्वतंत्र ती जर आहे राहून घेते. हे सर्व मुलांच्या भल्यासाठी असल्यास तरीसुद्धा मुले मोठी झाल्यावर त्यांना त्यांचे स्वातंत्र्य हवेच असते. मेष राशीची आई मात्र तिचा आग्रही स्वभाव सोडायला तयार नसते. मुलांनी अनेक स्पर्धेमध्ये भाग घ्यावा धडाडीने वागाव असंच तिला वाटत असत. तिच्या आग्रही स्वभावामुळे मुले थोडी नाराज होतात. पण मुलांनी तिने घेतलेल्या कष्टाचे स्मरण नक्कीच ठेवावे.

२) वृषभ रास- वृषभ राशीची आई मुलांच्या बाबतीत थोडी हळवी असते. शांत आणि प्रेमळ असल्यामुळे मुलांना वर ओरडणे त्यांना मारणे हे तिला जमतच नाही. मुलांनी हाऊस माऊस करावी मुलांनी आनंदी राहाव. कपडे चांगली वापरावी. आपल्या मुलांनी नीट नीट कधी असाव यासाठी ती नेहमीच झटत असते. मुलांसाठी नवनवीन वस्तू खरेदी करणे तिला आवडते. अभ्यास क्रीडा कला यामध्ये ती मुलांच्या आवडीनिवडीचा  विचार करते. त्यांच्या मित्रांच्या अगत्याने स्वागत करणे हे सुद्धा तिला आवडते.

३) मिथुन रास- मिथुन राशीची आई एक प्रेमळ आई असते. आपल्या मुलांवर तिचे कटाक्षाने लक्ष असते. आपली मुले इतरांच्या मानाने कुठेच कमी पडू नये म्हणून सतत प्रयत्नशील असते. कष्टाला कमी पडत नाही. चारचौघात बोलण्यात मुलं कुठे कमी पडू नये यासाठी ती त्यांना वळण लावण्याचा प्रयत्न करत असते. ही आई उत्तम भगिनी असल्यामुळे मुलांच्या खाण्यापिण्याची चंगळ असते. 

सण समारंभ लग्नकार्य वाढदिवस इत्यादी ती मुलांसाठी भाग घेते. त्यामुळे मुलांना कधीच एकटेपणा जाणवत नाही. मुलांना योग्य सल्ला देण जमत नाही. कारण तिचे सारखे विचार बदलत असतात. ही आई परोपकारी दयाळू असल्यामुळे या गुणांचा वारसा मुलांना मिळतो यात काही शंका नाही.

४) कर्क रास- ही आई मुलांच्या बाबतीत अतिशय भावनाप्रधान असते. मुलांना लागल थोड तरी बर नसल तरी तिच कुठेच लक्ष लागत नाही. मुलांना इंजेक्शन देताना सुद्धा मुलांच्या आधी तिच्या डोळ्यातून पाणी येत. आपल्या परिवारापासून आणि मुलांपासून कर्क राशीची आई दूर राहू शकत नाही. प्रत्येक मुलाच्या बाबतीत त्याला काय हव काय नको याची तिला पूर्ण कल्पना असते. 

स्वतःच्या स्वभावात थोडा चंचलपणा असूनही मुलांच्या बाबतीत निर्णय घेताना ती गंभीर आणि निश्चय असते मुलांवरती कडक बंधन ती घालत नाही. स्वातंत्र्य देते पण तिच प्रत्येक कृतीवर लक्ष असत. मुलांची सतत काळजी घेण काल्पनिक गोष्टींनी भीती वाटण हा तिचा स्वभावच आहे. तिच्या प्रकृतीला त्रासदायक ठरतो खरा. मुलांची लग्न झाल्यावर ही आई काही बेचण न ही होते. पण कर्क राशीची आई हे उत्तम आहे असते हे मात्र खर.

५) सिंह रास- सर्वात हुशार मुल माझा असाव बुद्धिमान मूल माझा असाव सुंदर मुल माझा ग्रह सिंह राशीच्या आईचा असतो. जिथे जाईल तिथे माझा मूल उठून दिसाव अशी तिची तळमळ असते. म्हणून ती घडवण्यात आपलं सर्वस्व पणाला लावते. सर्व गोष्टींचे शिक्षण आपल्या मुलांना मिळाव अशी तिची तळमळ असते. 

मुलांनी धीर बनाव वडीलधाऱ्यांचा मान ठेवावा. समाज उपयोगी काम कराव. कोणीही आपल्या मुलांना नावे ठेवू नये. यासाठी ती सतर्क असते. मुलांनाही ती तसंच वागायला शिकवते.कोणत्याही मुलांचे स्वतःच निर्णय घेते. कोणाचाही सल्ला तिला मुलांच्या संगोपणात चालत नाही.

६) कन्या रास- कन्या राशीच्या आईला काल्पनिक गोष्टींची काळजी करण्याची सवय असते. त्यामुळे ती मुलांचे बाबतीत नको नको ते विचार करत राहते. म्हणूनच ती मुलांना जास्तीत जास्त प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न करते. त्यामुळेच मुलांना आपल्यापासून दूर करणे.आपल्या मुलांकवर अन्याय होऊन देत नाहीत.त्या मुलासोबत ढाल बनवून सोबत राहते.

७) तुळ रास- तूळ राशीच्या आईच्या हातात जर भरपूर पैसा असेल तर ती आपल्या मुलांचे सर्व हट्ट पुरवते. मुल ज्याबागतील ते आणून देती. पण या सगळ्यामुळे मुले बिघडण्याची शक्यता असते. आपल्या मुलांना सर्व सुख मिळायला हवी असंच तुळ राशीच्या आईला वाटत असते. हुशार, सुसंस्कृत, आकर्षित दिलदार,बोलक्या अशा या आई असतात. हेच गुण त्या मुलांना देण्याचा प्रयत्न करतात.

८) वृश्चिक रास- वृश्चिक राशीची आई मुलांना भरपूर शिस्त लावते. मुलांनासंपूर्णपणे कंट्रोलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करते. सध्या जगात चालू असणाऱ्या स्पर्धेत मुलांनी मागे राहू नये. यासाठी ती मुलांवर दबावही आणते. यासाठी त्या कडक धोरण स्वीकारतात. मुलांच्या बाबतीतील सर्व कर्तव्यतेचे पार पाडतात. पण मुलांवर आपल वर्चस्व कायम ठेवतात. मुलांच्या बारीक सारीक गोष्टीवरून यांचं कायम लक्ष असत.

९) धनु रास- संततीच्या बाबतीत धनु राशीच्या स्त्रिया अत्यंत दक्ष असतात. आपली मुलं सर्व दृष्टीने मोठी व्हावी त्यासाठी धडपडणाऱ्या स्त्रिया धनु राशीच्या मुलांच्या तब्येती चांगली रहाव्या मुलांच्या प्रत्येक कृतीवर लक्ष असले तरीसुद्धा मुलांच्या स्वातंत्र्यावर गदा आणत नाहीत. 

मुलांच्या खाण्यापण्याकडे आवडीनिवडीकडे पूर्णपणे लक्ष देतात. या राशीच्या स्त्रिया हळव्या ही असतात. मुलांवर प्रेमाने का होईना हुकूमत यांची चालू असते. गुरुची रास असल्यामुळे धनु राशीची आई स्वतः थोडा बदल केल्यास एक आदर्श आई होऊ शकते.

१०) मकर रास- प्रेमळ गुण हा त्यांच्या कोशात सापडण कठीणच. त्यामुळेच मकर राशींच्या आईशी मुलांची जवळीक असणे शक्यच नाही. परंतु शिस्तीच्या बाबतीत त्या जागरूक असतात. मुलांची दयामया न करता त्यांच्या वागण्यावर लगाम ठेवतात. 

त्यांचे भलते असेल ते लाड अजिबात खपवून घेत नाहीत. खाण्यापिण्याची चोचले पुरवत नाही. त्यांच्या काटकसरीचा परिणाम मुलांवरही होतो. मकर राशीच्या आई आपल्या मुलांच्या चुकांवर पांघरून कधीच घालत नाही. मुलांच्या बाबतीत कर्तव्यदक्ष असली तरी सुद्धा कोणत्याही प्रकारचे फालतू लाड ती करत नाही.

११) कुंभ रास- कुंभ राशीची आई स्वतंत्र विचाराची असते. कुंभ राशीची आई आईच्या भूमिकेला उत्तम न्याय देते. यात काय शंकाच नाही. स्वतः सुविचार असल्याने आपल्या पाल्याला ते तसेच घडवण्याचा प्रयत्न करतात आणि त्यात यशस्वी ही होतात. मुलांवर चिडण आरडाओरडा करण मारण या गोष्टी त्यांच्या स्वभावात नसतात.

 पण तरीही त्यांची मुल त्यांच्या धाकात राहतात. कारण मुलांवर त्यांचे पूर्ण लक्ष असत. मुलांचे खाणे पिणे त्यांची प्रकृती या सर्व गरजा त्या व्यवस्थित बघतात. उगाचच मुलांना उपदेश करण्यापेक्षा आपल्या वर्तवणूककीनुसार आपल्या मुलांवर ते संस्कार घडवतात.

१२) मीन रास- मीन राशीची आई अतिशय मवाळ असते. यामुळेच मुलीच्या धाकात राहण शक्यच नसत. कधी कधी आईच्या साध्या स्वभावाचा मुल गैरफायदा घेतात. मीन राशीचे आहे कधीही कोणत्या प्रकारचा दबाव मुलांवर करत नाही. कोणत्याही प्रकारची स्पर्धा ईर्षा महत्वकांक्षा मीन राशीच्या आईकडे नसल्यामुळे ती मुलांवरही लागण्याचा प्रयत्न करतच नाही. मुलांना त्यांचे निर्णय स्वतः घेऊन देते आणि मुलांना पूर्ण स्वातंत्र्य देते.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *